STORYMIRROR

Surarna Sayepure

Fantasy

1.0  

Surarna Sayepure

Fantasy

खमंग

खमंग

5 mins
16.8K


आयुष्यात काही खमंग घडत नाही मग उगाच कोणाशीतरी भांडायची इच्छा होते त्यातही समोरच्याने फोन उचला नाही की आदळा आपट सुरू (landline ची जागा मोबाईलणे घेतल्याने त्यावरही थोड्या मर्यादा आल्या आहेत). लहानपणी कारण नसतानाही कुथू-कुथून रडायची इच्छा व्हायची ना अगदी तसेच होते.

मनात विचार येऊन जातो आज जर शिव्या देता आल्या असत्या तर निदान त्यावर तरी भागवता आले असते पण छेः तिथे जरा कमीच पडलो आम्ही.

तरीही उरलेल्या वेळात बसमधल्या धक्काबुक्कीत जाडजूड बाईने टकल्याला दिलेली. पहाटे पासून रेशनच्या रांगेत लावलेला दगड कुणीतरी उडवून दिले ल्याच्या नावानी हासडलेली. सरळ रस्त्यावरून आडवे गेल्यामुळे एखादं दिवशी ट्राफिक हवालदारच्या पावतीमुळे स्वतःशीच पुटपुटलेली. अशा अनेकांची जुळवाजुळव करून मनातल्या मनात शब्दप्रयोग करून पाहिले पण शिव्या कोणाला हासडाव्यात हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला.

शाळेतले विद्यार्थी कॉलेजात गेले की, पहिल्या बेंचसाठी असलेली स्पर्धा मागच्या बेंचसाठी सुरु होते.

काॅलेजात होते तेव्हा बरे होते, शेवटच्या बेंचवर बसून उरलेल्या स्वप्नांचा आस्वाद घ्यायचा. नाहीतर, समोर असलेल्या शिक्षकांना पदव्या बहाल करत शेजारच्याशी खुसफुस करायचे! किंवा वहीत काहीबाही लिहून शेजारच्याला दाखवायचे आणि त्यावर खु खु करून घशातल्या घशात हसायचे. एकदा त्याच वहीत मास्तरांनी डोकावले. मग काय-काय झाले याची चर्चा तूर्तास नकोच. कारण, हातावरचे वळ माझे भविष्य नाही पण कॉलेज बदलण्यास मात्र पात्र ठरले.

काहीही असो, पण आतला जातिवंत कलाकार काही मरत नसतो. मग त्या कंटाळवाण्या तासास, शिक्षकांच्या गोंडस मेंदुच्या पृष्ठभागवरचे दोन-तीन केस कधी वहीवर उतरतील काही सांगता येत नाही! मग काळ्या कपड्यात बांधलेला बागुलबुवा कसा असतो अगदी तसेच काहीसे चित्र तयार व्हायचे.

त्यात कोण कुठल्या काळात नेऊन फेकेल याची शाश्वती देता येत नाही. कुणीतरी एकदा महानुभवपंथांनकडे नेऊन सोडले. त्यांचे संपूर्ण चारित्र्य म्हणजे आमच्यासाठी फक्त ऑब्जेक्टिवचे दोन मार्क! यापेक्षा मोठी थट्टा या जगात असूच शकत नाही. त्याच दिवशी ठरवले आपले चारित्र्याचा लोकांना अभ्यास करावा लागेल अशा कोणत्याही थोर उचापती करायच्या नाहीत!

त्यामुळेच का काय पण, फळ्यावरची खरपडी वहीत उतरवणे माझ्याच्याणे कधी जमलेच नाही त्यात

ही घरची अर्थव्यवस्था सांभळण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायला लावणारी व्यवस्था माझ्या काही पचनी पडली नाही!

कधी-कधी मुलांचे लक्ष आहे कि नाही हे चेक करण्यासाठी मास्तर कुणालातरी मध्येच प्रश्न विचारायचे, एकदा मराठीच्या तासाला बाकाचा एक त्रीतीयांश भाग व्यापणाऱ्या ‘ढोलकपुरकारला’ उभे केले. आणि विचारले,

’समोरच बेवारस नोटांचे बंडल पडले होते’ या वाक्यातली संधी ओळख”

“मग मी चिंधीला घेऊन हॉटेलात जाईल” असे मनातल्या मनात म्हणून तो मठ्ठ सारखा पुन्हा मास्तरांकडे पाहू लागला. संबंधित विद्यार्थ्याला उत्तर देता आले नाही की मास्तर म्हणायचे,

“अरे आठवे आश्चर्य पाहिल्यासारखे काय पाहतोस माझ्याकडे, येत नाही सांग ना सरळ.” या वाक्याचे पेटंट त्यांच्याचे नावावर असल्यासारखे ते वापरायचे. किमान अर्धा तासाच्या लेक्चरमधला पाऊनवेळ तरी हे म्हणण्यात घालवायचे. आणि अश्या प्रकारे त्यांनी अनधिकृत रित्या स्वतःला आठवे आश्चर्य ठरवलेही होते.

मग त्याला उत्तर आले नाही की 'लाली’ लागलीच उभी राहून स्त्रोत्र म्हणाल्यासारखे ते उत्तर सांगायची. तिच्या मेंदूत एक किती जीबीची चीप बसवली आहे हा संशोधनाचा विषय मी पी.एच.डी. साठी राखून ठेवला आहे.

मात्र, ती उभी राहिली कि नैऋत्य वार्यांचा परिणाम जसा ईशान्येस दिसून येतो तसे लालीच्या बाबतीत व्हायचे. ती मुलींच्या रांगेतून उभी राहिली कि सगळे लगेच मुलांच्या रांगेत ‘पक्याकडे’ माना वळवायचे.

मास्तरांस मात्र या मान्सून वार्यांचा कधीच शोध लागला नाही.

दोघे लाज-लाजून चुर् व्हायचे. मग लालीचे स्तोत्र संपल्यावर ‘ओम पक्याय नमः’ असे स्वगत म्हणून ती पक्याकडे चोरून नजर टाकायची आणि खाली बसायची. अशी अनेक प्रकारची वादळ कधी पूर्वेकडून पश्चिमेकडे तर कधीकधी कुणाच्यातरी चुकीच्या उत्तरामुळे दक्षिणेकडे वळायचे.

असो!

पण एवढा सगळा एकविस शतकांचा इतिहास एका शतकात म्हणजे शंभर मार्कात बसवणे म्हणजे एक कलाच!

यासाठी मी आपल्या शिक्षण व्यवस्थेला धन्यच मानते!

थोडक्यात,

शेवटच्या बेंचवरून एक-एक उलगाडणारा शतक. त्यांची चित्रे आणि त्यांना बसवलेली गुणांची चौकट आणि त्या इतिहासाला फोडणी म्हणून की काय पण चहाच्या टपरीवर अभ्याक्रमा व्यतिरीक्त केलेली रीव्हिजन. असं काही खमंग घडतच नाही हल्ली!'


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy