Rupali Tapkire

Others

3  

Rupali Tapkire

Others

प्राजक्त पहाट

प्राजक्त पहाट

1 min
121


     ही प्राजक्ती पहाट!आणि ती! तिला बघताच मला राजा रविवर्मांच्या चित्रांची आठवण झाली. उगवतीच्या कोवळ्या किरणांनी, उजळलेले लावण्यमयी, आनंदमयी, चैतन्यमयी ते मुखकमल, तिच्या विलोभनीय सुहास्य चेहर्‍यावरचे सोज्वळ सात्विक भाव . तिला बघून असे वाटत होते की साक्षात दिव्य रूपा जगत जननीच अवतरली आहे ह्या धरेवर. की, ही वसुंधराच सूर्यनारायणाला अर्थ्य देण्यास नारायणी होऊन अवतरली आहे! खाली धरणी पर्यंत पोहोचलेली ती प्रकाश किरणे म्हणजे प्राजक्ताचा सडाच जणू.

   तिचा तो मोकळा केस संभार, पहाट वाऱ्याची केसांन सोबत चाललेली हितगुज, हिरव्या पानांची ती सळसळ, त्या हिरव्या पानावर दवबिंदू हिरकणी सम चकाकत होते. पानातून डोकावणाऱ्या त्या अर्धोन्मिलीत कळ्या, पहाट पक्ष्यांचा कर्णमधुर कलरव, सारे वातावरण कसे आल्हाददायक झाले होते.

     सूर्यप्रकाशात उजळलेल्या तिच्या मुखकमलावर एक सात्विक स्मित विलसत होते. ती ची ती उर्ध्वमुखी भावभंगिमा जणू सृष्टीला निहाळत होती, निसर्गाशी संवाद साधत होती की स्वत:शीच संवादत होती. आठवांचे मखमाली कवडसे शोधत होती. आठवणींची पाखरे भिरभिरत होती. ती आत्म मग्न झाली होती. तो आठवांचा जागर, तिच्या ओठांवर विलसणारे ते स्मित हास्य, ती एका वेगळ्या विश्वात विहरत असण्याचा भास निर्माण करत होते. प्रीतिच्या पियुषाचे पयपान करण्यात ती तल्लीन झाली होती . प्रीत तिच्या समग्र अस्तित्वात निनादत होती. त्या तृप्तीचे भाव तिच्या मुखकमलावर विलसत होते.

   ती प्राजक्ती पहाट ही स्तंभित झाली होती, तिला निहाळण्यात! तिच्या अर्धोन्मिलीत डोळ्यात सजलेले ते दिवास्वप्न संपूर्ण प्रकाशित करण्यासाठीच ती थांबली होती.


Rate this content
Log in