STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Romance Tragedy

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Romance Tragedy

चित्रपट..

चित्रपट..

2 mins
215

मला आठवतंय, कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक अँड व्हाइट जुन्या टिव्ही वर माझ्या लहानपणी अगदी सहावी, सातवीत असताना 'बुटपॉलीश' नावाचा जुना चित्रपट मी अगदी तल्लीन होऊन पाहत होतो.सभोवतालच्या जगाचा अगदी विसरच पडला होता.त्या चित्रपट कथेशी, प्रसंग नी भावनेशी पूर्ण एकरुप झालो होतो... म्हणून नच की काय त्या चित्रपटातील छोट्या भुकेल्या बहिण भावाच्या कथेचा परिणाम म्हणून डोळ्याला धार लागली होती.. अक्षरशः अश्रू वाहू लागले होते परंतु टिव्ही वरुन माझी नजर मुळीच बाजूला जात नव्हती..

कितीतरी हुंदके देत रडत राहीलो.. टिव्ही नसून प्रत्यक्ष सर्व प्रसंग डोळ्यासमोर घडतोय असं वाटतं होतं नी अश्रू आवरता येत नव्हते..

    छोटेसे भुकेले बहीण भाऊ.. ज्यांचं या जगात कोणीच नसतं...भुकेपोटी गाड्यवरील पाव,ब्रेड चालण्याची वेळ नी पुढे घडणारा प्रसंग अतिशय दुःखद... संवेदनशील मनाला सावरता न येणारं कथानक, चित्रीकरण सर्व काही... अप्रतिम...


   ' दोस्ती '.. कितीतरी जबरदस्त चित्रपट ! अतिशय भावनिक, हृदयस्पर्शी कहाणी.. लंगड्या, आंधळ्या दोन जीवलग मित्राची नी बहिण भावाची विशेष कहाणी...गाणी, कथा,अभिनय, चित्रीकरण कितीतरी जबरदस्त...मन हेलावून टाकणारे कथानक..

    स्वतःच देहभान विसरून टाकणारे, हृदय हेलावून टाकणारे देशभक्ती पर , बॉर्डर, क्रांती, तिरंगा, यासारखे नी परिवार, देवता,घर एक मंदिर यासारखे कौटुंबिक मूल्य रुजविणारे नी बोध देणारे कितीतरी चित्रपट आहेत...

    चित्रपट माध्यम मनोरंजन, संस्कार, मूल्य रुजविण्यासाठी किती जरी प्रभावी असली तरी, अश्लीलता, व्यसनाधीनता, गुंडगिरी, गुन्हेगारी नी बऱ्याच विघातकतेला खतपाणी घालणारे निश्चितच आहे..

    गिरीबा, बेकारी, भिकारी, अश्रू,भुक, चोरी,नी झोपडपट्टी यावर निर्माण झालेल्या चित्रपटांची, करोडो, अब्जावधीची कमाई करुन फिल्मी दुनिया कुठल्या कुठे गेली...अनेकांचे संसार उद्धवस्त झाले, नंगानाच सुरू झाला, रंगेल,नखरेल, गुन्हेगारी जग वाढले.. पैसा मोठा झाला.. पण सुख कशाला, म्हणावे, सुख काय असते हे ना कुण्या फिल्मी दुनियेला कळाले ना समाजाला..माणुस माणुसकीला नी सुखाला पारखा झाला... फक्त भौतिक सुखाच्या मागे दुनिया धावू लागली...पैशात नाचणाऱ्या, बुडालेल्या, बिघडलेल्या या फिल्मी दुनियेवर,नी या समाजावर आता मलाच बनवावा लागेल खरा चित्रपट...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror