Rupali Tapkire

Others

2  

Rupali Tapkire

Others

चैतन्यमयी पहाट

चैतन्यमयी पहाट

2 mins
51


येई अशी पहाट,

दवात न्हाऊन , गंधित होऊन

साजश्रुंगारुन काय तीचा तो रम्य थाट,


अहाहा......काय सुंदर नयनरम्य नजारा असतो तो पहाटेचा..!!!धरणीमातेच्या कुशीत अवघी कायनाथ शांत निजलेली

निशाने गोंदलेली चांदणनक्षी हळूहळू धुंदलीशी होऊ लागलेली...यामिनीचा पदरही ढळू लागलेला...पहाटेचं प्राजक्ती चांदण अनुभवण्यासाठी...अंथरल्यात प्राजक्ता ने पायघड्या फुलांच्या प्राचीच्या स्वागतास...निशेच्या मिठीत सामावलेले सर्व जीव धूंद कैफ अनुभवत....स्वप्नात रममाण झालेले अवघे जग साखरझोपेच्या अधिन होऊन गालावर स्मित उमटवत....अगदी तृप्त होऊन स्वप्नात रममाण असतानाच मंगलमय पहाटेचे साम्राज्य भुतलावर अवतरायला लागते....!!! नववधूच्या डोळ्यातील प्रेमाची धुंदी अजून कायम असते..

तीने माळलेल्या धूंद मोगऱ्याचा सुवास अर्धवट तुटलेला गजरा त्या श्रुंगारल्या रातीची कहाणी बयाण करीत असतो........!!! एव्हाना निशेच्या अधीन झालेले जीव हळूहळू साखरझोपेतून जागी होवू लागतात..... 

त्या चाफ्याचा बहर बघ कसा मस्त फुललाय हळूहळू....तोही कळ्याफुलांना गोंजारत गंधित व्हायला लागलाय....त्याच्या आगमनाने तो सभोवतालचे वातावरण भारावून टाकतो....!! हळूहळू पारिजातक ही उमलून फुलत़ पायघड्या अंथरुन बहरुन येतो....मग जाईजुई तरी कशी बरे मागे राहील....... जाईजुईच्या कळ्याही धूंदीत येऊन हळूहळू पाकळ्या अलवार उमलायला सुरुवात करतात....!!! पांढराशुभ्र मोगराही आपल्या कळ्यांना गोंजारत हास्य फुलवतो......... आणि अधीकच धूंद धूंद होते ते वातावरण अगदीं मंत्रमुग्धपहाट कशी चैतन्यमयी होत बहरते.....

 तत्पुर्वी शुभ्र तलम धुक्याचा पदर सावरीत प्राची रजनीनाथाला निरोप देत भूतलावर अवतरू लागते...दवबिंदूचे‌ तुषार सर्वत्र पानाफुलां वेलींवर आपल्या आगमनाची जाणिव करुन देत सडा शिंपून गेलेला असतो. एव्हाना निशेच्या अधीन झालेल्या रातकिड्यांचा चिर् चिर्

आवाजही थांबलेला असतो......!!! अवघी सृष्टी त्या नवीन दिवसांच्या नव्या पहाटेचे आनंदून,सडासन्मार्जन व पुष्पवर्षाव करीत स्वागतास तयार झालेली असतात..जसजस

तांबड फुटायला येते तसतशी पुर्वेची आभा लाल केशरी सोनेरी रंगाने आपली प्रभा फाकत तेजाळून,सोनकिरणांचा साज लेऊन.....नव्या दिवसाच स्वागत करायला सज्ज होते.......!!!

पक्षी,झाडाफांद्यांवर, किलबिलाट करत गिरक्या घेत असतात........पक्षांचे‌ सुंदर आवाज पहाटेच्या सुंदर वातावरणात चैतन्याचा ‌बहर आणतात...... शुभ्र धवल धुक्याची चादर हळूहळू सोनेरी झालर ल्यालेली.... लुकलुकणाऱ्या चांदण्याही हळूहळू लुप्त होत जातात......!!! 

दूरवर कोंबड्याने बांग दिलेली... आता झुंजुमुंजू व्हायला आलेलं... रजनिनाथाने हळूहळू आपला पसारा आवरायला घेतलेला

पहाटेच्या ताऱ्याचे तेजही मंदावलेलं.. लुकलुकणाऱ्या चांदण्याही. हळूहळू लुप्त होऊ लागलेल्या...पुर्वांचली केशरी स्वर्णआभा विखुरलेली... 


"तारे होई मंद मंद

तारकाही झाल्या लुप्त

प्रसवते निशेच्या कुशीतून पहाट

सौंदर्य उधळीत मनसोक्त........!!


 शेवंती,मधूमालती,रातराणीही श्रूंगारुन स्वागताला सज्ज झालेल्या........राऊळातून ऐकू येणारे मंगल भुपाळीचे स्वर, काकड आरतीचा आवाज,मंगलवाद्यांचे सूर पहाटेच्या सौंदर्यात भर घालतात...!!!

पाने फुले दवबिंदूचे अमृततुषार पिऊन चिंब झालेली असतात.... लतावेलींचा सुंदर श्रृंगार चाललेला असतो..... सुवासिनी सडासन्मार्जन करीत असताना चुड्याचा किनकिननारा आवाज जणू काही गूज सांगत असतो. 


....... तुळशीवृंदावनासमोरील रांगोळी

दिवा, अगरबत्तीचा मंद मंद सुवास ...मंदिरातील काकड आरत्यांची गुंज,धूपदिपाचा प्रसन्न दरवळ अहाहा

सगळं, सगळं कसं भारावून टाकणारं....🍀 पारिजातकाचा सडा शिंपून पहाटेच्या मंगलसमयी सृष्टीने गालीचे अंथरलेले असतात.. 

आणि हळूहळू प्रभातीचे तेज फाकत ,श्रूंगारत,हळदूल्या पावलांनी नव्या

नवरीचे आगमन व्हावे तशी रक्तवर्णीम प्रसन्न , चैतन्यमयी पहाटेचे भूतलावर आगमन होते....

सागरकिनार्यावर पक्षांचे थवे भिरभिरु लागतात....आणि निशेच्या कुशीत पहुडलेले सर्व सुखी जीव हळूहळू साखरझोपेतून जागे व्हायला लागतात.... आणि सुरू होते जगराहाटी........मुखावर प्रसन्न पिवळी आभा लेऊन दिवस सुरू होतो......नवमांगल्य,नवचेतना घेऊन........

सृष्टीचे अवलोकन करण्यासाठी........!!!


Rate this content
Log in