Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

Jyoti Nagpurkar

Others

2.1  

Jyoti Nagpurkar

Others

" नाकापेक्षा मोती जड

" नाकापेक्षा मोती जड

2 mins
1.3K


सुंदर,देखणा, उंच, गोरा, असा उमदा तरूण सिनेमातल्या नटालाही लाजवेल असा गोंडस; प्रणव.

अनेक मुली त्याचावर भाळणार्या ; आणि स्वभावानेही खुप समजुतदारपणा आणि स्वाभिमानीवृत्ती. कार्यरत म्हणुन एक उत्तम आर्किटेक आणि गुणी मुलगा; मग त्याच्या वाट्याला आपली जीवनसंगीणी (जोडीदार) मिळविण्यासाठी चौकटी का असावी. प्रणवची कुडंलीत त्त्रीव मंगळ (मागंलिक). लग्नासारख्या महत्वाच्या गोष्टीत तडजोड करावी ? कुंडली ही कोण तयार करते, ती बनवणारी व्यक्ती आपल्या भाग्याची वजा-बेरीज करणार का? अवकाशयनातले ग्रह विपरीत परिणाम तयार करतात का? इतर अनेक देशांमध्ये या गोष्टीला महत्व आहे का. व्यक्तीला या गोष्टी जाणून घेतच आपले कर्म आणि ध्येय करीत रहावे का अशी अनेक शंका- कुशंका करीत जगत रहावे का. किती असा समज, गैरसमज करीत रहावे; अश्या अनेक गोष्टी भेडसावत असतात. अशा विचारात त्याची तिन-चार वर्षे जोडीदार मिळविण्यासाठी आई-बाबानी घेतलीचं. कारण वधू ही सुद्धा (मांगलीक) च हवी असते. शेवटी प्रणवने मात्र बाजी मारली. फेसबुकवर झालेली फेसबुक फ्रेंडच त्याची जीवनसंगीणी झाली. फेसबुक मॅसेज वर गप्पा करताना त्याला ती सुद्धा मांगलिक च आहे कळले, तसा हा योगायोग समजावा. प्रणव मध्यम वर्गीय कुटुंबातला व मुलामध्ये जेष्ठ . ती फेसबुक फ्रेंड उच्च वर्गीय कुटुंबातली.आणि त्यातल्या त्यात आमदाराची लेक. प्रणवचे आई-बाबा, आजी-आजोबा व इतर मंडळी गोंधळलेली . प्रणव आणि फेसबुक फ्रेंड दोघांनी एकमेकांना पसंतही केलं व मान्यही केले होते.फेसबुक फ्रेंड दिसण्यात फारशी सरस नव्हती. प्रणव चे वडीलांना जुळवणे मान्य नव्हते ,

कारण त्यांना " नाकापेक्षा मोती जड " असेच वाटायला लागले. पुढे ह्या नात्यात अडचणी आल्या तर, आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबात वधु सून म्हणुन सर्वांना निभावून घेईल का आणि तिचे कुटुंब आणि आपल्या कुटुंबाशी मेळ होईल का ; या विचाराने ग्रस्त होत होते. पण प्रणव मात्र ठाम होता. घरच्यांची समजुत घातली आणि हे नातं जुळवून आणले. वधु मुलगी ही प्रणव च्या प्रेमात आकंठ बुडालीच होती पण प्रणव मनापासून खुश होता का, की मांगलिक म्हणुन तडजोड करत संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न करीत राहिला.


 बोधता:  __ " नाकापेक्षा मोती जड " कधी कधी आयुष्यात स्विकार अथवा न स्विकारणे , आशा निराशा, सुखाशी दुःखाशी समरस होऊन अनुभवातून, प्रसंगावधान समजून घेण्यासाठी काही गोष्टी व्यक्तीला पार पाडावेच लागते. मोती जड असो की हलके असो नाकाला ते सहन करावे लागते हिच जिवनाची कथाही आहे आणि व्यथाही आहे.


Rate this content
Log in