विरह
विरह


“पतंग ठाऊक आहे का तुला?”
त्याला दिव्याच्या उष्णतेची झळ माहित असतानाही तो झेप घेतो दिव्यावर फक्त त्याच्या आवडीसाठी!
पण मग मात्र राख होऊन बसते त्याची....त्या आवडीमुळेच..
असच झालाय माझ काहीस....तू दाखवलेली स्वप्नामुळे मी झेप (लग्न केल) घेतली.
पण माझ ‘स्वतंत्र’ आस्तित्वच गमावून बसलेय. अर्थात परतन्त्रात नव्हती मी. पण तुझ्या श्वासात नकीच होती मी!
सगळ्या पुरुषांप्रमाणे तू ही खोटी स्वप्न दाखवलीस मला....यात तुझा काही दोष नाही. पण निदान सत्याची थोडी कल्पना दिली असती तर जरा बर झाल असत.
आज हे सगळ मला जाणवतंय कारण तुझ्यातच मी माझ जग शोधल पण तू मात्र हे जग सोडुन गेलास....निदान ‘तुला आयुष्यभर सोबत देईल’ हे एक तरी स्वप्न पूर्ण करायचं होतस.....खूप खोटा समज होता माझा....मला तरी कुठे ठाऊक होत की हा श्वास तू इथेच ठेवून जाणार आहेस ते? खरतर मी तुला तुझ्या आत्म्यात शोधायला पाहिजे होत...कारण तो तू घेऊनच गेलास ना म्हणून!
असो..
सूर्याच्या उष्णतेने जळून रात्र जशी काळी पडते ना....अगदी तसाच झालय माझ आणि हो तितकीच शांत झालीय...आयुष्याच्या संध्याकाळी माझी ही थरथरती अगरबत्ती आता विझत चालीय अस वाटतंय...एकदा का विझली कि मग तिचा सुगंधही विरून जाईल.....इथल्याच आठवणीसोबत ....
मला थोडा वेळ लागतोय या जगाशी सबंध तोडताना...निदान तेवढा विरह तुला सहन होईल ना?