भुताची चिंच
भुताची चिंच
तसं घाबरून जाऊ नका पण हे खरं आहे . आपल्या जुन्या गावात एक चिंच आहे आणि ती भुताची चिंच आहे असं बहुतेक म्हातारी माणसे म्हणतात खरं खोटं त्यांनाच माहीत. पण जुन्या गावात शाळा भरायची तेव्हा अनेकदा शिक्षक म्हणायचे कोणती भुतं तिकडं गेली होती लवकर सांगा नाही तर सगळ्या मुलांना छडीचा मार बसेल. मग इतकी सगळी लोक म्हणत असतील तर विश्वास ठेवलाच पाहिजे.
तर गंमत अशी की पुर्वी विठ्ठल रखुमाई मंदिर पासून पायवाट का गाडवाट होती आता ती इतिहास जमा झाली. तर त्या वाटेने जाताना जुन्या गावाच्या अगदी पश्चिम दिशेला लागुनच ही चिंच होती आणि आजही आहे. भुत कधीच मरत नाही म्हणून कदाचित ही चिंच ही जिवंत असावी बहुतेक. असो
या पायवाटेने लोक नदीकडे जायची आणि रविवारी बाजाराला सुध्दा येथुन पुढे जायची. होडी लागण्याचा पानोथा अगदी समोर होता.आजही तिथेच आहे फक्त जाण्याचा मार्ग बदलला आहे. मग माणसं जाऊ लागली की त्या चिंचेकडे बघुन जोरात बोंबलायची ऐ भुता! मरशिल ना उतर खाली नाही तर दगडच घालतो पाठीत. तसं एखादं पोरगं झरझर खाली उतरायचं. पण भुतं काय कधी उतरली नाही.
ही चिंच इतकी चवदार आणि आंबट गोड होती म्हणजे आहे पण मला फार भिती वाटायची वर्गातला एखादा डॅंमबिस मुलगा खिसे भरून या चिंचा घेऊन यायचा मग आम्ही त्याला पेंशिल चा तुकडा देऊन एक बुटूक घ्यायचो आणि लवकर संपणार नाही अशा बेतानेच खात राहयचो. पण मुद्दामच त्या मुलाला विचारायचो का रे तुला तेथे भुताची भिंती नाही वाटत का? तो पण औलादिच तो सांगायचा अरे भुतानी मला धरलच होत पण मी हिंमत करून राम राम राम म्हणत जोरात हिसका दिला म्हणून तर हा सदरा फाटला बघा बघा ! , आणि खरंच त्याचा सदरा फाटलेला असायचा फांदी अडकून पण आपल्याला काय करायचे.
इतकंच नाही तर भुतानी परत माझा पाय ओढला तसा मी धप्पकन खाली पडलो आणि पळतच इकडे आलो. फांदी मोडली हे तो खरं नाही सांगणार म्हणा कारण ही भिती गेली तर सगळी मुलं तिकडे जाऊन चिंचा आनतील मग आपला काय फायदा होणार. असो
असो पण एकदा देवाचा कोप झाला आणि कडाडत विज त्या चिंचेवर पडली तशी ती रात्री पेटली आणि समद गाव खुश झालं ती भुत मेली म्हणून पण कशाच काय दर वर्षी गारसेल चिंचा आल्या की लोकांचं सुरूच असतं ऐ भुता कुठं गेला होता मरायला तिथं भुतं असत्यात माहीत नाही का? बघु बरं किती चिंचा आणल्या आम्हाला दे नाही तर ती भूत पाठलाग करत घरा पर्यंत येतील. अशा वाटुन दिल्या तर त्यांना कळणार नाही कोणत्या घरचं मुलं आहे ते. मग आम्हाला बरं वाटायचं आणि आम्ही अशा चिंचा घरोघरी वाटतंच यायचो म्हणून तर भुतांना घर सापडली नाहीत बहूतेक असो.
आता या चिंचेला चिंचा येतात का ते नाही माहित आणि गावात भुतं पण राहिली नसावी बहुतेक. चला आता सगळी माहिती दिली आहे पुन्हा नका म्हणू पंडित ला सगळं माहीत होते पण सांगितले नाही.
थांबतो आता. काम सुध्दा करावे लागेल ना!

