AnjalI Butley

Abstract Thriller

4.0  

AnjalI Butley

Abstract Thriller

भेट सारथीच्या घरच्यांशी

भेट सारथीच्या घरच्यांशी

4 mins
131


प्रवास म्हटले की खूप काही डोक्यात येत, नविन प्रवासाला जायच म्हटले की कुठे, कसे, कोणासोबत जायच हे ठरवाव लागत,.

न पाहिलेल्या, लांब हवामान वेगळ असलेल्या भागात एकदा तरी जाव ही मनात ईच्छा होती. ती अमलात आणायला चौकशी करणे सुरू झाले, हा नाही तो टूर अॉपरेटर चांगला, या भागासाठी ह्या टूर अॉपरेटरच नाव चांगल आहे हे काही मैत्रिणींनी सांगितले.

मग अॉपरेटरच्या अॉफिसमध्ये जाऊन भेट घेणे सुरू, त्यांच्यातील चढा ओढ आम्ही कसे हटके आहोत वैगरे!

हिमालय रांगा साद घालत होत्या, हिम शिखरे बघु असे, टूर अॉपरेटर माहिती देत असतांना ठरले, 

संपुर्ण क्षेत्रात फिरतांना एका गाडीत सारथी सोबत जास्तीत जास्त चार जण असणार, तुमचा चार जणांचा गृप असेल तर चांगलच! ह्या सिझनची शेवटची ट्रिप पंधरा दिवसांनी आहे, थोड्याच जागा शिल्लक आहे, विमानाचे तिकिट तुम्ही काढणार की आम्ही काढायचे!

एक एक करत चार जणांचा आमचा गृप झाला व ट्रिप चे बुकिंग केले.

एका प्रवासात वेगवेगळे अनुभव घ्यायला सुरवात झाली, 

श्रीनगर लेह लडाख, एक दम खुश! थंडी, बर्फ, उंचावरची गावे, अॉक्सिजन कमी असतो, सोबत काय काय घ्यायची ह्याची लिस्ट अॉपरेटरे दिली होती... त्याप्रमाणे खरेदी करून झाली!

विमान प्रवासाची तिकिटे आम्ही आमची बुक केली होती, कारण एयर इंडियाचेच तिकिट आम्हाला हवी होती. 

स्वतःच खूश होतो आपल्या ह्यावेगळ्या प्रवासाचा बेत आखतांना!

आठ दिवसावर प्रवास आला असतांना, श्रीनगरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, दरड कोसळत असल्यामुळे, या भागात प्रवासकरता येणार नाही, टूर रद्द करतो, तुमचे पैसे तुम्हाला परत करू किंवा पुढच्या ट्रिपमध्ये अॅडजेस्ट करू असा फोन आला अॉपरेटून कडून, आता काय करायचे हा प्रश्न, सुट्टी घेतलेली होती, दुसर्या कुठल्या ट्रिप आहेत हे विचारले,

हिच ट्रिप, लेह वरून सुरू करता येईल का? अॉपरेटरला कल्पना आवडली, विचार करून सांगतो..

थोड्यावेळाने त्याचा फोन आला, हो आपले आधीचे बुकींग हॉटेलची झाली आहेत ते तयार आहे बदल करण्यास, पण श्रीनगर ला जाता येणार नाही, बदल केलाला प्रवासाचे डिटेलस् पाठवले, बघुन तरी काही हरकत नाही, चला जायला मिळत आहे ह्याचाच आनंद! 

आधीची विमान तिकिट कँसल करत नविन तिकिटे काढली! अर्थातच माहगडी, पण असो आनंद घ्यायचा होता प्रवासाचा!

जायचा दिवस उजाडला मुंबई ते दिल्ली व दिल्ली ते लेह! प्रवासाला सुरवात झाली, दिल्ली ते लेह प्रवासात विमानाच्या खिडकीतुन हिम शिखरे बघतांना खूप आनंद झाला! लेह एयरपोर्टवर उतरल्यावर आमचा सारथी गाडी घेऊन हजर होता, पुढील पाच दिवस तो आमचा सारथी होता, लेह पासून त्याचे गाव जवळ होते. प्रवासी दौरा असतांना त्यांची सोय अॉपरेटर करून देत असे. 

जवळपास १२ इनोव्हा कार होत्या म्हणजे १२ सारथी होते! 

त्यांना सवय होती त्या बर्फाळ, उंच प्रदेशातील अरूंद रस्त्यावर गाडी चालवायची,

घाबरूनच होतो.. सारथी कमीच बोलायचा, हिंदी थोडच यायच म्हणून असेल, बाकी सारथींपेक्षा आमचा सारथी चांगला आहे असे अॉपरेटने सांगितले. शांत होता. 

भरोसा त्याच्यावर सोडून आम्ही प्रवासाचा आनंद घ्यायच ठरवले!

एक चांगले होते छोट्या एका गाडीने आपल्या छोट्या गृप बरोबर प्रवास करतांना सारथीला ठरलेल्या पेक्षा इतर स्थानांचीपण माहिती जमल्यास थोड थांबुन बघायच! 

एकदा प्रवासात रस्त्याच्या कडेला त्याला त्याची मावशी भेटली, ती लडाखी पोषाखात होती. त्याने गाडी थांबवत, खुणेनेच आम्हाला थोठा वेळ द्या मी बोलुन येतो.. 

मावशी बरोबर आम्हीही फोटो काढून घेतले, भाषा समजत नव्हती तरी देहबोलीवरन आनंद झाला ह7 कळले, तीथे जवळज ५००मीटर खोल दरीत त्यांच घर होत. वरन छोटस घर दिसले! 

गंमत गंमत करत सारथीला तुझ्या घरी येतो म्हटले, तो पण हसत हो म्हटला, पण इतर प्रवाश्यांबरोबर आताच ते शक्य होणार नाही, परतीच्या प्रवासात जाऊ म्हटला!

कारगिल बघुन परतीच्या प्रवासात तो इतर सारथ्यांपेक्षा समोर होता, कारण त्याला आम्हाला त्याच्या घरी घेऊन जायच होत, आमच्यामुळे त्यालाही घरी जायला मिळणार होत एक महिन्यानी! खोल दरीत त्याच घर असयामुळे रस्ता असा पायवाटवालाच होता, पण तो शिताफीने गाडी चालवत होता, एक दोन ठिकाणी जवळपास ७०-८० कोण असलेला उतार होता, परत येतांना काही खर नाही हे लक्षात आले! 

त्याच्याघरी त्याची आई, मावशी, बहिण व बहिणीचे दोन छोटी मुले आहे असे सांगितले! बघता बघता त्याच्या घरासमोर आम्ही पोहचलो, घरा समोर मोठी मोकळी जागा होती, नदी सोरखे वाहते झरे, एका तीरावरू दुसरी कडे जायला लाकडी पुल! एका वेगळ्याच राहणीमान जवळून बघत होतो हरखून गेलो! दोन मजली घर, खाली चारा, गाई, याक सारखा दिसणारा प्राणी होते, छान बाग होती, रंगीबेरंगी फुले असलेली झाडे!, निमुळता जिना, लाकडी घर होत, हसर्या मुखानी सगळ्यांनी आमच स्वागत केल, न सांगता गेलो होतो, छोट्या घरातील एक मोठी खोली यात लामाचा फोटो, बुद्धमुर्ति होती, घरातील सगळे मिळून बसून प्रार्थना करणारी खोली, थंडीत घरी असतांना स्वतःला देवाशी संवाद साधुन उर्जा मिळवायला!

एक बसकी खोली, खाली वाकुनच आत जायच ती आपली लिव्हिंग रूम, आम्हाला बसायला जागा केली, घरातील सगळे आम्हाला भेटायला आले, मावशी होतीच, तीने तीच्या वेण्या आम्हाला उडवुन दाखवल्या, 

छोटे मुले जवळ आली, त्यांची गोबरी गोबरी गुलाबी गाल ओढण्याचा मोह टाळत जवळची बिस्किट, व थोडा खाऊ फरसाण दिला! त्याची बहिण नोकरी करत असल्यामुळे हिंदी थोड बोलत होती, तीने आमच्या कडचा चहा थोडा घ्या वेगळा असतो, सॉल्ट टी, पहिल्यांदाच एकल, चहात मीठ, कल्पना करवत नव्हती पण तीने चहा पॉट चायनीच पाढर्यावर नीळी नक्षी वाले कप,टी सेट मधुन चहा आणला, रंग चहा सारखाच होता भरपुर लोणी टाकुन साखरे एवजी मीठ! गरम छान वाटला!

चहा घेतल्यावर परत निघण्याची घाई, 

सारथीपण आईला भेटून आनंदी झाला, परत निघतांना दुसरी वाट बघ ही खूप भीतीदायक आहे, चढणावर तर खूपच भीती वाटत आहे, तो आम्हाला शांत पकडून बसा म्हणाला, देवाचे नाव घेत शांत बसलो, बघता बघता मेन रस्त्याला लागलो, सगळ्यात पुढे असणारो सगळ्यात मागे राहिलो कोणी विचारलो तर गाडीत थोडा बिघाड झाला म्हणून गाडी हळू चालवली म्हणून मागे राहिलो सांगायच ठरले! 

सगळ्या प्रवासातील हा अनोखा प्रवास जास्त भावला! प्रवासातील प्रवास!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract