डॉक्टर भूत
डॉक्टर भूत


गावी निघालो होतो.बसमधून जाताना सगळीकडे कसं हिरव्यागार वनश्रीने नटलेले होती. मन कसं प्रसन्न होतं. मधेच उसाचे मळे दिसत होते. त्यांच्या बाजूला ऊसाचे रसाचे यंत्र लावलेले होते. थंडगार उसाचा रस पिण्यासाठी लोक थांबत होते. ताजा उसाचा रस पिण्याची मजा काही औरच होती. मामाच्या गावी जाणार मुलांनाही खूप आनंद होत होता. सगळ्यांना कधी एकदा गाव येतंय असं झालं होतं. गावाला आणि सगळे पटापट उड्या मारून आजीकडे धावले. आजी आजोबा आधीच तेथे उभे होते. "आली ग माझी लेकरं"
आजी म्हणाली. सगळे घरी आले. आजीने छान आम्रस पुरी चा बेत केला होता. मुलांनी ताव मारला. जेवण झाल्यावर शितल बाहेर आली." आई हा दवाखाना असा बंदच आहे".
" हो ग पोरी"
"पाटील डॉक्टरांचा दवाखाना. खूप चालायचा. खूप गर्दी असायची. तिथे एखादा पेशंट गेला की तो बराच व्हायचा. दोघे नवरा-बायको डॉक्टर होते. बोलायला खूप प्रेमळ. त्यांच्या बोलण्यामुळे अर्धा आजार बरा व्हायचा."देव इतकं चांगली माणसे ठेवत नाही. "आई म्हणाली."काय झालं "आई.शितल म्हणाली. "मुलाला कॉलेजला ॲडमिशन मिळालं होतं. मुलगा डॉक्टर होणार होता . खूप आनंद झाला होता. त्यांनी संपूर्ण दवाखान्यात पेढे वाटले होते. मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होता. त्याला भेटण्यासाठी दोघे गेले. येताना साताऱ्याजवळ त्यांचा कारला अपघात झाला. दोघे जाग्यावर संपले होते. स्वतः डॉक्टर असूनही सगळं व्यर्थ होतं होतं. मुलगाही गावी आला. खूप रडत होता. त्यानंतर तो कधी इकडे फिरकलाच नाही. दवाखाना हा तसाच पडून राहिला. लोक डॉक्टरांचा भूत आहे असे म्हणतात. कधी कधी लोक म्हणतात की लाईट लागलेली असते. खरं काय खोटं काय काहीच कळत नाही. दवाखान्यात डॉक्टर भूत फिरत असतात असंही कोणी कोणी म्हणतं. आज चांगला दिवस आहे. तुही आलीस. डॉक्टरांचा मुलगाही येणार आहे. दवाखाना संपूर्ण स्वच्छ करून घेणार आहे. दवाखाना स्वच्छ करायला कोणी धजत नाही . सर्वांना भीती वाटते की भूत आई म्हणाली. आई भूत वगैरे काही नसतं. "शितल म्हणाली.
"ते खरं आहे पण सगळ्यांना समजावून सांगणार कोण. तेवढ्यात तिन कार आल्या. त्यातून काही मुले आणि थोडी माणसे उतरली. दवाखाना उघडला गेला. खूप धूळ होती. इकडे तिकडे कोळ्याने जाळे केले होते. फुटलेल्या काचेतून कबूतर गेलेले होते. त्यांनी सगळीकडे घाण केली होती. आत मध्ये पेशंट झोपायची पलंग तसेच होते. तेव्हाचे कागद पडलेले तसेच होते. सलाईनच्या बाटल्या तसेच पडलेल्या होत्या.
आलेल्या माणसाने हातात खराटा घेतला. घेतला दवाखाना स्वच्छ झाला. लोक येऊन पाहू लागले. बऱ्याच मशीन मुलाने आणल्या होत्या. दवाखाना सुंदर नाव दिलं होतं. आशीर्वाद असं नाव ठेवलं होतं. भुताच्या नावाने अनेक वावड्या उठल्या होत्या. आता मात्र लोक आग्रहाने जाऊ लागले. गावात नसणारे सगळे मशीन आणले होते. दवाखान्यात नवीन तंत्रांचा उपयोग केला गेला होता. कितीही पेशंट क्रिटिकल असेल तरी त्याचा इलाज होणार होता. आज सर्वांना चेकअप फ्री होतं असे आई म्हणाली.
"आई आज भूत कुठे गेलं. माणसे घाबरले नाहीत. डॉक्टर भूत दिसले नाही. "शीतल म्हणाली.
" नाही ग आता तर डॉक्टर पाटील यांचा नवरा बायकोचा दोघांचाही मोठा फोटो लावला आहे. लोकही आल्यावर त्यांना नमस्कार करून जातात. कसलं भूत आणि कसलं काय. लोकांच्या मनातील कल्पना. विज्ञान युगात इतके पुढे गेलो तरी भुताच्या गोष्टी सोडत नाही."
"अगदी बरोबर आहे" शितल म्हणाली.