चतुर
चतुर
एकदा राजवाड्यत काय झाले की बादशहा आणि बिरबल गप्पा मारत बसले होते. गप्पा मारत-मारत बादशहा च्या असे लक्षात आले बादशहा बिरबलाला सहज म्हणाला, आपल्या राज्यात आंधळे माणसे किती असतील? बिरबल म्हणाला, नक्की आकडा सांगता येणार नाही. पण..... पण काय बादशहा म्हणाला. डोळस लोकांपेक्षा आंधळ्या लोकांची संख्या जास्त आहे हे मात्र नक्की आहे.
मग बादशहा म्हणाला, काही तरी थापा मारु नका बिरबल. बिरबल म्हणाला, काहीतरी थापा नाहीत, मी सिद्ध करून दाखवतो. झाले, दुसऱ्या दिवशी सकाळी बिरबल एक विणलेली बाज घेऊन भर चांदणी चौकात विणत बसला. दोन कारकून त्याच्या दोन्ही बाजूला देखण्या सरसावून बसले होते. बघता-बघता तेथे तोबा गर्दी झाली. येणारा प्रत्येक माणूस बिरबलाला विचारत होता.हे काय बिरबल काय चालले आहे आज? .
त्या माणसाने असा प्रश्न विचारला की त्याचे नाव आंधळ्या च्या यादीत कारकून समाविष्ट करत.मधूनच एखादा माणूस विचारी, महाराज, आज आपण स्वतः बाज विनत बसला आहात. याचे नाव डोळसांच्या यादीत गणले गेले. हळूहळू बादशहा च्या कानावर ही बातमी गेली.तो स्वतः चांदणी चौकात आला व बिरबलाला म्हणाला, हे काय चालले आहे बिरबल? कारकून बादशहा चे नाव आंधळ्या च्या यादीत टाकले. बादशहा ने ती यादी पाहीली अन् आश्चर्याने म्हणाला, काय माझे नाव आंधळ्या च्या यादीत? '
नमृपणे हात जोडून बिरबल म्हणाला, होय सरकार मी इथे बाज विनंती आहे हे दिसत असूनसुद्धा ज्यांनी, 'हे काय चाललय? 'असे विचारले तर त्यांना आंधळे म्हणायचे तर काय म्हणायचे? ' आपणच सांगा. आपणही तोच प्रश्न केला म्हणून आपलेही नाव आंधळ्या च्या यादीत समाविष्ट करण्यात आले.
माफ करा. ज्यांनी बाज का विणतात आसा प्रश्न विचारला त्याचे नाव डोळसांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. पण या यादीचे पहीले पानही संपले नाही. जाता जाता बिरबल बादशहास म्हणाला, आतातरी खात्री झाली ना डोळसापेक्षा आंधळयाची संख्या जास्त आहे. बादशहा काहीही बोलला नाही फक्त हसला आणि निघून गेला.......
