Pakija Attar

Others

3  

Pakija Attar

Others

सोनू

सोनू

3 mins
934


थंडीचे दिवस होते. गार वारा अंगाला झोंबत होता. चिमण्यांची चिवचिव ऐकू येऊ लागली. सूर्यदेव हळूहळू वर येऊ लागला. "वासुदेव आला वासुदेव आला," आवाज आला.

"आई अजूनही इकडे वासुदेव येतात का ग?"मीरा म्हणाली.

"हो येतात. घराघरातून पसाभर गहू ज्वारी दिली जाते."

मीरा उठली. सुपा मध्ये तांदूळ घेतले." वासुदेवा हे घ्या तांदूळ. "वासुदेवाने आपले झोळी समोर केली. "मुली तू लय भाग्यवान आहेस. तुला पैका कधीच कमी पडणार नाही."असा आशीर्वाद देऊन तो पुढे निघाला. मीरा त्याच्या जाण्याकडे एकटक पहात होती.

तेवढ्यातच आई ने आवाज दिला. मीरा "तुला जायचं आहे ना? आवर लवकर. आणि छोटे मांजरीचे पिल्लू घेणार आहेस ना?"

"होय आई. आई मी बरोबर घेऊन जाऊ शकेल ना.? पिल्लू खूप लहान आहे घरी जायला चार तास तरी लागतील. एसटीत व्यवस्थित बसेल ना? आवाज करणार नाही ना.?".

"अग किती प्रश्न विचारशील?. जरा दमाने घे. त्या पिल्लूचे डोळे अजून उघडलेले नाहीत. तोपर्यंत घेऊन गेलीस तर ते राहील. एकदा का डोळे उघडले. ते पिल्लू राहणार नाही. हे बघ वाटीत कापसाचा बोळा दुधात भिजवून घेऊन जा. आणि त्या बोळ्याने थोडं थोडं दूध मध्ये मध्ये पाज. व्यवस्थित जाशील

काही घाबरू नकोस." आई म्हणाली. मीरा एसटी त बसली. मनामध्ये भीती वाटत होती.

कोणी आपल्याला बघणार तर नाही ना. प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये छान बिछाना केला. त्याच्यावर मांजरीच्या पिल्लू झोपलं होतं. रमेश तिला ओरडत होता. 

"मांजरीचे पिल्लू मुंबईला काय मिळणार नाही का? गावावरून घेतले."

"राहू द्या ते.. मांजर खूप चांगली आहे माणसाळलेले आहे. तिचं पिल्लू हि तसेच होईल." मीरा म्हणाली.

"तसं नव्हे ते अगदी माहेरचा आहे ना" रमेश म्हणाला.

ती आणखीनच रागवली. रागाने लाल झाली. तिने अबोला धरला.

"चला मिराबाई घ्या आपल्या पिल्लूला मुंबईला आलोय" असे म्हणत रमेश सर्व सामान घेऊन उतरला. ते घरी आले. त्याचं नाव सोनू ठेवण्यात आले.

सोनू मीरा चा लाडका झाला होता. मीराच्या पाठी पाठी  फिरत असे. तिच्या पायामध्ये येई. मीरा शाळेत जात असे. ती येईपर्यंत तिची वाट बघत असे घराचं कुलुप उघडून आत येई पर्यंत म्याऊ म्याऊ करत असे. एकदा मीराला खूप ताप आला. ती बिछान्यावर झोपून होती. सोनू तिच्या शेजारी बसलेला होता. त्याने त्या दिवशी काही खाल्ले नाही. मधेच तो तिच्या पायाजवळ जाई. जिभेने चाटत असे. जणू तिला सांगे उठ आता. हळूहळू सोनू मोठा होऊ लागला. अंगाने चांगला जाड झाला होता. पाऊस पडत होता. पावसामुळे इमारतीच्या सज्जावर शेवाळ आले होते. सोनू सज्जा वरून इकडून तिकडे फिरत असे.

रात्री बारा वाजता त्याला दूध ठेवले. मीरा झोपी गेली. पहाटे उठली

सोनू दिसत नव्हता. सकाळी उठताच पायापायात येणारा सोनू शांत कसा ? दूध दिल्यानंतरच शांत होतो. "आज काय झाले? सोनू सोनू" आवाज देऊ लागली. सोनू कुठेच नव्हता. तिने रमेश ला"असेल इकडेच कुठे जाणार आहे तू नीट बघितलेस ना?"

" खरच नाहीये तो"

"अशी रडतेस काय? थांब मी बघतो" असे म्हणत रमेश ने सर्व घर पालथं घातलं. मग तो सगळ्या जिन्यावरून पाहत पाहत खाली उतरला.

"अहो तुमचा सोनू खाली पडला आहे"शेजारचा सुभान म्हणाला.

रमेश धावत सुटला. सोनू पाचव्या मजल्यावरून खाली पडला होता. शेवाळा वरून घसरला असावा. खूप लागलं होतं. मीरा ही धावत आली." माझं सोनू माझं सोनू"असे म्हणत तिने सोनुला उचलले. बाळासारखं हातावर घेतलं. छातीशी धरलं. जोरजोराने रडू लागली. आजू बाजू वाले गोळा झाले. एका मांजरी साठी एवढे रडते हे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले.

रमेशने जनावराच्या डॉक्टरांना घेऊन आला. त्यांनी सोनूला दोन इंजेक्शन दिले. औषध दिले.

"थोडं जपा. खूप लागलं आहे. बरा होईल वेळच्या वेळी औषध द्या. इंजेक्शन दिले आहे झोप लागेल. वेदना कमी होतील. काळजी करू नका बरा होईल"सोनू माणसासारखा कण्हत होता. हे पाहून मीराला आणखीच रडू येत होते. रमेश तिला समजावत होता. हळूहळू सोनू बरा झाला. पुन्हा मीराच्या मागे मागे फिरू लागला

मीराच्या चेहर्‍यावर हास्य फुलले. तिला तिचा सोनू परत मिळाला होता.


Rate this content
Log in