Pakija Attar

Others

3  

Pakija Attar

Others

बछडा

बछडा

5 mins
400


पहाट झाली होती. अवनी व तिचे बाबा स्टेशनवर उतरले. अजून अंधार होता. गार वारा अंगाला झोंबत होता. बाबा रिक्षाचा शोध घेत होते.

अवनी आपल्या तीन वर्षाच्या बाळाला आईकडे ठेवून बाबा बरोबर पिरबाबाला जाण्यासाठी आली होती. नाशिक अंतापूर येथे डोंगर आहे.तेथे सर्व धर्माचे लोक पिर बाबांच्या दर्शनाला जातात. अवनी ला बाळ झाल्यापासून ती आली नव्हती. तिचे बाळ आठव्या महिन्यात जन्मलेले त्यामुळे त्याची पूर्ण वाढ झालेली नव्हती. त्याचा एक पाय आणि हात अशक्त होते. त्यामुळे तो त्याची हालचाल करत नसे. बरेच डॉक्टर तसेच फिजिओथेरपी बाळाला देऊन बाळ आता पूर्ण बरा झाला होता. आज तो हात पाय उचलत होता.देवाच्या कृपेने अपंग न राहता चांगला झाला म्हणून ते बाबाच्या दर्शनाला आली होती. बाळ सुदृढ असल्याने त्याला घेऊन डोंगर चढणे जमणार नव्हते. तेवढ्यात रिक्षावाला आला.

"कुठे जायचंय ॽ"
"अंतापुर"
"देवाला निघाला वाटतं"रिक्षावाला म्हणाला.
"होय".

हिरवीगार झाडे गारवा हवाहवासा वाटत होता. अंतापुर आलं. डोंगराच्या खाली देवाला देण्यासाठी फुलं व नारळ घेतला. दोघे डोंगर चढले. सूर्य डोक्यावर आला होता.
रखरखत्या उन्हामुळे अंगाला चटके लागत होते. पिर बाबांच्या समाधीजवळ आलो. थंडगार वारा येत होता. तेथेच रांजण भरून ठेवलेले होतं. पाणी गोड आणि गार होतं. जणू स्वर्ग मिळाला वाटत होतं. प्रत्येक जण येईल गार पाण्याने तृप्त होई. तेथून उठूच नये असे वाटे.

"चल अवनी निघूया." बाबा म्हणाले.
तसे दोघेही भरभर डोंगर उतरू लागले. खाली आलो तर रिक्षावाला समोरच उभा. देव पावला.
"चल बाबा आम्हाला नाशिकला सोड.आम्हाला मुंबईला जायचं आहे. "बाबा म्हणाले.
"अहो कुठे आहे सा .?सगळ लॉक डाऊन झाल. रात्रीच मोदीजींनी सांगितलं. रेल्वे बंद ,एसटी बंद.
काय सांगता ॽ"
अवनीच्या पायाखालची जमीन सरकली. तिला तिचं बाळ दिसू लागल ती रडू लागली.
बाबांना काय करावं ते कळेना. त्यांनी आपल्या पत्नीला फोन लावला.
"हो मला माहित आहे. मी फोन लावत होते. फोनला रेंज नव्हती. आलेल्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे. माझी मैत्रीण आहे नाशिकला. एका छोट्याशा गावात. तिला विचारून घेते. तुम्ही तिथे जा. थोड्या वेळाने फोन करते. "असे म्हणत फोन ठेवला
"हे बघा बाबा तुम्हाला राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. लॉक डाऊन उठलं की निघा." रिक्षावाला म्हणाला.
तेवढ्यात फोन वाजला. "हे बघा माझ्या मैत्रिणीचे आई-बाबा आहेत. काही काळजी करू नका. रिक्षा वाल्याला फोन द्या. मी पत्ता सांगते."
बाबांनी रिक्षा वाल्याला फोन दिला.
"बरं बरं ताई घेऊन जातो बरोबर. माझ्या ओळखीचे आहेत ते काळजी करू नका". रिक्षावाला म्हणाला.
त्यांनी रिक्षा सुरू केली. एका शेताच्या कडेवर असणाऱ्या घराजवळ रिक्षा थांबली.
"हे बघा आल घर. काकी तुमच्याकडे बघा कोण पाहुणे आलेत ॽ"
"अर शिरपा ये आत."
"नाही येतं आता पाहुण्यांना सोडलं. लॉक डाऊन आहे. आमची पण गाडी बंद होईल. चालू आहे तो पर्यंत मारतो चार-पाच खेपा."
"बरे ये पुन्हा" असं म्हणत आजीने पाण्याचा तांब्या पाहुण्यांना भरून दिला.
"काय घाबरू नको आम्ही हाय इथं आरामात रहा. "आजी म्हणाली.
अवनीला भीती वाटू लागली. ती शहरात राहिलेली वाढलेली. इथे तर गाईचा गोठा, शेळ्या, कोंबड्या कसं होणार ॽ मनात विचार येऊ लागले.

"तुम्ही शहरातल्या मुली इथे बरं वाटत नाही माझं नातवंड येतात त्यांच्यासाठी एक रूम बनवलेली आहे. चल तू तिथे रहा." आजीने अवनीला त्या रूम मध्ये नेले. अवनी रूम पाहून थक्क झाली. शहरासारखी खोली तयार केली होती . टीव्ही ,कॉम्प्युटर बाथरूम सर्व सोयी होत्या. अवनीला आता हायसे वाटले.
"आमची मंगल आणि तिचे मुले याच रूम मध्ये राहतात. तू सुद्धा आमची नातच. राहा इथे. जेवणाची काही काळजी करू नको. आम्ही दोघे तुम्ही दोघे कितीसं लागतया. खेडेगावाची थोडी मजा येईल शुद्ध हवा ताजी भाजी तुझी तब्येत सुधारेल "आजी म्हणाली.
"ते सगळं खरं आहे पण माझा बछडा तिथे राहिला आहे लहानपणापासून खूप जपलाय. कधी डोळ्यासमोरून दूर झाला नाही. आता मात्र माहित नाही किती दिवस माझ्यापासून दूर राहील. देवाच्या मनात काय आहे माहित नाही". तिचे डोळे पाण्याने डबडबले.
"बाळा तुझ्या आई जवळ आहे ना ;मग रडू नको काही काळजी करू नको. तू रोज मोबाईलवरून बोलशील " आजी म्हणाली.
"आता तुम्ही फ्रेश व्हा .या नाष्टा करायला मी पुढे जाते."

लॉक डाऊन मुळे काय ही परिस्थिती ओढवली. मन घट्ट करुन रहाणे हाच एक पर्याय होता. एक एकदिवस
डोंगराएवढा जात होता. जाण्याचा दिवस जवळ येत होता. अवनी ला खूप आनंद होता. शेतातल्या गोठ्यातील मज्जा बाळाला सांगायच्या होत्या. तिचे पाय जमिनीवर ठरत नव्हते. उद्या लॉक डाऊन ची मुदत संपणार होती. तिने बातम्या लावल्या. आज मोदीची काय सांगतात याकडे तिचे लक्ष होते. तितक्यात बातमी आली. लॉक डाऊन वाढविण्यात आले आहे. सर्वांनी समजून घ्यावे. तशी अवनी जोरजोराने रडू लागली. आजी धावत आली

"काय झालं अवनी ॽ"
"पुन्हा मुदत वाढवली."
आजी तरी कशी समजवणार होती. आईचं मन होतं किती तग धरेल. तिचे लेकरा विना तगमग आजीलाही पाहावत नव्हती. आई ही जगातली मोठी हस्ती आहे. म्हणूनच तिला आई म्हणतात. ईश्वराच्या आधी आई.... चे नाव घेतले जाते ती आई.
दोन महिने संपले होते. आता जे मजूर अडकले होते. त्यांना सोडणार होते. त्यासाठी रेल्वे व एसटी सुरू होणार होती. परंतु त्यासाठी आधी फॉर्म भरणा भरायचा होता. अवनी धावतच गेली. त्यांनी सांगितले आधी मजूर जातील आणि त्यानंतर बाकीचे मंडळी. अवनी चे पाय गळाले. तिथेच टपकन खाली बसली. जोरजोराने रडू लागली.
"दया येते की नाही कोणाला ?ही माय लेकरा विना तडफडते."

सगळे विचारू लागले. काय झाले का रडते?
बाबांनी सर्व हकीकत सांगितली. त्यांनाही दया आली.
त्यांनी मजुराच्या मध्ये दोन जागा करू तुम्हाला पाठवून देऊ असं आश्वासन दिलं.
अखेर देवाला दया आली होती. अवनी एसटीत बसली. तिने स्वतःला चिमटा घेतला. खरंच आहे का स्वप्न.! एसटी थांबली
ती उतरली जोराने ओरडली रिक्षा....
"अवनी थांब एकही रिक्षा दिसत नाही. आपण विचारूया."
अवनी थांबायला तयार नव्हती. तिचा रुद्रावतार बघून बाबा घाबरले.
"किती लांब आहे माहित आहे का ?इतकी कळ काढली आणखी थोडसं "बाबा म्हणाले
गाय वासरासाठी हंबरते दावणीचा बांध तोडते तशी अवस्था अवनीची झाली होती. तिचे पाय थांबायला तयार नव्हते. तेवढ्यात भाजीचा टेम्पोवाला आला.
"येथे रिक्षा मिळेल का ?आम्हाला शहरात जायचं आहे. "बाबा म्हणाले
"इथे कोणी येणार नाही तुम्ही असं करा माझ्या टेम्पोत बसा स्टॅन्ड पर्यंत पोचतो". टेम्पोवाला म्हणाला
दोघेही टेम्पोत बसली. टेम्पो स्टँड जवळ थांबला. बाबा पैसे देऊ लागले. तोपर्यंत अवणी धावत सुटली.

"अग अवनी थांब "बाबा म्हणत होते.
अवनी ने धूम ठोकली थेट घरातच प्रवेश केला मनू मनू बाळाला हाक मारू लागली.
बाळाला घेतले. तिने कुरवाळले.

माझा बछडा, सोनूला, छकुला, छावा पटापट पापे घेऊ लागली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. बाबा आई हे आई लेकराचे प्रेम पाहून त्यांच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या.


Rate this content
Log in