Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Jyoti Nagpurkar

Others


2.1  

Jyoti Nagpurkar

Others


स्त्री जन्मा तुझी कहाणी

स्त्री जन्मा तुझी कहाणी

2 mins 1.7K 2 mins 1.7K

उर्मिलाचे लग्न होऊन सत्तावीस वर्षे लोटली होती. लहाणपण तसे गरीबीतच गेले होते. शिक्षण मट्रीक पर्यंत होते. स्वभावानी जरी हळवी, तरी व्यवहारात मात्र खूप समजूतदार पणा होता. लग्नानंतरचे जीवनही फारसे सुखी समाधानाचे नव्हते. पती जरी सरकारी नौकरीत कार्यरत असले तरीही त्यावेळेच्या पगारात घर चालवने कठीणचं! घरात दोन वयात आलेल्या नणंदा, दोन दीर आणि सासू सासरे या सर्वांचा जबाबदारीने साभांळ करणे, तरी भार पडतोच. काही वर्षांनंतर ऊर्मिलाला तीन मुली अन् दोन मुले झालीत. उर्मिलाच्या तब्येतीवर उलटच प्रभाव पडला. शारीरिक व मानसिकरित्या ती कमजोर होत गेली. जुन्या विचारसरणीला मोठच कुटुंब हवे असते हे यावरून सिद्ध होते. आजही बरयाच ठिकाणी कुटुंब नियोजन म्हणजे काय हे कळूनही अनदेख करणे हेच पहावयास मिळते.

तिने सर्वच मुलींना चागंलेच शिक्षण दिले आणि आत्मनिर्भर व्हावीत असे संस्कार ही दिलेत ही मात्र जमेची बाजू . दोघां मुलांनाही चागंलेच शिक्षण मिळाले पण फारसे पुढे गेले नाहीत, घड्यातच श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहण्यारयांचे तसेही एका ठिकाणी ठाव ठिकाणा नसतोच. सर्व भावंडामध्ये जेष्ठ राहणे म्हणजे भरपूर लाड ओढून घेणे. अशी लाडावलेली आणि नको तेवढा विश्वास ठेवून तिच्या वर लगाम न खेचने, हा बिनधास्तपणा जेव्हा अंगावर येतो तेव्हा पाया खालची जमीन सरकते. तेच झाले, मोठ्या मुलीने आईवडीलांची अवाज्ञाच केली. आपल्या प्रियकरासोबत घर सोडून जाऊन लग्न करून मोकळी झाली, हे कुठपर्यंत बरोबर वाटते. मान्य आहे आज काळ बदलेले आहे. पण स्वतः च्या आईच्या ढासळलेल्या प्रकृतीकडे लक्ष देऊन योग्य पाऊल टाकावे, आपल्या घरातील वरिष्ठ व्यक्तींना निर्देशनात आणणे, हे शिक्षीत मनाला कसे कळले नाही. अनोळखी व्यक्ती प्रियतम म्हणून आयुष्यात आल्याने आपलें आई वडील, भावंडाविषयीचे प्रेम व त्याच्यांविषयीच्या कर्तव्याची जाणीव व काळजी याचा पूर्णपणे विसर पडतो काय, एवढा स्वार्थ आणि निर्लज्जपणा अंगी भरते काय... की परिणामाचा विचार करण्याची क्षमता राहत नाही, या सर्व गोष्टींचा जराही खंत न वाटावी.

आपल्या भारतीय कुटुंबात अश्या घडणाऱ्या घटनेला जबाबदार मुलीची, मुलाची आईच असते ही गैसमजुत करून तिला नानाप्रकारचे दोषारोपण लावून एक प्रकारचा मानसिकरित्या अत्याचार करतात. असेच उर्मिलाचा बाबतीत झाले. पती, सासू सासरे, आप्तेष्ट एवढेच नव्हे तर तिचे स्वतः चे इतर मुले, मुली देखील तिला दबावाखाली आणतात. आज तिची कीव येणारी दयनीय अवस्था झालेली आहे. अवसादाला बळी पडली एवढेच नव्हे तर तिचे आचरण एखाद्या निर्जीव मूर्तीसारखे झाले आहे, नाही तिला जगता येतं, नाही मरण पत्करता येतं. या सर्वांमधून कोणाचा जीवावर या घटनेनी घाला घातला, की इतक्या वर्षानंतरही सावरली नाही आजही तिच्यावर परक्यांसारखा व्यवहार आणि हेटाळणी अन् टोचणीचा प्रहार होतच आहे. असेच आयुष्यभर तिच्या वाटेला असणार का?

यामुळे स्त्रीच्या आत्मविश्वास आणि आत्मसन्मान खालावत जातो, यामुळे स्त्रिचा तिच्या मनातल्या भावनेवर विपरीत परिणाम होतोच होतो.

स्त्री जन्मा तुझी कहाणी कशी आगळी ग वेगळी

भूतलावरी जन्म घेऊन, रुसलीस ना गडे!

आयुष्याचे क्षण हे मोजके

सुखाचे कमी तर अति, दुःखाचे

जीवनातले या, धागे दोरे

कुठे जुळले तर कुठे, तुटले

जुळविण्याचा प्रयत्नात, फसलीस ना गडे!

स्त्री जन्मा तुझी कहाणी कशी आगळी ग वेगळी.


Rate this content
Log in