Pakija Attar

Tragedy Others

4.5  

Pakija Attar

Tragedy Others

सांजवेळ

सांजवेळ

3 mins
1.2K


पहाटेची वेळ होती. गार वारा अंगाला झोंबत होता. दूरवर काकड आरती चा आवाज येत होता. रेल्वे स्टेशन वर एकही रिक्षावाला नव्हता. रिक्षाच्या शोधात पुढे पुढे जाऊ लागले. चालत जावे लागणार होते. भरभर चालत रमा निघाली. दारावरची बेल वाजवली. दार उघडले गेले.


" अगं ताई, तू सरप्राईज दिलस." प्रतिभा म्हणाली." चिनू आजी आली आहे."असे म्हणताच चिनू बिछान्यातून ताडकन उठली".आजी,आजी"म्हणत नाचू लागली.

"आजी मी ना स्टोरी लिहिली आहे."

"अरे व्वा! माझी छकुली मोठी झाली. स्टोरी लिहिते."

"ताई तुझी नात मोठी झाली आहे . स्टोरी लिहिते .सेकंड ला आहे ना."


तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.चिनू झोपेत होती.ती आजीच्या मांडीवर विसावली. आजीचा हात तिच्या डोक्यावर हळूवारपणे फिरू लागला.तीला भूतकाळ आठवलं 

मुलगा डॉक्टर झाला. त्याचे लग्न करण्यासाठी मुली पाहण्याचे ठरविले. तेवढयात बाबा आले. "रमा आपल्या प्रतिभाची मुलगी डॉक्टर आहे हे माहित आहे ना . दुसरी मुलगी कशाला शोधते?" बाबा म्हणाले.

"ते बरोबर आहे. बहिणीचीच मुलगी म्हणजे काळजी गेली. संख्या बहिणी विहीणबाई".रमा म्हणाली.


रमा ला खूप आनंद झाला बहिणीची मुलगी घरी येणार आहे. त्यामुळे धुमधडाक्यात लग्न करायचं ठरवलं. मुलगी नव्हती अनुला मुलीसारखे लहानपणापासून प्रेम केले होते. तीच आता सून म्हणून घरी येणार. तिचा आनंद गगनात मावेना. आजा पंणजा, मावश्या काका, नंदू बाई, मित्र-मैत्रिणी, शाळेचा स्टाफ सर्वांना आग्रहाचे निमंत्रण दिलं, लग्नात सर्वांचा मान पान केलं सर्वांना आहेर दिला. सगळी कसे तोंड भरुन कौतुक करत होते. बघा बहिणी बहिणी एकत्र आल्या. मुलगा आणि मुलगी सुद्धा लक्ष्मीनारायण जोडा आहे.


लग्न झालं दोन-तीन महिने गेले. अनुने गोड बातमी दिली. दुधात साखर पडली होती. सगळं कसं दृष्ट लागेल असं झालं होतं. आनंदात आणखी आनंदाची भर पडली होती. रमाचे पाय जमिनीवर ठरत नव्हते. आता बऱ्याच वर्षांनी घरात छोटे बाळ येणार होतं. तिने लगेच घरात बदल करायला सुरुवात केली. घरात बाळाला इन्फेक्शन होऊ नये म्हणून बाथरूमचे दार बदलले. बाळा सुरक्षित राहावा म्हणून अनेक घरांमध्ये सुधारणा केल्या.


एकेदिवशी आनंदाची बातमी मिळाली. अनु ला मुलगी झाली. घरात लक्ष्मीचे पाऊल पडले होते. सगळीकडे आनंदी आनंद होता. अनु घरी येण्याचे स्वप्न पाहत होते. अनु घरी आली. बाळाचे ते गोंडस रूप पाहून रमा धन्य झाली.


या सुखाला ग्रहण लागले. अनुला ताप येऊ लागला. डोके पाय दुखू लागले. दवाखान्यात नेले. निदान लागत नव्हतं. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं तिला ऍडमिट करा. सगळे एकदा चेक करून पाहूया. बाळाला घरी आई दवाखान्यात अशी अवस्था झाली. हळूहळू बरे होईल असे सर्वांनाच वाटत होते. रमा देवाला विनवणी करू लागली. अनुला बरं कर. माझं सुख असे हिरावून नको घेऊस. काहीच कळत नव्हते. दिवसेंदिवस तिची तब्येत ढासळत चालली होती. आज मात्र भाजी चपाती पोटभर जेवली होती.


"प्रतिभा आज अनुला बरे वाटते. तिने चपाती भाजी खाल्ली. आता बरी होईल रमा म्हणाली.

रमा भरभर चालत घरी आली. तिला पुन्हा डबा घेऊन जायचं होतं. तिनी सांज झाली होती. तेवढ्यात फोन "आला." आई तू असशील तशी निघून ये"

अरे काय झालं आहे ?आता आले मी"

"तू नीघ पटकन नंतर सांगतो मी तुला" मुलगा म्हणाला. रमाचे पाय थरथरू लागले. छोट्या मुलांनी बाईक काढली. बाईक वरून ती दवाखान्यात गेली.

"काय झालं रे"

"आई अनु गेली."

ती मटकन खालीच बसली. बेशुद्ध झाली.


" ताई अग अशी काय हरवल्यासारखे बसली आहे. चिनू ला खाली झोपव.चहा घे."ताई थोडी झोप थकली आहे. मी ऊठवते थोड्या वेळाने."

रमाने बेडवर अंग टाकले.ती पुन्हा भूतकाळात गेली. अनुचे प्रेत आणले. उर बडवून घेतला होता. रडून रडून डोळे सुजले होते. दुसऱ्यादिवशी शांत बसून घेतले. आयाबाया भेटायला येई. तेव्हा ते विचारत सासु कोण? आई कोण? दोघी बहिणी. रमा कडे पाहताना मात्र वेगळ्याच दृष्टीने बघत. तिला अंगाला काटे टोचल्यासारखे होईल. तिला काळजाला घरे पडे.


"माझी सुन नव्हती ती मुलगी होती. लहानपणापासून माझ्या अंगाखांद्यावर खेळली. फिरायला घेऊन जात असे

माझ्या मुलाच घरटं तुटलं होतं. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं." झोपेतच रडत होती.

"ताई अग काय होतंय? उठ जरा. जागी हो स्वप्न पडलं का?."प्रतिभा म्हणाली." फ्रेश हो. नाष्टा कर."


"हो हो घेते."रमा म्हणाली.

"ताई तुझी नात तुझ्या सारखी हुशार आहे." प्रतिभा म्हणाली हे ऐकून रमा अभिमानाने फुलून गेली.

ती सांजवेळ सूर्य किरणाने व्यापून टाकली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy