भिती ( स्फुटलेखन)
भिती ( स्फुटलेखन)


किती भिती वाटते जेव्हा एखादा वाघ समोर येऊन आपल्याकडे आयती शिकार असल्यासारखा बघतो....
देवाचे सोडा, साधे स्वतःचे नाव सुध्दा आठवत नाही जेव्हा कुणीतरी आपल्या डोक्यावर बंदुक ठेऊन विकृत नजरेने पाहत असतो....
कुणीतरी हल्ला करणार हे लक्षात येतं पण कंठ असूनही आवाज निघत नाही....
कितीही धावलो तरी पायाखालची वितभर जमीन मागे सरकत नाही....
वास्तवापेक्षा जरा जास्तच भितो अशा स्वप्नांना!
मध्यरात्री जाग येते आणि मग खोलीभर अंधाराचे दर्शन घडते त्यामुळेच का होईना पण भित्र्या मनाला घाबरण्याचे अजून एक कारण मिळते.
अशा वेळी आपला हात आजूबाजूला आपलं माणूस चाचपडतो.
या सगळ्या भितीपेक्षा ते 'हुश्शश' खूप मोठे असते.
जेव्हा आपल्या माणसाचा हात आपल्या अंगावर असतो आणि ते स्वप्न आहे याची खात्री होते.