अनोखे हे बंध - भाग 1
अनोखे हे बंध - भाग 1
सरू आता आर्या मोठी झाली तिला आज ना उद्या ही गोष्ट सांगितली पाहिजे. उद्या लग्नाची वेळ येईल तेव्हा काय अस अचानक सांगणार का? अहो ताई मला समजते पण मन धजत नाही आर्या ला काही सांगायला ती कशी बघेल या गोष्टी कडे? तिचा बाबा तिच्या साठी ग्रेट बाबा आहे खुप जीव आहे तिचा बाबा वर . म्हणूनच म्हणते वेळ असे पर्यंत सांग मग तिला सावरायला ही वेळ मिळेल. हो ताई सांगेन पण तुम्ही सर्वांनी जो मोठे पणा दाखवला ना तेच खुप आहे माझ्या साठी. नाही ग वहिनी आज जग कुठे चाललय आणि आपण त्यात त्याचच अडकून पडायचे का? आर्या सगळ्याची लाडकी आहे. आणि मुळात हा निर्णय देव चा होता तो चुकीचे कधी करत नाही हा आमचा विश्वास म्हणून तर तुमच्या लग्नाला ला आई बाबा पण तयार झाले आणि देव प्रेम करत होता तुझ्या वर. हम्म सरू इतकंच बोलली. चल मी निघते आता म्हणत प्रिया निघाली. पण यांचं बोलणं आर्या ने ऐकले होते जी तिच्या रूम मधून बाहेर येतच होती पण तिचा विषय निघाला म्हणून आई आणि आत्या काय बोलते हे ऐकत राहिली. आई अरे आर्या उठली का तू बस चहा करते तुज्यासाठी. आई आत्या काय बोलत होती ? कुठे काय सहज गप्पा मारत होतो आम्ही. आई का खोटे बोलतेस मी तुमचे बोलणे ऐकले आहे. बाबा बद्दल काही आहे का ? जे आहे ते खरं सांग मी आता काही लहान नाही चोवीस वर्षाची आहे मला समजते सगळं. आर्या तू समजतेस तस काही नाही बाळा. नाही आई तू खोटे बोलत आहेस ओके मी बाबा आला की त्यालाच विचारते. आर्या बाबांना नको विचारू काही. मग तू सांग आई आता. ऐक तर मग तुझे बाबा हे तुझे सख्खे बाबा नाही आहेत.
गेली चोवीस वर्ष ही गोष्ट आम्ही तुझ्यापासून लपवून ठेवली कारण तू यावर कशी रिऍक्ट होशील याची भीती होती आम्हाला कारण तुझा तड की फड स्वभाव! तू लगेच एक घाव दोन तुकडे करण्या वर येतेस. आई मग माझा खरा बाबा कोण आहे आणि देवांश निकम या माणसाने मला का म्हणून स्वीकारले? आर्या बाबा आहेत ते तुझे माणूस काय म्हणतेस? नाही आई मला असलं खोट पटत नाही हे तुला माहीत आहे. सांग माझा खरा बाप कोण आणि कुठे आहे तो? आणि तुला मला असा टाकून पळ का काढला त्याने? सरिता च्या डोळ्यातुन अश्रू बरसत होते. आर्या तुला सगळं सांगणार होते पण योग्य वेळ ची वाट बघत होतो आम्ही. कधी मी लग्न करून गेल्या वर म्हणजे मग काही मी विचारू नयेच आणि माझं लग्न अस खोट बोलून लावून देणार होता का? नाही आर्या अस खोटे बोलून काही ही करणार नव्हतो . आई सांग आता तरी कोण आहे तो ज्याने मला जन्म दिला आणि जबाबदारी न घेता पळून गेला. आर्या त्याच नाव प्रणव शहा . आता कुठे आहे हा प्रणव? काहीच माहीत नाही मला. त्याने इतक्या वर्षात माझी चौकशी सुद्धा केली नाही. आई नीट सांग मला काय घडले होते. आर्या माझे शालेय शिक्षण मुलीनच्या शाळेत झाले. आमच्या शाळेत फ़क्त मुलींच म्हणून कॉलेज लाईफ़ आणि मूल याच भयंकर मला आकर्षण वाटत होते कधी दहावी पास होते आणि कॉलेजला जाते अस वाटत होते. कॉलेज लाइफ ख़ुप छान असते . मित्र मैत्रीणी आणि लेक्चर बंक करून भटकन्यात मजा असते हे मी बऱ्याचदा ऐकले होते ते तस आयुष्य मला जगायचे होते म्हणून मि कॉमर्स शाखेला प्रवेश घेतला जेणे करून अभ्यास कमी असेल. आमच्या मस्त चार मैत्रीणीचा ग्रुप झाला होता.
कॉलेज, कैंटिन, सिनेमा फिरणे सगळ चालू होते. आमच्या ग्रुप मध्ये हळू हळू मूल ही ऍड झाली . तरुण्या च्या उंबरठया वर इतर मुलीसारखे मला ही माझ्या राजकुमाराची स्वप्न पडू लागली. बारावीला आमच्या वर्गात एक नवीन मुलगा आला. त्याच्या बाबा ची बदली झाल्या मुळे आला होता. प्रणव शहा गोरा ऊंच,घारे डोळे,नुकतीच आलेली दाढ़ी कोवळी दाढी, मिशी दिसायला स्मार्ट असा प्रणव मला एक नज़रेत आवडला. मि त्याच्या शी बोलण्यासाठी नेहमी संधी शोधत असायची. हळू हळू तो आमच्या ग्रुप मध्ये आला. मि तर त्याच्या वर प्रेम करू लागले होते. आमची घट्ट मैत्री झाली आणि नकळत आम्ही दोघ एकमेकांच्या प्रेमात पडलो ख़ुप सुंदर अशा त्या भावना होत्या. कीती ही बोललो तरी मन भरत नसायचे. त्या वेळी मोबाइल नव्हते पन प्रणव कड़े टेलीफोन होता मग कधी कधी मि एस टी डी बूथ मधून त्याला कॉल करायचे. ख़ुप गुंतलो होतो आम्ही एकमेकांत. हळू हळू कॉलेज ची तीन वर्ष संपत आली. त्या काळी नवद्द च्या शतकात प्रेमविवाह कवचित व्हायचे. मी प्रणव च्या मागे लागले होते की तू माझ्या घरी ये आणि मला मागणी घाल. तर त्याने आपली जात वेगळी आहे हे पॉसीबल होईल का अशी शंका व्यक्त केली. माझा प्रणव वर खुप विश्वास आणि प्रेम ही होते. एके दिवशी त्याने मला त्याच्या मित्रा च्या घरी भेटायला बोलवले आता परीक्षा जवळ आली होती आमची भेट होणं शक्यता फार कमी होती. म्हणून मी काही ही विचार न करता प्रणव ला भेटायला गेले. आम्ही दोघंच घरी होतो .भावनेच्या भरात आम्ही एकत्र आलो.
प्रणव हे चुकी चे झाले असे व्हायला नको होते . सरू काही होत नाही आपलं प्रेम आहे ना मग कधी तर हे घडणारच होत. किती दिवस आपल्या भावना आवरून धरणार ना आपण. असे बोलून प्रणव ने माझी समजूत घातली. मग परीक्षा झाल्या. आता प्रणव ला कसे भेटायचे हा प्रश्न होता. मैत्रिणी कडे जाते सांगून मी प्रणव ला भेटत असे. त्याने मला जवळ घ्यावे प्रेम करावे ही भावना आता डोकं वर काढत असायची. प्रेमाची नशा माणसाला काही ही करायला भाग पाडते याचा मला अनुभव येत होता आणि मी वहावत चालले होते
(क्रमशः)
