अरे संसार संसार !
अरे संसार संसार !


जगता येईना नाही मरता येईना. रोज रोज सांगुन जीव वैतागून जातो . घरातल्या उंबरठ्यावर बसून शीला जशी पुटपुटत होती. संध्याकाळचे सहा वाजले होते.सकाळचे आठ वाजल्यापासून लीलाधर घरातून बाहेर पडतो आणि त्याचा घरी परतण्याची वेळ ठरलेली नसते. आल्यावर एक तर अनादर आणि नको ते बोलत सुटणं, ही रोजचीच दिनचर्या. कधी कधी नशेत तुंब असायचा. परतल्यावर सकाळ पासून ते संध्याकाळपर्यंत चा समाचार घेतला जायचा.
आजही तेच पण थोडं वेगळं घडले.
लिलाधर: काय ग! आज कुठे नाही हुडकायला गेलीस ?
शीला: कुठे जाऊ ? मला वाटले तुमीच न्याल हुड....कायला.
लीलाधर : असं का! चल मग माझ्या सोबत दारुच्या दुकानात. माझ्यासाठी दारू हुडकून येऊ, तू म्हणशील तीच दारू पितो आज.
शीला: तुम्हाला काही लाजलज्जा आहे की नाही , की , विकून खाल्ली.
दोघांनाही एकमेकांवर संशय घेणं ,हा मानसिक विकारानी ग्रसीत केले होते. दोघेही एकमेकांपासून खुश नव्हते. एकमेकांना तोंडघशी पाडणे ही दैनंदिनता झाली होती.
चेहर्यावर मरगळ आणून लीलाधर : राजेश मला चौरस्त्यावर दिसला. कुणीतरी बाईसोबत. तुला विसरला वाटतं.बिच्चा...रा !
शीला जोरात ओरडली.
का....य ?
परत शीला: तुम्हाला काय माहीत यातलं.
लीलाधर: म्हणजे तुला माहीत आहे तर्.
शीला रागानी मोठ्ठा श्र्वास सोडत : मी चहा टाकते. आता मला चहाची इच्छा आहे, तुम्हाला हवं असेल तर सांगा.
दोघांचेही एकमेकांवरचा संशय घेणे चुकीचे नव्हतेच.
लीलाधर ने मोठ्ठा श्र्वास घेतला.
लीलाधर : मला आता कशाचीच इच्छा राहीली नाही.
शीला : मलाही कुठे राहीली? हा संसार आणि तुमच्यातही.
शीला तोंडातल्या तोडांत पुटपुटत होती
लीलाधर : अगं, जोरात बोलं.नं!
नको वाटत असेल तर सोडून देऊ एकमेकांना.
शीला : का...य.! काय म्हणालात , दोन पोरांचं कसं व्हायचं, याचा विचार नाही!
परत शीला : एकाचं दहावी चं वर्ष, त्याचं कसं होईल याचा विचार कोण करणार.?
लीलाधरचे ही अनैतिक संबंध होते. यामुळे शीला तिला नकोशी झाली होती. बराच वेळ तो तिच्या( लीलाधर ची मैत्रीण) सोबत घालवत होता हे शिलालाही ठाऊक होते.
शिलाची एक जिवाभावाची मैत्रीण होती.तिला दोघांचेही कारणामे माहित होते. अनंघा समजूतदार आणि मनमिळावू होती. तिला दोघांनाही वठवणीवर आणायचे होते कारण निरागस अपत्यांचा प्रश्र्न होता.. अनेक दिवस निघाले . रोजचाच अपमान आणि भांडणे. आई-वडील्याच्या अश्या वागणुकीमुळे त्यांच्या वर विपरीत परिणाम दिसू लागले. लहान मुलाच्या वागणुकीत परीणाम होऊ लागला. हट्टीपणा आणि उद्धटपणा वाढु लागला.
नवीन प्रवेश संजु
शीट्ट्या घेत बॉल सोफ्यावर फेकत, दिवान वरच्या चादरीला ओढवून ताणवत ....
लहान मुलगा संजु : अगं मम्मी! मला दादा सारखीच सायकल घेऊन दे. दादा मला आपल्या सायकलला हात लावू देत नाही. मला आज नवीन सायकल पाहिजे नाहीतर मी शाळेला जाणार नाही. आणि माझी पिकनिक जात आहे., मी माझ्या मित्रांसोबत जाणार पुर्ण एक दिवसाची आहे आम्ही खूप धमाल करणार आहोत. मला त्यासाठी एक हजार रूपये पाहिजे.
शीला मुलाला रागावून आणि मोठे डोळे करून :
हे सर्व तू कोणाला विचारून ठरवलेस. अभ्यास मात्र कवडीचा नाही. आणि म्हणे सायकल पाहिजे पिकनिक ला जायचं, पैसे पाहिजे जसा तू आपल्या मनाचा राजाचं.हे सर्व तुझ्या पप्पांना सांग.
संजु : तूमचे दोघांचे नेहमीच. मला पाहिजेच.
संजु नाराज होऊन पुटपुटत होता. तो शीला ला मला तू नको आहेस, तूम्ही दोघेही दुष्ट आहात, तुम्ही दोघे नुसते भांडत बसा.
अनंघाचा प्रवेश...
अनंघा आणि शीला दोघीही शांतपणे एकमेकांशी न बोलता बराच वेळ एकमेकींकडे बघत राहिल्या .
अनंघा: बराच वेळा नंतर : काय चालवलाय ग तुम्हा दोघांनी ! इतकी स्वार्थी कसे काय ग होवू शकता ?
फालतू आकर्षणासाठी मुलांचं जीवन खराब करायला निघालेत . अशी कशी ग आई तू ?
शीला : तूला नाही माहित बरयाच गोष्टी , यांच्या वागणुकीचा विट आलाय मला.
अनंघा : म्हणून तू मुलांच नुकसान करशील, पुढे पश्र्चाताप होईल. यावरही काही उपाय असेलच नं ! उद्या सकाळी मला माझ्या मैत्रिणी कडे चलशिल का? मला थोड काम आहे तु पण चल, मला बरे वाटेल.
शिलाची मैत्रिण अनंघा हिने दोघांनाही वेगवेगळ्या पध्दतीने सायकॉजीस्ट डॉ. रमा दाते कडे कॉन्सेंलीग साठी भेट घेतली.
डॉ.नी उलट तपासणी केली शिलाची.
डॉ.दाते : आत्ता सध्या काय चाललंय तुमचे.? अनेक संवाद झालेत.
आत्ताचा क्षणापासुनं तर लग्नाआधीच्या क्षणापासुनं. सर्वी हकीकत ऐकून विचारली, आणि डॉ नी शांतपणे समजून घेतली. दुसर्या दिवशी अनंघा तातडीच निमित्त करून लिलाधरशीही भेट घडवून आणली. डॉ.नी त्याचीही उलट तपासणी करून लिलाधर चे मन जिंकून घेतले.
नंतर दोघांचीही भेट करवून घेतली.
सल्ला देत समजून सांगितले की,
डॉ. दाते: जीवन हे खूप अनमोल आहे. सोन्यासारखी दोन मुले. लग्नाआधी प्रेमात पडलेली जोडपी , नंतर नकोशी वाटतात. हे आज सर्वत्र सर्रासपणे सुरू आहे. हा निव्वळ आकर्षण . प्रेम नाही. पुढेही आणि दुसरें तिसरे. या सवयीला नक्कीच मर्यादा हवीचं. पुढे तुमची मुलेही तुमचेच अनुकरण करतील, तुम्हाला आवडेल का ?
सामंजस्य पणाने घ्या. संसार आणि खरे प्रेम प्रत्येकाचा वाटेला येत नाही. त्यासाठी आपल्यालाच कसौटीत उतरावे लागते, संसार सुखाचा होण्यासाठी. नाही तर स्वताःला दुःखाचा खाईत ढकलतो.
काही दिवसानंतर.
संपुर्ण कुटुंबासोबत प्रवेश
कुठलीही आडकाठी न घेता संसार सुखाचा होणारच होता.