Pakija Attar

Others

4.0  

Pakija Attar

Others

सायकलस्वार देवदूत

सायकलस्वार देवदूत

4 mins
330


II कांदा मुळा भाजी II

II अवघी विठाबाई माझी II


असे गुनगुनत हनम्या शेताला पाणी देऊ लागला. शेतातील एक एक बांध मोकळे करू लागला.

"अरे सोनू उठली तर नसेल?", असे म्हणून तो घराकडे वळला. पाहतो तर काय साप हळूच घरात शिरत होता. पटकन एक कापडाचा तुकडा शोधला. त्या कापडाने सापाचे तोंड पकडले.

"अरे बाबा तू इकडे कुठे चाललास? माझ्या घरी अठराविश्व दारिद्र्य. चल तुला दुसरीकडे सोडतो".

तरातरा चालत एक-दोन शिवार ओलांडले. हात वर नेऊन जोरात पलीकडे फेकून दिले.

"अरे बाबा मला माफ कर. मी पाया पडतो. तू आपला तिथेच राहा."असे म्हणत घरी परतला. दाराला त्यांनं लाकडाचं फळकाटनं लावलं. कडव्याचा पोतं सपोर्टला लावलं. मोत्याला म्हणाला."हे बघ मी शेतात आहे. सोनी कडे लक्ष दे. कोणी आलं का आवाज कर समजलं". कुत्र्याने शेपूट हलवलं. पुन्हा शेताकडे वळला. बांधावरील झाडाजवळ आला.


II वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे II


असे मनात वृक्षांना कुरवाळू लागला. पिवळी पडलेली पाने हळुवार काढू लागला." हनम्या हनम्या..."आई ने आवाज दिला.

हनम्या धावत गेला. पटकन दाराला लावलेली कडव्याची पोतं काढलं . फळकुट काढलं.

"ये आता आई. हे घे पाणी."

तिने पाणी घटाघटा प्यायली.

"हनम्या शाळेत जायचं नाय. वाजलं किती? अन हे बघ. संध्याकाळी तुझ्यासाठी केळीचा खोपा आणलाय.केळफुलाची भाजी करते छान. तू डेरी वाल्याकडे जाऊन ये. हिशोब जरा बघ. काही पैसे दिले तर साखर आण एक किलो."आई म्हणाली.

.हनम्या तयारी करू लागला. त्याला वडील नव्हते. सात वर्षाचा असतांनाच वडील वारले. तो मोठ्या माणसासारखं सगळे काम करी. छोटी बहिण सोनी होती. आई आणि तो शेतात राबराब राबत असत. बाबा अभंग गायचे. लहानपणी तो त्यांच्या जवळ बसून ऐकायचा. त्यांच्याबरोबर बोलू लागायचा.

"आई निघतो ग. केळीच्या खोप्याची दोन पाने घेतो. पायाला बांधतो म्हणजे चटके बसणार नाही."धावतच तो निघाला. शाळा घर दोन कोसावर होतं. गुरुजी रागावतील ही मनात भीती होती.

"गुरुजी आत येऊ."हनम्या म्हणाला.

सगळी मुले फिदीफिदी हसायला लागली. त्याच्या पायातले ती पाने पाहून. गुरुजींनी पाहिले.

"छान हं या केळीची पाने लावलीस पायाला. यांचा शास्त्रीय दृष्टिकोन सुद्धा आहे. केळीचे पान शरीरातील उष्णता कमी करतात. आता उन्हाळा चालू आहे. अगदी योग्य केलं."

सगळी मुले गप्प बसली.

"हनम्या एक नामी संधी आली आहे."

"कोणती गुरुजी?"

"तुला अभंग आवडतात. गातो सुंदर. बरेच अभंग पाठ आहेत. त्याच विषयावर भाषण आहे. मी तुला सगळ मार्गदर्शन करेल. तू छान पैकी बोलून दाखवायचं. मला खात्री आहे वक्तृत्व स्पर्धेत तुझाच पहिला नंबर येईल. जिल्हा स्तरावर ही स्पर्धा आहे. बक्षीस काय आहे माहित आहे का"गुरुजी म्हणाले.

" काय गुरुजी"

"सायकल आहे. तू दोन कोस चालत येतोस? सायकल मिळाली तर किती मजा? तू चांगली तयारी कर."

"करतो गुरुजी". शाळा सुटली. साखर घेऊन हनम्या घरी आला

"आई तोंड गोड कर"

"अरे थांब काय झालंय एवढं?"

"आई मी भाषण देणार आहे. त्यात पहिला नंबर आला की मला सायकल मिळेल. माझा नंबर येणारच."हनम्या उड्या मारत म्हणाला.

"हो हो येऊ दे. पण देवापुढे साखर ठेवून पाया पड". आई म्हणाली.

काही दिवसांनी भाषणासाठी गुरुजींनी जिल्ह्याला हनम्या ला घेऊन गेले. त्याचा पहिला क्रमांक आला. त्याला सायकल मिळाली. त्याचा आनंद गगनात मावेना. गुरुजींचे पाया पडला

सायकल घेऊन घरी आला. आईने त्याला ओवाळले. सायकलचे पूजन केले.

"आई आता तु दुध द्यायला गावाला जायचं नाही. दोन कोस चालत जाते. मी सायकलवर सोनेरी पंख लावल्यासारखे भरकन जाऊन येईल."

"हो रे माझ्या सोन्या"असे म्हणत तिने त्याच्या पापा घेतला.

आता रोज हनम्या शाळेत सायकल घेऊन जाई..

"आई शाळेत जातो ग."

"अरे थांब रडण्याचा आवाज येतोय. बघ काय झालंय?"

हनम्या धावत गेला त्याचे पाठी आई गेली. शांता काकू खाली पडल्या होत्या. काका जोराने ओरडत होते.

"काय झालं काका?"

"काकू खाली पडली आहे ती बोलत नाहीये काय झाले कळेना तिला दवाखान्यात घेऊन जायला हवं."

"बैलगाडी कोणाची आहे का बघा?"

"आता कुठे मिळणार आता साडेअकरा वाजले सगळे शेतावर गेले. बाजारात गेले."

"चला पटकन काकुला उचला. मी सायकलवर बसतो. सीटवर काकूला बसवा. आणि तिला साडी ने माझ्या कमरेला बांधा मी दवाखान्यात घेऊन जातो तुम्ही या पटकन दवाखान्यात "हनम्या म्हणाला.

तो गरुड भरारीने सायकलवर स्वार दवाखान्यात पोचला.

"डॉक्टर डॉक्टर "ओरडू लागला सगळे कसे धावत आले पेशंटला उतरवून घेतलं डॉक्टर तपासून लागले त्यांना तातडीने इंजेक्शन दिले. थोड्यावेळाने डॉक्टर बाहेर आले" पेशंटचा कोणी आले का.?" हनम्या म्हणाला 

"मी आहे आता येतील सगळे.

ते पहा आलेच." सगळे धावतच आले.

"काय झालं डॉक्टर?"

"नशीब फार थोर आहे. त्या लवकर हॉस्पिटलमध्ये आल्या म्हणून बचावल्या. आणखी थोडा उशीर झाला असता तर त्या वाचल्या नुसत्या. या पोराचं कौतुक करावं तितकं कमी आहे. हनम्या पोरा

तू खरंच ग्रेट आहे".

"मी माझ्यापेक्षा माझीही गरुड झेप घेणारी सायकल तिने तर आणला काकुला."

काकांनी हनम्या ला जवळ घेतल. "तू माझा देव झालास. देव तुला सुखी ठेवो. यमुने तू भाग्यवान आहे तुला असं पोर मिळालं." तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. काका धन्य झाले.


Rate this content
Log in