The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Pakija Attar

Others

4.5  

Pakija Attar

Others

शिदोरी

शिदोरी

3 mins
879


नीरव शांतता होती. ओढ्याचा खळखळ असा आवाज येत होता. मधेच फुलपाखरू रान फुलावर भिरभिरत होते. दूरवर कपडे आपटण्याचा आवाज येत होता.

"चल लवकर लवकर सगळ्या बायका निघून जातील आपणच दोघी राहू. भीती वाटते नंतर" सिंधू म्हणाली.

"माझे कपडे आज थोडेच आहेत लगेच होईल"फातिमा म्हणाली.

दोघी ओढ्याकडे आल्या. डोक्यावरील कपड्यांचा टप खाली ठेवला.


"अगं हे बघ मी भुईमुगाच्या शेंगा आणल्यात. कपडे धुऊन झाले की आपण बसून खाऊया."

"अन नंतर शिंदोळया झाडावरच्या काढूया."फातिमा म्हणाली.

"चल आधी कपडे तर धुवूया ."

दोघी कपडे धुऊ लागल्या. सिंधू पाण्यात उभी राहून खडकावर कपडे धुवूया धुवूया आपटत असतानाच ओरडली.

"काय झालं सिंधू?"

"चावलं काहीतरी"

"तो बघ विंचू. तुला विंचू चावला आहे थांब जरा. पाय दे"

फातिमाने लगेच कपड्याने पाय बांधला.


थांब जरा मी ती वनस्पती शोधून आणते मला माहित आहे कोणती वनस्पती लावायची .

तिने ओढ्याच्या कडेला कसलीतरी वनस्पती आणली. दगडाने खडकावर ठेचली. ठेचलेली वनस्पती त्या जखमेवर लावली.

"आता बरं वाटेल. हे मला आजीने शिकवले. वनस्पती चांगली लक्षात राहिली पण त्याचे नाव नाही. चल आता पटकन निघूया."असे म्हणत तिने दोघींचे कपडे पिळले. कपडे टपात भरले. तिला घेऊन घरी आली.

घरी आल्यावर आईला सर्व हकीकत सांगितले. आई म्हणाली "पाहू कसा आहे पाय"

"एकदम ठणठणीत आहे फातिमाने कसलातरी पाला लावला."

"मग बरोबर आहे फातिमाने आजी बरोबर राहून राहून तिने सगळं शिकून घेतलं आहे. तिला बरंच वनस्पतीचे ज्ञान आहे. आजी गेली पण जाताना फातिमाला तिची शिदोरी देऊन गेली. ती सुद्धा आजी सारखीच आहे. आजी अशीच सर्वांना मदत करायची. दूरदूरच्या गावातून लोक यायचे."

सिंधूच्या आईने फातिमाला जवळ घेतले.


"भाभी तुमची मुलगी फार गुणाची आहे. ती आजी वर गेली आहे."

"तसं काही नाही. थोडाफार ती शिकली. तेव्हा छोटी होती. आजी अजून थोडे दिवस राहायला हव्या होत्या."भाभी म्हणाल्या

"तेही खरंच आहे"

"एकदा फातेमा छोटी होती. मौलाना आले होते. म्हणून फातिमाला ओढणी आणायला सांगितले

 ओढणी कपाटात होती. फातिमा जोरात ओरडली. कपाटात बर्फासारखे काहीतरी लागतं. तशी आजी आत आली. "सगळे बाहेर व्हा. निघा लवकर साप आहे त्यामध्ये. हनमा तात्या काठी घेऊन या. कपाटात साप आलाय. "मग खरच साप होता.? " सिंधू म्हणाली.

"हो खरंच साप निघाला. आजी इतकी चाणाक्ष होती. तिच्यामुळे जीव वाचला."

"आजी हुशार होती हो ना आई"

"हो आज फातिमा ला पाहून त्यांची आठवण येते. खरच त्या असायला हव्या होत्या. आज त्यांना किती आनंद झाला असता. त्यांच्या शिदोरीतला खारीचा वाटा त्यांच्या नातीने उचलला होता."

"मला एक आजीची गोष्ट माहित आहे. त्या माणसांनाच मदत करत नव्हत्या. प्राण्यांना सुद्धा मदत करायच्या."

"हो सांग आई मग मला आजी ची गोष्ट" सिंधू म्हणाली


"सांगते ऐका एकदा काय झाले रात्रीच्या वेळेला कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज येत होता. सगळे म्हणू लागले. कुत्रा रडत आहे. त्याला यम दिसतोय. आता कोणीतरी जाणार त्याचा मृत्यू ठरलेला आहे. दोन दिवस कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज येत होता. आजी म्हणाली. "मला वाटतं कुत्रा वेदनांमुळे ओरडत आहे."ती पहाटे उठली. कुत्र्याचा शोध घेतला. कुत्रा पडक्या घरात झोपला होता. त्याला पोटाला मोठी जखम झाली होती. त्यात किडे वळवळत होते. ती तरातरा शेताच्या बांधावर गेली. बांध म्हणजे तिच्या औषधी वनस्पतींची रांग होती. अनेक वनस्पती तिने नीट लावलेल्या होत्या. दोन-तीन वनस्पती ची पानं तिने तोडली. पाट्यावर वाटण केलं. एका डब्यात भरलं आणि ती कुत्र्या जवळ गेली. कुत्र्याच्या जखमेवर ओतले. असे दोन-तीन दिवस तिने केले. त्याची जखम भरली. किडे सगळे मरून पडले. कुत्र्याला आराम झाला. त्याचे विव्हळणे बंद झाले. तो आजीचा हात प्रेमाने चाटू लागला. कुत्रा पूर्णपणे बरा झाला होता. आजीबरोबर बांधावर जायचा. घरी यायचा. आजी जेव्हा देवा घरी गेली. तेव्हा तिच्या पायथ्याशी बसून होता. प्रत्येक जण त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचे. पुन्हा पुन्हा यायचा. त्याच्या डोळ्यातून अश्रू पडत होते. आजीला कब्रस्तान पर्यंत सोडून आला. रात्री पण घरी आला नाही. गावात त्या कुत्र्याची चर्चा होती.


. आजी मुक्या प्राण्यांवर सुद्धा प्रेम करायची.

खरच आजी खूप महान होत्या. आज तिचा वारसा फातिमाने चालविला होता.आजीची शिदोरी अजून जिवंत होती.


Rate this content
Log in