Arun Gode

Classics

3.4  

Arun Gode

Classics

बालमित्र

बालमित्र

6 mins
223


     एका साधारण शहराच्या नविन बसलेल्या नगरात दोन लहापणीचे लंगोटी मित्र जवळ-पास थोड्याच अंतरावर स्वतः च्या घरात राहत होते. दोघे रोज मिळून शाळेत जात होते. ते वर्गात पण एका-मागे-एक असे चटई वर प्राथमिक शाळेत शिकत असतांना बसत होते. शाळेत व नगरात ते नेहमी सोबतच खेळत होते. त्यांची जोडी सर्व शिक्षकांना माहित होती. ते दोघेही प्राथमिक शाळेच्या अंतिम वर्षात असतांना अरुणच्या मोठ्या भावाचे लग्न होणार होते. अंतिम परिक्षे नंतर दोघे ही लग्नाच्या कामात व्यस्त झाले होते. त्यांनी लग्नात कामा सोबतच लग्नाचा भरपुर आनंद लुटला होता. आता पुढ्च्या वर्षी नविन शाळेत जाणार याची त्यांना फार आनंदा सोबतच ऊत्सुकता पण लागली होता. त्यासाठी त्यांनी गावांतील नामांकित शाळेत प्रवेश मिळावा म्हणुन अर्ज पण आणला होता.नकट्टीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न. त्यांच्या वर अचानक आभळा इतके मोठे संकट कोसळले होते. अरुणच्या घरवाल्यांनी एक निर्णय घेतला होता कि समोरचे शिक्षण तो लग्न झालेल्या मोठ्या भावाच्या गांवी घेईल !. आता त्यांची ताटा-तूट होणार होती. त्यामुळे ते दोघेही सापळ्यात अडकल्यामुळे नाराज झाले होते. आता या वर काही तोडगा नव्हता. माध्यमिक शाळेच्या शिक्षणासाठी अरुण दुस-या शहरात व गुणवंता त्याच गांवातील शहरात शिकत होता. अधुन-मधुन काही सण साजरे करण्यासाठी अरुण आपल्या वडिल भावासोबत येत होता. तेव्हा ते दोघेही निवांत एकमेका सोबत वेळ घालवत होते. असा त्यांचा हा दोन वर्षाचा प्रवास तेव्हा संपला जेव्हा अरुणच्या भावाची दुस-या ठिकाणी बदली झाली होती. तेव्हा अरुणने तो आता आपल्याच गावांत शिकीन असा हट्ट धरला होता. प्रयत्नांती परमेश्र्वर .शेवटी तो जिंकला व त्याने आपल्या मित्राच्या शाळेत दाखला घेतला होता. जरी ते अलग-अलग वर्गात होते तरी ते सारखे एक-मेका सोबत भेटत आणी राहत होते.ही त्यांची मित्रता आता ब-याच शिक्षकांच्या लक्षात आली होती. त्या दोघांनी पुढील वर्षी सरांना विनंती करुन एकाच वर्गात आले होते. त्यांची जोडी शाळेत चर्चेचा विषय होता.नेहमी सोबत आणि जवळ-पास शरीर प्रकृतीने आणि रंगाने कमी-जास्त एक सारखेच दिसत होते. त्यामुळे बरेच शिक्षकांना नेमका अरुण आणि गुणवंता कोण यात नेहमी भ्रम होत होता. दोघांनी शालंत परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली होती. नविन अभ्यासक्रम प्रमाणे त्यांनी अकरावींच्या प्रथम तुकडी मधे प्रवेश घेतला होता. पण उत्तम दर्जाच्या अनुभवी कनिष्ठ प्राधापकांची कमी असल्यामुळे अरुणने जिल्हा स्तरच्या कनिष्ठ महाविद्यालयात जाण्याचे ठरविले होते. पण या निर्णयाला गुनवंताच्या घरातील जेष्ठांचा विरोध होता. त्यामुळे त्याच्या मित्राची इच्छा असतांना सुध्दा त्याला अरुणचा साथ देता आला नाही. हीच त्यांच्या दोस्तीला मिळणारी कलाटणी होती. दोघांचेही मार्ग आता वेग-वेगळे झाले होते. आता दोघां जवळ पण एक-दुस-यासाठी वेळ नव्हता. अरुणला त्या कॉलेज मध्ये चांगले प्राध्यापक मिळाले होते.पण मिळालेला संधीचा तो सोन करु शकला नाही, कारण त्याचा अधिकत्तम वेळ हा जाण्या-येण्यात रोज खर्च होत होता. आणि अतिपरिश्रमामुळे त्याची शारिरीक क्षमता आणी स्वास्थ दिवसेंदिवस ढासळत चालली होती. तो बहुतेक सारख आजारी पडत होता. पावसाने भिजवले अन नव-याने झोडपलेली तर सांगनार कोणाला ?. शेवटी त्याने कसी-तरी तैयारी करुण बारावीं बोर्डची परिक्षा दिली होती. लगेच स्वास्थ कारणाने त्याला मोठ्या दवाखाण्यात भरती करण्यात आले होते. तिथे त्याचा बर बरेच दिवस उपचार करण्यात आला होता. शेवटी त्याला डॉकटरांनी समोर अतिपरिश्रम करण्यास मनाई केली होती. व स्वतःच्या प्रकृतिची नीट काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याचा मित्र पण पास झाला होत.तो गणितात कमजोर असल्यामुळे त्याने जीव-विज्ञान शाखेची निवड केली होती. त्यामुळे त्यांची पुन्हा फाटा-फुट झाली होती. दोघेही अलग-अलग शहरात आपले शिक्षण पूर्ण करित होती. अरुण ने स्नातक व नंतर स्नातकोत्तर पदवी मिळवली होती. पण त्याच्या मित्राचे शिक्षण हे रखडले जात होते. शेवटी अरुणला केंद्र सरकारीची नौकरी लागली होती. व त्याची तैनाती ही दुस-या राजात झाली होती. पण त्याच्या मित्राचा अजुन पर्यंत ठाव-ठिकाणा लागला नव्हता. अरुणचे लग्न पण झाले होते.मुलगी बघण्यासाठी तो पण सोबत होता. लग्नात गुणवंताचा जो भरपुर साथ आणि उपस्थिति अरुणला मिळाली होती. ती नंतर कधीच मिळु शकली नव्हती. आता अरुण त्याच्या बालमित्र आणि अन्य वर्गमित्रां पासुन खुपच दूर-दूर होत गेला होता. त्याचे जग वेगळे झाले होते. इच्छा नसतांनाही त्यांच्या मध्ये एक कायमचा दुरावा परिस्थिति मुळे निर्माण झाला होत.कालंतराने त्याच्या बालमित्राला पण राज्य सरकारची नौकरी मिळाली होती. त्याने एका शिक्षिके सोबत लग्न केले होते.


     काळा सोबत सर्वच वर्गमित्रांची फाटा-फुट होऊन प्रत्येकाने आपल - आपला मार्ग निवडला होता. आणि आप-आपल्या संसारात लागले होते. कधी-कधी मैत्रीचा ओलावा मनात घर करत होता. पण सांसारिक व्यस्ततेमुळे तो ओलावा शुष्क होत होता तरी पण तो कायम होता. काही मित्रांची परिस्थिति चिंध्या वेचलेल्या अन गोदडया शिवलेली असल्यामुळे ते पूर्ण शिक्षण घेवु शकले नव्हते. त्यांच्या पैकी काही मित्र जन्म गांवातच आपले भरण-पोषण करित होते. तर काही अन्य शहरात किंवा गांवात आपल्या आपल्या योग्यता व क्षमतेनुसार आपली-आपली जीविका चालवत होते. पण तीन मित्र एक-दुस-याला काहीच कल्पना नसतांना कळत न कळत संत्रा नगरी मधे सेवानिवृत्तिच्या आधीच स्थाई झाले होते. त्या पैकी दोघे अचानक एका मॉल मधे मिळले होते. एक –मेका कडे बघुन आपल्या वर्गमित्राची ओळख पटवुन घेण्याचे बेतात असतात. तेव्हाच त्यांचा अंतरात्मा एक-मेकाला आवाज देतात. व तीथेच त्यांची खात्री पटते व ते खूपच आनंदीत होवुन एक-मेकाला घट मिठी मारतात. दोघांचे डोळे आनंदामुळे ओलावतात. स्वतःला साभांळल्या नंतर त्या दोघांचा पहिला प्रश्न होता कि तुला काही अरुण विषयीची माहिती आहे काय ?.पण त्याच्यां जवळ त्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. पण त्यांना आता आत्मविश्र्वास झाला होता की एक दिवस तो नक्कीच त्यांना गवसणार !.


    अचानक गुनवंता एके दिवशी आपल्या भावाकडे जन्मगांवी गेला होता.तिथे वडिलभावाचा मित्र अचानक त्याच्या भावाला भेटाला आला होता. औपचारिक संवाद सुरु असतांना त्याने अरुणचा उल्लेख केला होतो. तेव्हा तो त्याला सांगतो कि अरुण पण नागपुरातच राहतो. तो त्याला त्याचा मोबाईल नंबर देतो. मोबाईल नंबर मिळाल्या-मुळे त्याला गगणात मावेनासा इतका हर्ष होतो. नागपुरला आल्यानंतर तो श्रीकांतला ही गोड बातमी देतो. तेव्हाच ते अरुणला संपर्क करतात. अनोळखी नंबर बघुन तो विचार तो की आपन कोन बोलत आहे. तेव्हा तिकडुन परिचित असा आवाज येतो. अरे अरुण मी गुनवंता बोलत आहे. हरवलेल्या मित्राचा आवाज ऐकुन अरुण आनंदाने त्याला विचारतो. अरे तु कसा आहे. आणि कुठे असतो.तेव्हा तो म्हणतो अरे मी आणि श्रीकांत एकाच उप-नगरात नागपुरात राहत असतो. ही आनंदाची बातमी ऐकुन तिघेही खूपच आनंदी होतात. ते दोघेही अरुणच्या घरी येण्याचा कार्यक्रम बनवतात. एके दिवशी ते सर्व अरुणच्या घरी मिळतात. आनंदाने आणि हर्ष-उल्हासाने एक-मेकाशी गळाभेट करतात. जुन्या-पुराण्या घडलेल्या सर्व घटना-गोष्टी उखरुन-उखरुन काढातात आणी आनंदी होत होते. नंतर ते नेहमीच हमखास भेटत होते. सेवानिवृत्त झाला मुळे तेव्हा त्यांच्या जवळ मुबलक वेळ होता. तेव्हा त्यांनी ठरवले की सर्व वर्ग-मित्रांना एकदा तरी एकत्र करु !. त्यासाठी ते तीघेही आपल्या मुळगांवी जावुन गांवातीला मित्रांना भेटले होते.त्यांना पण अतिशय आनंद झाला होता. तेव्हा ते आपला वर्गमित्रांचा मेळावा घेण्याचा विचार त्यांच्या समोर ठेवतात. शाळेत जावुन सर्व मित्रांची यादी बनवतात. शाळेच्या प्राचर्यांशी आपल्या योजने विषयी बोलतात. त्यांना वर्गमित्र पुनरमिलन कार्यक्रमासाठी शाळा देण्याचा आग्रह करतात. माजी विद्दार्थांच्या भावनांचा आदर करुन प्राचार्यांनी शाळा सुट्टीच्या दिशी देण्याचे आश्वासन त्यांना दिले होते. नंतर ते एक वाट्स-अप-ग्रुप बनवुन सर्वमित्रांना ग्रुप मधे जोडले होते. नंतर त्याच्या मनात असलेली कल्पनेचा एक संदेश त्यांनी गृप मधे टाकला होता. त्या गृप मधील संदेशाला सर्वांनी लगेच हाती उचलुन धारले होते. आता आपली योजना राबवण्यासाठी नागपुरचे तीन मित्र आणि स्थानिय मित्र कामाला लागले होते.आकाश-पाताळ एक करुन त्यांनी वर्गमित्र पुनरमिलन भव्य कार्यक्रम यशस्वी केला होता. त्या कार्यक्रमात त्यांच्या वेळेचे जे जीवीत शिक्षक होते. त्यांचे त्यांनी पारंपारिक पध्दतिने स्वागत केले होते. त्यांनी आपल्या भाषणात सर्व विद्यार्थ्यांना आपले आशीर्वाद आणी समोरच्या उर्वरित जीवणा साठी शुभेच्छा दिल्या होत्या.प्राचार्यांनी सर्व विद्यार्थांचे तोंड भरुन प्रशंसा केली होती.त्यांना अशा प्रकारचा अनोखा कार्यक्रम घडवुन आणल्या बद्दल सर्वांची स्तुथि केली होती. मित्रांचे पुनरमिलन कार्यक्रममुळे सर्वमित्र एकदम भारावुन आणि तनावमुक्त दिसत होते.त्यांच्या कडे पाहुन जणु असे वाटत होते कि ते पुन्हा त्याच शाळेत शिकायला आले होते ! 



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics