Jyoti Nagpurkar

Action Inspirational

3  

Jyoti Nagpurkar

Action Inspirational

देवमाणूस (आठवणीतील कथालेख)

देवमाणूस (आठवणीतील कथालेख)

4 mins
400


आठवते ती संध्याकाळ, तो क्षण. मुंबईत राहत असतानाचा. मिस्टराची मुंबईला बदली होऊन वर्षभरच झाले असेल त्यामूळे रस्त्याची अजिबात ओळख नव्हती.एका संध्याकाळी ह्रदयाच्या एका कप्प्यात ती आठवण जपून आहे.मिस्टरांना अचानक ड्युटीवर असतानाच तब्येत बिघडली आणि त्यांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. मला ही बातमी त्या रात्रीच्या आठ वाजेला कळली. रोज सहा वाजेपर्यंत येणे असायचे, पण त्यादिवशी ते त्यावेळेत आले नाहीत म्हणुन मी खुप बैचेन झाली होती आणि अतिशय काळजीतही. काही वेळाने हॉस्पिटलमधून फोन आला की त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना तत्काळ अॅडमिट करावे लागले म्हणून. मी तर खुप घाबरली होती.रात्रीचे आठ वाजले होते त्यामुळे मिस्टरानी फोन वरून आता रात्री न निघता उद्या सकाळी ये.आणि कसे यायचे कुठल्या नंबरची बस पकडायची हे व्यवस्थित समजावूनही सांगितले त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी माझ्या कामवाली बाईच्या मुलीला सोबत घेवून निघाले.


सकाळ तसेच दिवस असल्यामुळे आम्ही दोघी व्यवस्थित पोहोचलो. मिस्टरांना आणखी काही दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागणार होते म्हणुन मलाही त्यांचा जवळ काही दिवस थांबावे लागणार होते म्हणुन मला काही आवश्यक सामान आणि कपडे घरून आणावे लागणार होते मी आणि बाईची आम्ही परत घरी आलो. त्यानंतर मला सर्व हॉस्पिटलमध्ये थांबायचे म्हणुन सर्व तयारीनीशी निघायचे असल्यामुळे मला घरूनच चार वाजले मला एकटीलाच जायचे होते. माझ्याजवळ दोन हातात दोन सामानाची बॅग आणि एक खांद्यावर माझी बॅग असे घेऊन मी पंधरा मिनिटांच्या अंतरावर बसस्थानकावर पोहचायचे होते. मी पाच मिनिटांत मला हवी असलेली बस आली खरी! पण बसमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे मी आत शिरू शकले नाही. तसे मुंबईत सेकंदभरातच बस थांबते. एवढ्या वेळेत गर्दीमधून आत शिरणे म्हणजे तारेवरची कसरतच. दोन बसेस मला असंच सोडून द्यावी लागली. कारण सर्व ऑफिस सुटण्याची वेळ होती म्हणून सर्व बसेस गच्च भरून यायच्या. तिसऱ्या बसला कशीबशी आत शिरले. गच्च भरलेल्या बसमध्ये रेटून उभी राहिली. माझी हालत फार वाईट झाली होती. पुढचे स्टेशन यायचे पण लोक उतरणे कमी पण चढणारेच असायचे. वीस मिनिटांनंतर मला थोडी बसायला जागा मिळाली. आणखी दहा मिनिटांनंतर बस थांबली.


बराच वेळ झाला तरी बस चालू झाली नाही. कळले की ट्रॅफिक जॅम झाला आहे. खिडकीतून डोकावून बघितले तर् मी अवाक् झाले; प्रचंड ट्रॅफिक जॅम! आत्ता कसे? मला वाटले, होईल हळूहळू पण एक तास झाला तरी काहीच फरक पडला नाही. तेव्हा मला कळले गणपती बाप्पाचा शेवटच्या दिवशीचं विसर्जन असल्यामुळे एवढे ट्रॅफिक जॅम झाले आहे. माझ्या ध्यानीमनी नव्हते की, आज गणपती विसर्जन आहे! माझी चिंता वाढत होती. दीड तास झाला; एक एक करून लोक उतरू लागली. मी जाम हादरली. बस रिकामी होत होती; जवळपास आठ-साडेआठ झाले होते. माझी चिंता अगणित झाली. बसमध्ये मी, बस ड्रायव्हर, बस कंडक्टर आणि एक वीस बावीस वर्षांचा तरुण मुलगा माझ्या समोरच्या सीटवर बसला होता. रात्रभर जागरण झाल्यामुळे मला अजिबात कळत नव्हते की नेमकी बस थांबली कुठे आहे? कारण रस्ते माहीत नव्हते. मी कशी उतरू, कुठे जाऊ, काय, कसे करू? या चिंतेनी मी ग्रस्त झाले होते. त्यावेळी मोबाईलचा जन्मही झाला नसल्याने प्रश्र्नचं नाही लगेच फोन करणे.


आता माझी चांगलीच तारांबळ उडाली. नऊ वाजायला येत होते. मी सीटवरून उठली दरवाजाच्या दिशेने जात खाली उतरले माझ्या मागोमाग तो तरुण ही ताड्कन उतरून माझ्या मागे येत म्हणाला ताई, तुम्हाला कुठे जायचे आहे. मी थबकले; आणि मागे वळून त्याच्याकडे पाहत होते. वाटले याला कसं सांगू. माझ्या मनात त्या मुलांबद्दल शंकाकुशंका निर्माण व्हायचा आतच बोलला," ताई सांगा ना मला. घाबरून जाऊ नका. मी परळला राहतो. तुम्हाला कुठे जायचे आहे मी तुम्हाला सोडून देतो". मी घामाने चिंब झाले होते. माझ्याजवळ च्या दोन बॅगा ही सांभाळणे होत नव्हते. त्या मुलाने मला तुमच्या "बॅग्स द्या, मी धरते तुम्हाला फार त्रास होतो आहे." त्यानी माझ्याकडून माझे सामान धरले. लगेच परत त्यानी विचारले "तुम्हाला कुठे जायचे आहे". "मला भायखळाला रेल्वे हॉस्पिटलमध्ये जायचे आहे पण मला आता या क्षणी गोंधळात पडली की इथून पुढे कसे जायचे." त्यानी "मलाही परळला जायचे आहे चला आपण व्हीटी स्टेशनला जाऊन तेथून लोकल पकडू, मी तुमच्यासोबत आहे घाबरून जाऊ नका." म्हणून तो माझ्याशी गप्पा मारू लागला पण मला त्याचे फारसे समजत नव्हते कारण तो अडखळत बोलायचा पंधरा मिनिटांत आम्ही भायखळा स्टेशनवर पोहोचलो आणि दोन मिनिटांतच लोकल पकडली. त्यानी माझ्या बॅग्स धरूनच ठेवली होती आणि मला कसला त्रास होणार नाही याची अतिशय काळजी घेत होता.


भायखळा स्टेशनवर मी उतरले, तो ही उतरला आणि हॉस्पिटलपर्यंत सोडून दिले अन् मी त्याचे आभार मानून, त्यानी मला निरोप दिला मी पुढे जात होते मागे वळून पाहिले तर तो मला दिसेनासा झाला. मी मनोमन त्याला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा दिल्या. परमेश्वराचे आभार मानले कारण तो माझ्या मदतीसाठी देवमाणूस आला म्हणून मी कृतकृत्य झाले. हॉस्पिटलमधील मिस्टरांच्या रूममध्ये पोहोचले तर माझ्या काळजीपोटी माझे पती भर तापात येरझाऱ्या घालत होते. जवळपास मला रात्रीचे दहा वाजत होते. साहजिकच आहे चारच्या सुमारास निघालेली मी, म्हणूनच तर फार चिंतातूर; यामुळे स्वत: आजारी आहे याचे भानही हरपून गेले होते. मी जेव्हा त्यांच्याजवळ पोहोचले तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला होता.


आजही कधी मला त्या रात्रीची, त्या क्षणाची आठवण झाली की मला वाटते तो तरुण म्हणजे देवरूपी श्रीकृष्णच असावा.🙏🙏♥️♥️


Rate this content
Log in

Similar marathi story from Action