ANJALI Bhalshankar

Classics

3.5  

ANJALI Bhalshankar

Classics

अश्रु.....

अश्रु.....

1 min
137


मनाला आलेली भरती,म्हणजे अश्रू.पाणी ही तसेच खारटं समुद्रासारखे. मात्र प्रत्येकाचे भिन्न काळ,स्थळ, परीस्थिती,वेळ, भावना,वेदना,आनंद दुःख, हरवणारे,सापडणारे, दुर,जाणारे परतून येणारे,गमावविणारे कधी मिळविणारे, खरे, खोटे.हसविणारे तर कधी रडविणारे सुद्धा अश्रूच! माणसांच्या मानसिकतेनुसार, नुसार बदलणारे अश्रू.अश्रूंना थोपविणारे सुद्धा अश्रूच! या जगात बाळाने घेतलेलया पहिल्या श्वासावेळी मातेच्या पान्हयासह तिच्या डोळयात तरळलेले आनंदाश्रू. सासरी चाललेल्या लेकीसाठी जन्मभर थोपविलेले पित्याचे प्रेमळ अश्रू. बहिणीच्या सुखासाठी भावाने केलेली जुगाड,पाहून तिच्या डोळयातले कृतार्थ अश्रू.अडचणित खंबीरपणे मागे असलेल्या जीवलग सदैव पाठीशी ऊभारलेलया मित्रा साठीचे आभारांचे,अश्रू.मैत्रीणी संखयाचे बालपणीच्या, आठवणींचे अश्रू.प्रियकर प्रेयसीचे विरहाचे अश्रू.पतीचे कष्ट मरमर,कुटुंबाच्या जबाबदारया पार पाडताना होणारी धावपळ, धांदल पाहून पत्नीच्या डोळयात ओघळणारे काळजीचे अश्रू.घामाच्या थेंबात ऊभा जन्म न्हाऊन,मोठे केलेल्या मुंलानी अपमाणित केल्यावर वृद्ध माता पित्याचा डोळयात आलेले लाचारीचे अश्रू.दुसर्याचे दुख पाहुन कुत्सित हसणारे छद्मी अश्रू शब्दाचे नाटकी मुखवटे चढवून घाव घालणारे कपटी अश्रू.आणि माणसांचे दुःख जाणून यातनांच्या संवेदनांना ओळखून न बोलता व्यकत होणारे हळवे अश्रू.......अश्रू कोणाचे अनमोल तर कोणाचे मातीमोल.जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळ्या तरेचे अश्रू कधीतरी येत असतात. त्या सारयात श्रेष्ठ !प्रत्येक माणसाच्या अश्रू वाट्याला आलेच तर आदर,स्नेह, सन्मान, आणि आनंदाचेच यावे.बस!


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics