Author Sangieta Devkar

Drama Children

3  

Author Sangieta Devkar

Drama Children

अनोखे हे बंध - भाग 2

अनोखे हे बंध - भाग 2

9 mins
270


आणि मी वहावत चालले होते. आता प्रणव ला भेटायची ओढ लागून राहायची. आणि जेव्हा भेटू तेव्हा आम्ही शरीरा ने एकत्र यायचो. मला दोन महिने पाळी आलीच नाही. मी पुरती घाबरून गेले. एका मैत्रिणी ला विचारले ती बोलली अग अस काही नसते लगेच दिवस वैगेरे जात नसतात हे हार्मोनल इन ब्लॅन्स मुळे होते असे कधीतरी मला पण कधी लेट पाळी येते. त्या वेळी आजच्या सारख्या इ - पिल्स किंवा प्रेग्नन्सी किट पण उपलब्ध नवहते. आम्ही प्रेमाच्या आवेगात सुरक्षा काही ही घेतली नवहती. निसर्गाने आपला चमत्कार दाखवला मला तिसऱ्या महिन्यात पण पाळी आली नाही. आता मी जाम हादरून गेली होती. काय करावे सुचेना. मी प्रणव ला भेटून सगळं सांगितले मला दिवस गेले होते. प्रणव ने या गोष्टी साठी स्वतःला जबाबदार नाही समजले तो म्हणाला,कशा वरून हे मुल माझंच आहे. जी मुलगी इतक्या सहजा सहजी मुलाला वश होते ती इतर मुलां सोबत पण झोपू शकते नाही का सरू? मला साफ कळून चुकले की प्रणव ने मला धोका दिला होता. त्याच माज्यावर प्रेम वैगेरे काही ही नवहते. तो एक श्रीमंत लाडावलेला मुलगा होता पण आता हे विचार करण्याची वेळ निघून गेली होती. मी रडत रडत रस्त्याने वाट दिसेल तिकडे चालली होती.


मला रस्त्यावरील गाडयांचे भानसुद्धा नवहते. माझ्या समोरून एक ट्रक येत होता तरी मी तशीच निघाले होते हा ट्रक अंगावरून जावा आणि संपुन जावं सगळं असच वाटत होते. ट्रकवाला जोरजोरात हॉर्न वाजवत होता पण मी बाजूला होत नवहते तेव्हा झटक्यात कोणी तरी मला बाजूला ओढले. सरू मूर्ख आहेस का रस्त्या मधून काय चालली होती. मी भानावर आले पाहिले तर देवांश ने मला बाजूला केले होते. देव आमच्याच ग्रुप मधला होता एकदम शान्त आणि अबोल असा. अभ्यासात हुशार ,कोणाच्या मधये न पडणारा. पण सगळ्याना लागेल ती मदत करणारा. त्याने मला बाजू च्या एका हॉटेलमध्ये नेले. मला बोलला,सरू काय झाले आणि तू रडत का आहेस. त्याने मला पाणी दिले ते मी पिले. तो बोलला,काय खाणार का तू ? नको देव काही नको मला. बर नुसती कॉफी घे बर वाटेल तुला. मग त्याने कॉफी ऑर्डर केली. सरू बोलून दमली होती आर्या ने तिला पाणी दिले आई पाणी पी आणि बस थोडा वेळ नंतर बोलू आपण . नको आर्या आता विषय निघाला आहे तर बोलून टाकते सगळं. हम्म आर्या म्हणाली. मग सरू पुढे बोलू लागली. सरू काय प्रॉब्लेम आहे का मला सांग मी नक्की मदत करेन देव म्हणाला. आता सरू ला कोणाच्या तरी मदतीची गरज होतीच नाहीतर घरी तोंड कसे दाखवणार होती . सरू ने थोड्यात देव ला तिच्या आणि प्रणव च्या प्रेमा बद्दल सांगितले आणि आता काय प्रॉब्लेम होऊन बसला आहे हे ही सांगितले. देव ने सरू च्या हाता वर हात ठेवला बोलला,चल आपण आता हॉस्पिटल ला जाऊ आणि चेक करू की खरच तू प्रेग्नंट आहेस का? हो म्हणत सरू तयार झाली. कॉफी घेऊन दोघे हॉस्पिटलमध्ये आली. सरू ला डॉकटरांनी चेक केले तील दिवस गेले होते आणि आता अँबोरशन पॉसीबल नाही असे बोलले. तुम्ही कोण यांचे डॉकटरांनी देवला विचारले. मी देवांश, मी सरिता चा प्रियकर आहे. अच्छा मग लवकरात लवकर लग्न करा हाच माझा सल्ला असेल. ओके म्हणत देव सरू ला घेऊन बाहेर पडला. देव तू आता डॉक्टरांना का बोललास की तू माझा प्रियकर आहेस म्हणून. सरू अस मी बोललो नसतो तर विषयाला अनेक फाटे फुटले असते. सरू तुला माहीत नाही पण मी गेली तीन वर्षे तुझ्यावर प्रेम करत आहे . तू त्या प्रणव च्या प्रेमात गुंग होतीस त्या मूळे तुझं माझ्या कडे कधी लक्षच गेले नाही. काय बोलतो तू देव? खर आहे हे? हो सरू आय रियली लव यु आणि तुझी इच्छा असेल तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. सरू ला काहीच समजेना पण आता या प्रॉब्लेम मधून सुटायचे असेल तर ताबडतोब लग्न होणं गरजेचं आहे आणि अशा माझ्या अवस्थेत माझ्याशी कोण लग्न करणार? सरू काय विचार करतेस? मी तुला आहे त्या अवस्थेत स्वीकारायला तयार आहे. सरूने काही ही विचार न करता देव ला मिठी मारली आणि रडू लागली. देव तुझे आभार कसे मानू सांग.


माझे चुकले रे माझ्या आसपास हिरा होता तो मला दिसला नाही आणि काचेच्या खड्या कडे मी आकर्षित झाले. सरू चुका कोणा कडून होत नाहीत. आपण माणसं आहोत ग चुकणार . पण देव तुझ्या घरी हे लग्न मान्य होईल? आणि माझ्या घरी काय सांगायचे? हेच सांगायचे की आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आमच्या हातून चूक झाली तेव्हा आता आम्हाला लग्न करायचे आहे. देव तरी तुझ्या घरी चालेल का रे मी अशी लग्ना अगोदर प्रेग्नंट असलेली. माझ्या घरी काय सांगायचे ते मी सांगतो तू नको काळजी करू. देव पण मला वाटत की तू खर खर सांगावेस असे खोटं बोलून नको लग्न करू माझ्याशी. ओके खरच सांगेन. माझ्या घरी आई बाबा अगदी आधुनिक विचार सरणी चे आहेत. दोघे शिक्षक आहेत . त्यामुळे ते मला तुला समजून घेतील. मी चुकीचा निर्णय घेत नाही कधी या वर त्यांचा विश्वास आहे. माझे बाबा तर म्हणतात की आपण चांगल्या हेतूने एखादं काम केले तर ते चुकी चे असत नाही सो डोन्ट वरी . चल मी तुला घरी सोडतो आणि उद्याच तुझ्या आई बाबांना भेटायला येतो. थँक्स देव तू मला खूप मोठया संकटातुन वाचवलेस. पण एक विचारु का? हो विचार देव तू माझ्या या बाळाला कधी अंतर तर देणार नाहीस ना? सरू तसे असते तर मी लग्ना लाच तयार झालो असतो का? मी तुज्या बाळा ला माझं नाव देईन. तुज्या इतकच त्याच्या वर प्रेम करेन हा माझा शब्द आहे. मला खात्री पटली की देव च खरच मना पासून प्रेम आहे माझ्यावर. दुसऱ्या दिवशी प्रणव त्याच्या आई बाबा आणि बहिणी सोबत माझ्या घरी आला. देव ने ठरवल्या नुसार माझ्या आई बाबा ना तीच गोष्ट सांगितली. सुरवातीला बाबा चिडले खूप पण देव च्या आई बाबां नी त्यांची समजूत घातली शेवटी लग्ना शिवाय पर्याय नवहता.मग लवकरच आमचे लग्न झाले. तुझ्या जन्मा नन्तर माझ्या आई बाबा ना ही गोष्ट सांगितली तेव्हा अक्षरशः त्यांनी देव् समोर हात जोडले. देव म्हणाला बाबा अहो आपल्याला मूल झाली नाहीत तर आपण दत्तक मूल घेतोच ना मग हे मूल तर माझ्या सरु चे आहे. माझे प्रेम आहे तिच्या वर तिला मि असा संकटात कसा सोडून दिले असते.


त्या दिवशी ती अचानक पणे भेटली म्हणून आज सरु आज आपल्यात आहे. तरी पण जावइबापू तुम्ही ख़ुप मोठ्या मनाचे आहात. आम्हाला सरु ची आणि बाळाची अजिबात काळजी नाही आता. मग तुझ्या नन्तर अभी चा जन्म झाला पण तुझ्या बाबा ने कधी ही तुम्हा दोघां मध्ये फरक नाही केला तूला माहित आहे आर्या देव तुझ्यावर ख़ूप प्रेम करतो तूच जास्त लाड़की आहेस त्याची. आर्या अजुन काही किंतु आहे का मनात तुझ्या? काही नाही आई पण मला हे पचवने अवघडच आहे. म्हणजे काय? आई आता मला काही ही बोलायचे नाही. असे बोलून आर्या आपल्या रूम मध्ये गेली. थोड्याच वेळात बाहेर आली एक छोटी बैग हातात होती . कुठे निघालीस तू आर्या? आई मी आजी कड़े जात आहे कधी येईन परत माहित नाही. अग पण इतके काय झाले आहे? आई जाते मि म्हणत आर्या बाहेर पडली. सरिता च्या आई कड़े आर्या आली.अरे आज तू इकडे कशी काय आर्या आजोबा नी तिला बघून विचारले. आजोबा आता मी इथेच राहणार. काय झाले तू अस का बोलतेस आजी ने विचारले. आजी त्या घरात माझे सख्खे कोणीच नाही मग का राहु मी तिथे? म्हणजे काय म्हणायचे तुला आजी ने विचारले? आजी मला आई ने सगळ सांगितले आहे मी माझ्या बाबांची मुलगी नाही आहे. माझा बाप दुसराच कोणी तरी आहे. आर्या अग असा विचार नको करू देव ने तूला कधी ही परकी मानले नाही.तुझ्या वर त्याचा जास्त जीव आहे. तू लहान पणा पासून चे प्रसंग आठवून बघ कधी तरी देव् ने तुला झुकते माप दिले आहे का? अभी झाल्या नन्तर ही त्यांच तुझ्या वरचे प्रेम कमी झाले का? त्याने कायम तुझे लाड़च केले. काही ही कमी पडू दिले नाही आणि तुझ्या आई चा विचार करून बघ बाळा तिला त्या अवस्थेत जीव देण्या शिवाय पर्यायच उरला नसता देव ने आई ला स्वीकारले कारण तो तुझ्या आई वर प्रेम करत होता. तुला ही त्याने स्वीकारले. आजी मला थोडा वेळ हवा आहे. बर आर्या जा तू आत मध्ये आराम कर. आणि तुला हवे तितके दिवस इथे रहा. आई काय झाले अशी का दिसतेस काही टेंशन आहे का ? अभिजीतने घरात आल्या आल्या सरु ला विचारले. नाही रे जरा डोक दुखत आहे . बर मग आराम कर आणि दीदी कुठे आहे? आज सुट्टी होती ना ऑफिसला. हो रे ती आजी कड़े गेलीय. तुला खायला हवे का काही. हो बनव मी फ्रेश होऊन येतो म्हणत अभी रूम मध्ये गेला. थोड्याच वेळात देव् ही ऑफिस वरुन आला. सरु चहा ठेव म्हणत तो ही फ्रेश व्हायला गेला. सरु आपल्याच विचारात हरवली होती. तिने चहा गैस वर ठेवला पन लक्ष नव्हते तिचे . सरु चहा सांडतो आहे कुठे लक्ष आहे तुझे म्हणत देव ने गैस बंद केला. सरु अग रड़तेस का काय झाले? बस तू इथे आधी म्हणत तिला डायनिंग टेबल पाशी देव् ने बसवले. बोल काय झाल? आर्या ला आपल्या बद्दल सगळ सांगितले मी. दुपारी प्रिया ताई आल्या होत्या तेव्हा आमचे बोलने आर्या ने ऐकले. मग तिने हट्ट केला मला सांग म्हणाली की माझा खरा बाबा कोण? हे बघ सरु आज ना उद्या ही गोष्ट आपण तिला सांगणार होतोच ना मग? पण ती बोलली मला हे पचवने कठिन आहे म्हणत ती बैग घेऊन आई कड़े निघुन गेली देव. ह्म्म्म सरु असे अचानक आपल्या बद्दल काही गोष्टी समजल्या की माणुस जरा चल बीचल होतो. आर्या ला थोड़ा वेळ घेवू दे मला माहित आहे ती हुशार आणि संमजस मुलगी आहे . तू नको काळजी करू. पण देव तुला तिने स्वीकारले नाही तर? हे बघ सरु असे काही ही होणार नाही मी माझ्या मुलीला ओळखतो ती योग्य विचार करेल. आई कशा बद्दल बोलत आहात तुम्ही अभी ने किचन मध्ये येत विचारले मग देव म्हणाला,अभी तुला सुद्धा आज ना उद्या ही गोष्ट सांगावी लागणार आहेच आता विषय निघालाच आहे तर ऐक म्हणत देव ने सगळे काही त्याला सांगितले. आई दीदी जरा मैड आहे का ग अभी असे बोलू नये देव बोलला.


सॉरी बाबा पण तुम्ही ग्रेट आहात हे समजत नाही का तिला. आपण तिला कधी तरी तिला परक्यासारखे वागवले आहे का? काही ही विचार न करता निघुन गेली. अभी तिला वेळ घेवू दे येईल ती परत. हम्म ओके म्हणत अभी गप्प बसला. इकडे आर्याने ख़ुप विचार केला. तिच्या नजरे समोर सगळे बाबा सोबतचे प्रसंग दिसू लागले. तिला लहान असताना शाळेत सोडायला बाबा हवा असायचा. 10 वी 12 वी च्या परिक्षेला सोडायला बाबा लागायचा. मनातल सगळ शेयर करायला बाबाच होता. आईपेक्षा जास्त वेळ ती बाबा जवळ असायची. बाबा तिचा बेस्ट फ्रेंड आणि हीरो होता. तिला कुठे ही त्याच्या प्रेमात कमतरता जाणवली नाही. तिला तिची चूक समजली ती लगेच घरी जायला निघाली. आर्या तू तर राहणार होतीस ना मग? आजी आजोबा माझी चूक लक्षात आली मी जाते घरी. बाबा मी फोन करतो दीदी ला आणि बोलावून घेतो. नको अभी ती येईल मनाने. बाबा म्हणत तेव्हा आर्या घरात आली. माझे चुकले बाबा मला माफ कर. म्हणत देव् च्या मिठित आली. बाबा मी तुमच्या बद्दल चुकीचा विचार करत होते. असु दे बाळा मला वाईट नाही वाटले. आर्या जे झालं तुझ्या आई सोबत तो तीझा पास्ट होता आता भूतकाळाची सावली आपल्या येणाऱ्या सुखद भविष्यावर नको पडायला. हो बाबा. आता कोणाच्या च मनात काही किंतु परंतु उरले नाहीत. तेव्हा आपला भविष्यकाळ नक्की छानच असेल. तू माझी आहेस बेटा आणि कायम राहशील. लव यु बाबा मी पण लव यु बाबा म्हणत अभी ही देवच्या जवळ आला. त्याला ही देव ने जवळ घेतले. सरू तू का दूर उभी आहेस. ये तू पण देव म्हणाला. नको मी हा बाप लेकीचा नयनरम्य सोहळा पाहत राहते .आपल्या कुटुंबाला कोणाची नजर नको लागायला. मी येते देवाजवळ दिवाबत्ती करून. असे म्हणत समाधानाने सरिता देवघराकडे गेली.

(समाप्त )


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama