Pakija Attar

Others

3.8  

Pakija Attar

Others

दैवी आधार

दैवी आधार

4 mins
341


सुगीचे दिवस होते. काम भरपूर होतं. कामाला बायका मिळत नव्हत्या.

"रखमा आहेस का घरी?"

"आले आले. भाऊ तुम्ही या. काय काम काढलयं"

"अगं शेतात कामाला माणूस हवाय तू येतेस काय रोजगार चांगला मिळेल?"

"येते की कवापासून येऊ?"

"आता आवरून ये लवकर शेतावर."असे म्हणत तात्या निघून गेले.

"आय तू सारखी कामाला मिळेल तिथं जातीया."

"काय करू पोरी तुझं लगीन ठरलया पैका नको जमा कराया."

"व्हय खरं हाय तुझं. पण तू काम करून थकशील.

तवा म्या काय करील. तू हाय तर मी हाय. "

"तुझा बा असता तर मी गप्प बसले असते घरी. आता मलाच करायला हवं"

"मी निघते ग"


रखमाने भाकरी गुंडाळून घेतली. शेतावर जाऊ लागली

तिच्या मनात अनेक विचार घोळत होते. लगीन उरकलं पाहिजे. पोर आणखी किती दिवस घरी ठेवायची?

सावकार थोडं कर्ज घेतलं. रखमा ने मुलीचं लगीन लावून दिलं. अंकिता आनंदात होती. हे बघून रखमाला ही आनंद होता.

मुलगा चांगला होता. सासू ही चांगली होती. सगळी काळजी मिटली होती. आता घरातील आणि तिचा बाबू. दोघेच होते. अधून मधून अंकीताची खुशाली कळवीत. दोन वर्ष झाली.

आनंदाला ग्रहण लागलं. एके दिवशी अंकिता माहेरी आली. आईला काय करून काय नको असं झालं. मुलीचा चेहरा पडलेला. ती काहीच बोलत नव्हती. शांत होती.

"अगं अंकिता काहीच बोलत नाही. सासरच्या गप्पा एवढ्या मारत होतीस. आता काय झालंय बोल ना"

"काय नाय झालं"

"असं कसं काहीतरी झालंय त्याशिवाय का तू गप्प गप्प आहेस".

अंकिता रडू लागली. तसे लखमा चे पाय थरथरू लागले.

"ये पोरी अग काय झालं सांग तरी नीट"

"मला मूल होत नाही. यावर्षी झालं नाही तर दुसरं लगीन करणार म्हणतात."

"असं कसं दोन वर्ष झालंय."

"पण त्यांना दम निघेना. मी काय करू आय."

"तुझा नवरा काय म्हणतोय?"

 "आई समोर काहीच बोलत नाही".

"डॉक्टरांना दाखवलं का?"

"डॉक्टरांनाही दाखवलं. औषधी खाल्ले सहा महिने. पण काही उपयोग नाही."

"फाईल आणलीस का इथे मोठे डॉक्टर आहेत त्यांना दाखवून देऊया. बऱ्याच मुलींना मुल होत नव्हतं. त्या डॉक्टरांच्या इलाजा मुळे मुलं झालेत. आपण उद्या त्यांच्याकडं जाऊया."

अंकिताला हायसं वाटलं. आशेचा किरण दिसला.

दुसऱ्या दिवशी रखमा अंकिताला डॉक्टरांकडे घेऊन गेली.

डॉक्टरांनी चेक अप केलं. आधीची सगळी फाईल पाहिली.

हे पहा सगळं औषध उपचार करुन झालेत. पुन्हा करायला लावणार नाही. त्यापेक्षा आयव्हीएफ करूया. पण त्यासाठी खर्च खूप आहे. तयारी असेल तर सांगा मला. काही घाई नाही.

रखमा घाबरली". खर्च म्हणजे किती असेल.?" दोन लाख तरी लागेल. नऊ महिने ट्रीटमेंट चालते. बरेच इंजेक्‍शन द्यावे लागतात" डॉक्टर म्हणाले. अंकिता तर रडूच लागली.

"बघू पोरी उद्या येऊ". असे म्हणत रखमा घरी आली.

ती विचार करू लागली. कसेबसे लगीन केले त्याचे कर्ज फिटले. पुन्हा कर्ज घ्यावं लागणार होतं. पोरी 


तू काळजी करू नकोस."

"अग आयं कुठून पैसे आणणार आहेस?"

"करीन काहीतरी तू फक्त व्यवस्थित ट्रीटमेंट घे. उद्या डॉक्टरांकडे जाऊ. उद्यापासूनच औषध उपचार सुरू करू."

अंकिता आईच्या गळ्यात पडून रडू लागली.

"मी हाय तवर काय काळजी करू नको."

दुसऱ्या दिवशी अंकिता डॉक्टरांकडे गेली. औषध उपचार सुरू झाले. रोज इंजेक्शन घ्यावे लागत होते. वेदना आनंदाने सहन करत होती. तिला बाळ हवं होतं. तिचा संसार वाचवायचा होता. त्यासमोर हे इंजेक्शन काहीच नव्हतं.

फक्त आता देवावर हवाला होता. तोच आता येस देणार.

आई पांडुरंगाचा धावा करत होती.

"पांडुरंगा माझा संसार असा उघड्यावर आहे. माझ्या पोरीला तरी नको असं करू? तिला बाळ होऊ दे. तिचा संसार वाचेल."

"आय काय चाललंय तुझं? काय पुटपुटते?."

"काय नाय. माझ्या देवाला साकडे घालते."रखमा म्हणाली.

एके दिवशी डॉक्टरांनी रखमाला बोलवले." आनंदाची बातमी आहे. तुमची मुलगी आई होणार आहे. पण तिची खूप काळजी घ्यायला हवी. मी सांगेन तसं औषध घ्यायचं. वेळेवर यायचे. चेक-अप ला जेव्हा बोलवतो न चुकता यायचं आहे."

रखमाला खूप आनंद झाला. तिचे पाय जागेवर ठरेना. आनंदात घरी आली. देवाच्या पाया पडली.

तीन महिने झाले. रखमा मुलीला घेऊन चेक-अप ला गेली.

"हे पहा आता खूप काळजी घ्यायला हवी आणि तिच्या पोटात दोन बाळं हे जुळे आहेत हे लक्षात घ्या."

डॉक्टर म्हणाले.

 माणूस मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे. खरंच असं झालं होतं. एका मुलासाठी इतका आटापिटा चालला होता.

तिच्या घरच्यांनाही सांगितलं. सासू खूपच खुश होती.

आता माझ्या मुलीला चांगले दिवस येतील. या विचाराने ती आनंदित झाली.

नऊ महिने सरत आले होते.

डॉक्टरांनी चेक-अप ला बोलावले. "नऊ महिने पूर्ण झाले आहेत. तिचे सीझर करावे लागेल. तिचा बीपी वाढतोय. त्यामुळे काही सांगता येत नाही."


तशी रखमा घाबरली. देवा आता काय घडेल? तिने तिच्या सासू आणि नवऱ्याला बोलून घेतलं.

सिजर करण्या आधी नवऱ्याची पेपरवर सही घेतली. फॉर्म भरून घेतला.

डॉक्टर म्हणाले. "जर तिचा बीपी हाय झाला तर काही होऊ शकते. बाळा आईची दोघांची गॅरंटी घेऊ शकत नाही. आई कधीकधी डायलेसिस वर पण जाईल."

हे ऐकल्यावर रखमा रडू लागली. पांडुरंगाचा धावा करू लागली.

"माझी लाडाची लेक नऊ महिने एवढं सोसलंय. आता तिला पुन्हा त्रास नको देऊ देवा. पांडुरंगा वाचव माझ्या मुलीला."रखमा म्हणत होती. मनातल्या मनात नवसही बोलत होती.

तिचा फक्त ऑपरेशन थेटर कडे लक्ष होतं. काय होईल या भीतीने काळीज धडधड करीत होत.

इतक्यात दरवाजा उघडला. तशी रखमा धावतच गेली. "डॉक्टर काय झालं ?माझी मुलगी बरी आहे ना."

"घाबरू नका. देवाच्या कृपेने सगळं ठीक झाला आहे. गोंडस दोन बाळं झाली आहे. एक मुलगा आणि एक मुलगी."डॉक्टर म्हणाले.

रखमा ने तर साष्टांग नमस्कार डॉक्टरांना घातला.

"अहो हे काय करता उठा".

"माझा पांडुरंग तुमच्या रूपात आला". असं म्हणत आपल्या मुलीकडे धाव घेतली.

आपल्या लेकीकडे पाहू लागले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

बाळांना तिने हातात घेतले..

"बघ माझ्या पोरी बघ. तू आई झाली. एक नाही दोन दोन पोराची"

हे घ्या जावईबापू बाळ आता नाही ना लग्न दुसरे करणार."

"आई असं काय म्हणताय मी थोडी तिला सोडणार होतो."

"पण तसं बोलला पण नाही जावईबापू"

"माफ करा मी चुकलो. तुम्ही बाई माणूस कोणाचा आधार नाही. खंबीरपणे आपल्या मुलीच्या पाठीशी उभे राहिला. मी मात्र तिच्या पाठी उभा राहिलो नाही. खरं चुकलं मला माफ करा."असे म्हणत जावईबापूं रखमाच्यापाया पडू लागला.

"ऊठा ऊठा बाबा झालात. तुम्हाला ही मुलगी मुलगा झाला आहे. दोघांच्याही पाठीशी खंबीरपणे उभे राहा."

रखमा आडानी होती. पण तिने बरेच काही सांगितले.


Rate this content
Log in