Rupali Tapkire

Classics

3  

Rupali Tapkire

Classics

धुक्याची चादर

धुक्याची चादर

1 min
271


गुलाबी थंडीची ती अलवार चाहुल..... धुक्याच्या आवरणात हरवलेली नागमोडी पायवाट,पहाटेचा गार वारा.... क्षितिजावर येणाऱ्या अरूणोदयाची आरुणि आभा.....सूर्योदयाची प्रभा,

उगवतीची ती केसरीया लाली.

सहस्ररश्मिची स्वर्णमंडित किरणे धुक्याचा पदर सारुन अलगद डोकवत होती, ....जणू पडद्या आड उभ्या असलेल्या.....

लावण्यमयीच्या लावण्याची हलकीशी झलकच जणू

 .....हलकेच धुक्याचे ते आवरण सारुन क्षितिजारेषा सोनेरी झाली,

लाल गुलाबी केसरीया पहाट अवतरली,......उमलत्या कळ्यांचे गंधित श्वास वाऱ्यावर स्वार झाले,...... गंधमादित वारा आसमंती दरवळला....अंगावर रोमांच उभे करणारा तो गार वारा,.....हिरव्या पानावरून ओघळणाऱ्या दवबिंदूंत भिजलेली.... ही मुग्ध अलवार पहाट. प्रकाशाच्या पहिल्या पावलाचा..... आस्वाद घेत मी उभी होते.....अन् मला दिसली हिरव्याकंच पानावर दवबिंदूच्या मोत्यांची पखरण..... इवलेसे ते दवंबिंदू, अगदी हिरकणी सारखे दिसत होते.


 भल्या पहाटे हिरव्या पानावर

चकाकणाऱ्या मोत्यांच्या सरी 

दवबिंदूची शोभा ही न्यारी..

     त्या पारदर्शी दवबिंदूवर स्वर्णिम् किरणांची.....नयनरम्य रांगोळी...... मोसमातून निरोप घेणाऱ्या प्राजक्ताचा दरवळणारा सुगंध, ..... अशी ही मखमली थंडीत गुरफटून स्वागत करणारी

केसरिया पहाट....शांत, सोज्वळ प्रसन्न, चैतन्याने भारलेली ...नवा क्षण, नवा स्पर्श ल्यालेली.....दवात भिजलेली

,..., धुक्यात हरवलेली ती अनवट पहाट....तन-मन-प्राणात...

अनहद नाद जागवते.

     पारिजातकाचा केशरदेठी सडा.....अन् चकाकणारे दवबिंदू

...... दोघेही क्षणजीवी......पण त्या क्षणांचे चैतन्य......चिरंतन करणारे.... हे च दवबिंदू जेव्हा कमळा वर विसावतात......तेव्हां त्या सौंदर्यानपासून अलिप्त राहतातं.......जणू अळवावरचं पाणी. .....ह्या वेळेस दवबिंदू ..... मुर्तीमंत वैराग्याच प्रतिक असतात. 

   हा च दवबिंदू जेव्हां,...तृषार्त चातकची तहान् भागवतो .... तेव्हां आपले क्षणजीवी जीवन सार्थक करतो.

   अंगणातला तो केशरीदेठी प्राजक्ताचा सडा..... ऊगवत्या सूर्याला अर्ध्य देतो......मनाला संतृप्त करतो.... दोघेही जीवनाचे रहस्य गत   आहे


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics