रुक्मिणी
रुक्मिणी
!!!रूख्मिणी भाग-२!!!
एके दिवशी रुख्मिणी पुजेत मग्न असतांना तिचा जेष्ठ बंधू खुख्मी प्रवेश करीत म्हणाला, आतां तुझे देव देव करण्याचे दिवस संपलेत. आम्ही तुझे स्वयंवर आयोजित केले आहे. मी आणि तातांनी तुझ्या हिताचा घेतलेला योग्य निर्णय तुला मान्य करावाच लागेल. तू कौंडण्यपुरच्या प्रजेचीच नाही तर, संपूर्ण विदर्भ देशाची लाडकी राजकन्या, पांच बंधूंची धाकटी एकुलती एक बहिण, माता-पित्याची लाडकी लेकच नव्हे तर त्यांचा जीव की प्राण आहेस.तुझ्यावर योग्य संस्कार घडवले आहेत.हा निर्णय तुझ्या सुखाचा व हिताचा करुनच घेतला आहे.
तुझे स्वयंवर कुरुष देशाचा राजा दंतवक्र आणि चेदी देशाचा राजा शिशूपाल. दोघेही त्या गवळ्याचे म्हणजे श्रीकृष्णा चे आतेभाऊ आहेत. तुझे स्वयंवर सध्या सार्या जगाचे आराध्य दैवत व मथुरेवर १७ वेळा आक्रमन करणारे,मगध देशाचे सम्राट जरासंधानी ठरवले आहे. ते कंसवधाचा सूड घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. चहु देशांचे राजे त्यांचे मांडलिक आहेत.
त्याच्या विरुध्द जातां येणार नाही. त्यांची इच्छा आहे, जरी, देशोदेशींच्या राजांना आमंत्रीत केले असले तरी, माळ तुला शिशूपालच्याच गळ्यात घालायची आहे. यानिमित्याने जरासंधाशी मैत्री दृढ झाली की,आपल्या राज्याकडे कुणाची वक्रदृष्टी टाकण्याचे धैर्य होणार नाही.असा सर्व बाजुंनी विचार करुनच हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.आणि आला तसा ताडताड पावले टाकीत निघून गेला.
रुख्मीच्या समोर आपले विचार व्यक्त करण्याचा तिला धीर झाला नाही. मन आक्रंदत होते. स्वयंवराचा अर्थ काय? स्वतः पतीची निवड करनेच ना? स्वयंवर वैदर्भिय देशीच्या राजकन्येचेच ना? मग तिला जर वर निवडण्याचे स्वातंत्र नसेल तर हे स्वयंवराचे नाटक हवे कशाला? रुख्मीदादा जेष्ठ असला तरी, परंपरेने मिळालेला राजकन्याचा अधिकार स्वतःकडे कसा घेऊ शकतो? "वर" निवडीचा अधिकार केवळ माझा आहे .आणि अगदी अबोध वयापासूनच श्रीकृष्णाची मूर्ती ह्रदयात कोरल्या गेली आहे आणि ते तोडणे त्रैलोक्यात कुणालाही शक्य नाही. तिने ठाम निश्चय केला, विवाह होईल तर श्रीकृष्णाशीच, अन्य कुणाशीही नाही.
रुख्मिणीने श्रीकृष्णाला मनोमन वरले आहे ही गोष्ट तिची माता, राजपुरोहित सुदेशकाका, व प्रिय मैत्रीण शीलवती यांना माहीत होते. तातांची एवढी लाडकी पण, रुख्मीपुढे ते हतबल होते, वाढते वय, राजकारभारावरची सैल झालेली पकड, व रुख्मिच्या मागे असलेली सम्राट जरासंघाची शक्ती यामुळे त्यांचे हाती कांहीच नव्हते. माता शुध्दमती लेकीचे अंतरंग जाणून असल्यामुळे ती फार दुःखी होती, पण रुख्मिणी दुसर्या कुणाला वरणार नाही याची तिला पक्की खात्री होती. रुख्मीला एकच उद्योग, सतत श्रीकृष्णाची निंदानालस्ती करणे, व शिशूपालची प्रशंसा.
स्वयंवराचे निमंत्रण श्रीकृष्ण वगळता देशोदेशीच्या सर्व राजांना गेले.कारण श्रीकृष्ण हा कोणत्याही देशाचा अभिषक्त राजा किंवा भावी वारस नसलेला, शिवाय ययाती राजापासून शापित असलेले यादव कुळ. त्यामुळे आपल्यासारख्या कुळवंत कुळात श्रीकृष्णाला बोलावणे शोभणार नाही म्हणून त्याला आमंत्रित केले नाही. वास्तविक जो या त्रिभुवनातील सर्वांचा ह्रदय सम्राट,त्याला या असल्या उपचारांची गरजच काय? पराक्रम,बुध्दी,निःस्पृहता असलेल्या श्रीकृष्णासमोर या दुष्ट पाताळयंत्री लोकांचा निभाव लागणार नाही म्हणून ते भीत होते.
तिच्या मनांतील भाव जाणून सुदेवकाका म्हणाले, पुत्री चिंता करुं नकोस. इथे आलेले रुथकौशिक महाराज तुझे मन व श्रीकृष्णाची महती जाणून आहे.तुझ्या तांतानाही श्रीकृषाणाने इथे यावेसे वाटते त्यामुळे कांहीतरी उपाय शोधून त्यांना आमंत्रण जाईलच! श्रीकृष्ण व उध्दव नक्की येतील. श्रीकृष्ण स्वयं दीपस्तंभ आहे. तो तुझ्या जीवनातील अंधःकार दूर करुन, तुझं जीवन सुख,आनंदमाधुर्याने उजळून टाकेल.
क्रमशः
