स्त्री कालची आणि आजची
स्त्री कालची आणि आजची


स्त्रीच सौंदर्य आणि भावनाप्रधान मन हे कालही तसेच आणि आजही तसेच आहे. तिचे औदार्यशील, तिच्यातली ओतप्रोत असलेली ममता , सोज्वळता, समर्पितपणा , तिची शैली काल जशी होती तशीच आजही आहे.
कालच्या स्त्रिचा आढावा घेतला तर तिच्या पडद्या आतलं रूप लक्षात येते; तिचं लाजनं हे तिचे सौंदर्य होते. पुरुषांच्या शब्दाला मान देणं हेच सौजन्य होते. मुले जन्माला घालने व पालनपोषण करणे, घरात राहून घर सांभाळणे एवढीच जबाबदारी होती. देवपूजा, हळदीकुंकू, लग्नसमारंभाला हजर राहणे एवढीच सामाजिक कार्ये तिच्या वाटेला होती. पण त्यावळेला ती अशिक्षीत असुनही शिक्षीत भावना व समज होती. आपला संसार हेच एकमेव तिच राज्य होते. घराच्या भिंतीच्या चारचौकटात राहून ती आपल्या अस्तित्वाला पारखी झाली होती.
स्त्री शिक्षणाने प्रचंड प्रमाणात स्त्री क्रांती घडविली. स्त्रिला उबंरठा ओलांडण्याचा अधिकार मिळाला, इथून तिचा प्रवास अत्यंत वेगाने झाला हे दिसून येते. तिच्या आचार विचारांना दिलासा आणि आवाज मिळाले., शिक्षणाने आचरणात एक प्रकारची लयता आली अन् तिच्या स्वतंत्र अस्तित्वाला चालना मिळाली. घरातल्या कामाला आणि समाजात स्वतंत्रपणे वावरण्याचे पाठबळ मिळाले ते शिक्षणाने. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाचा पाया रचून, आज अनेक स्त्रिया उच्च पदावर विराजमान झाल्यातं. आचार विचारात प्रबळता आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या खरया लेकीच्या आई होत्या हे सिद्ध करुन दाखविले.
स्त्री आपल्या व्यवहारानी आणि बलशाली आचार विचारांनी तिचे अस्तित्व तिचे बळ संपूर्ण जगभरात पसरत आहे, तिचे महत्व प्रत्येक ठिकाणी लक्षात येते आहे. तिचा सन्मान हा तिचा स्वयं रचित आहे. खरया अर्थाने ती शक्तीची देवता आहे हे विधान रूजवून दिले आहे. आज पुरूषाने तिचे सामर्थ्य ओळखले आहे व पुरुषी अहंम् भावनेला तडाही दिला आहे.
आचार विचारांची घडीवर घडी पडत जाऊन ती प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. " जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी". ही म्हणं सार्थक झाली आहे.
म्हणतात की, ही अधिरता कुठे कुठे लाजीरवाणी वाटते. काही अपवादात्मक उच्च स्तरातील, उच्च-मध्यम स्तरातील स्त्रिया मधे कुठे कुठे निर्लज्जतेचे कळस दिसतो आहे. पाश्चिमात्यकरण अंगी शिणुन स्वतः वर विटंबनात्मक पुरुषी नजरेला वाव दिला जात आहे. तिच्या लाजण्याचा नजरेला खीळ बसलेली दिसते. तिच्या डोक्यावरचा पदर एवढा छोटा झाला की तिच्या वस्त्रांनी अर्ध अधिक नग्नता दिसते. आपल्या भारतीय संस्कृतीला न शोभणारे सन्मान गमवणारे वाटते. फशनच्या नावाखाली तिचा देहप्रदर्शन होतो आहे.तेव्हा "कोण होतीस तू, काय झालीस तू . या "गाण्याचे अर्थ नकळत दुखावतो आहे. स्त्रीच्या आचार विचारात , व्यवहारात अहंकार व धुर्ततेचं लक्षणे व दिखाव्याचा लेप चढलेला दिसतो आहे. इथे उभा राहतो एक प्रश्नचिन्ह . मनाला चटका देणारं .!
पुरूषप्रधान देशात स्त्री विटंबना आणि स्त्रिची दयनीय अवस्थेवर कायद्याचा पाठिंबा यामुळे एक दिलासा आहे.तरीही आज ग्रामीण, शहरी, निम्न स्तरातील स्त्रियांवर, लहान बालिकेवर अत्याचार होत आहे हे गंभीर कडूसत्य नाकारता येत नाही. कधी कधी मन उदासीनतेच्या भोवर्यात सापडतो, मनात अनेक गोष्टी गोधंळ घालते .खरोखर स्त्री पुर्णपणे स्वतंत्र झाली का? का तिचे मन आजही घुटमळते. इथे उभे राहते आणखी एक प्रश्नचिन्ह . आजही तिच्या जन्मावर आंधळी श्रद्धा दिसत आहे. तिच्या वर मानसिक व शारीरिक छळ होत आहे. अमानुषता हावी होते आहे. जन-जनांची उपेक्षा, नकारात्मकतेचे पारडे वजनी होते आहे, तिच्या कार्यस्थळी अवमान होते आहे. औदासिन्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा दुप्पट पटीने वाढत आहे हे संशोधनानी सिद्ध झाले आहे तेव्हा इथे उभे राहते आणखी एक प्रश्नचिन्ह .
जगाला, या विश्वाला, या देशाला परिपक्वतेच सारण भरते ती स्त्री. निसर्गाची संजिवनी आहे स्त्री. संपूर्णताः भरते या सृष्टीला., तिच्या शिवाय हे निसर्ग ही निरसचं की !...