kanchan chabukswar

Action Fantasy

4.1  

kanchan chabukswar

Action Fantasy

अनाया……

अनाया……

5 mins
412


जम्मू-काश्मीरच्या खोऱ्या मधले रामनगर हे अतिशय शांत गाव म्हणून समजले जायचे. विजय सिंह आपल्या कुटुंबासहित आपल्या जहागिरी मध्ये राहत. मोठा रामसिंह आणि धाकटा मुलगा लक्ष्मण सिंह ,पत्नी मालिनी देवी, राम सिंह ची पत्नी जानकीदेवी यांच्यासह विजयसिंह मोठ्या आनंदाने आपल्या जहागिरी मध्ये राहत असत.

 तिथे असलेल्या फळांचा बगीचा, शेती, त्यांच्या मिल्स, सगळ्या वरती विजयसिंह आणि राम सिंहाची देखरेख असे.

लक्ष्मण त्यामानाने जरा खेळकर, आणि थोडासा वेगळा होता. लक्ष्मण प्राण्यांची अतिशय आवड. मोठ्या अक्रोडाच्या झाडावरती, अडकलेले मुकुटधारी गरूडाचे पिल्लू उचलून घरी घेऊन आला, आणि तिचं नाव ठेवलं अनाया.

 मोठ्या आकाराचा शिकारी कुत्रा सिजर, आणि एक गुड्डू नावाचे माकड, असे सर्वजण म्हणजे लक्ष्मणचे कुटुंब होते. अनाया,सिजर आणि गुड्डू ला घेऊन लक्ष्मण कायम शिकारीला जंगलामध्ये जात असे. शिकार पकडण्यामध्ये अंनाया अतिशय होती तरबेज होती. झाडावरून उड्या मारत गुड्डू पण शिकारी ची खबर देत असे लक्ष्मणाला. अनाया राखाडी रंगाची मोठ्या बाकदार पिवळी चोच असलेली, तपकिरी रंगाचे उंच पाय, आणि त्याला असलेली चार चंद्राकृती नख . तिची डोळे लाल काळे असून, नजर एकदम धारदार आणि तेज. मोठा शानदार मुकुट असलेला गरुड पक्षी होता अनाया . डोक्यावरची पिसे एखाद्या मुकुटा प्रमाणे असल्यामुळे या गरुडाला मुकुटधारी गरुड असे म्हणत.


सिजर एक काळा तपकिरी रंगाचा मोठा शिकारी कुत्रा, त्याचे निमुळते तोंड, काळे भेदक डोळे, धावताना उडणारे कान, ताकदवान पाय, आणि तो रागवलं की त्याचे बाहेर येणारे सुळे. सिजर भुंकायला लागला आजूबाजूचे प्राणी-पक्षी माणसे घाबरून निघून जायचे.

  गुड्डू एक लडिवाळ माकड, पांढऱ्या तोंडाचे, तपकिरी राखाडी रंगाचे, स्वभावाने गरीब, मात्र खट्याळ, सिजर बरोबर खेळायला त्याला फार आवडायचे. कधीकधी गुड्डू भेदक आवेशाने अनाया वर चालून जात, पण ते तेवढेच, अनाया, सिजर आणि गुड्डू एकदम परममित्र. लक्ष्मण या तिघांवर फार जीव. पहिला घास या तिघांना भरवल्याशिवाय लक्ष्मण कधी जेवला नाही. ताजे मासे, मटण, मोठे मोठे अनार, गुड्डूलाआवडणारी फळे, जेवणाचा थाट असायचा.

अनाया स्वतः माशाची शिकार करून घेऊन येत असे.

  जशीजशी अनाया मोठी होत चालली होती तशी तिची भूक पण वाढत होती, पूर्ण उघडलेले पंख जवळजवळ दोन मीटर पोहोचायचे, बाकदार चोच, शिकारी डोळे, आणि तीन इंच लांब पायाची नख .

मुकुटधारी गरुडाची नजर अतिशय तेज, तिची झेप घेण्याची तऱ्हा देखील अतिशय वेगवान. अनाया आजकाल  मेंढीचे छोटे पिल्लू देखील आपल्या बाकदार नखांमध्ये धरून सहज उचलू शके. फळबागा संरक्षणाची जबाबदारी जणूकाही तिचीच होती, येणाऱ्या आगंतुक पक्षांना किंवा प्राण्यांना तिच्यात चोचीचे नाहीतर नखाचे तडाखे जरूर बसत.


    सिजर आणि गुड्डू जेव्हा लक्ष्मण बरोबर लाडीगोडी लावत, तेव्हा अनाया देखील आपल्या पंखांनी त्यांना मारून दूर ढकलत असे. अनायास लक्ष्मण च्या हातावर किंवा खांद्यावर बसायला फार आवडे. म्हणून लक्ष्मण ने जाड कातडी हात मोजे तयार करून घेतले होते. लक्ष्मणच्या एका सांकेतिक सिटी वर अनाया कुठून पण उडून त्याच्या हातावर येऊन बसत असे.

   मेंढ्यांच्या बरोबर जेव्हा लक्ष्मण हिमालया मध्ये जात असे तेव्हा त्याचे तिघेही मित्र त्याच्याबरोबर जात .

इकडे-तिकडे भटकणारे मेंढीचे छोटे पिल्लू, अनाया झटकन उचलून आणत असे. आणि गुड्डू मात्र सगळ्यांना टपला देण्याचे काम करा. सिजरची पण मेंढ्या वरती बारीक नजर असे .


   दसरा झाल्यावर सीमोल्लंघनासाठी म्हणून, सगळं कुटुंब फळांच्या बागेमध्ये आलेले होतं आलेले होते.

या वर्षी दसरा खूप धडाक्यात साजरा होत होता कारण राम सिंह आणि जानकी देवीला, देवीच्या कृपेमुळे पुत्ररत्न प्राप्त झाले होते. तान्हा राजवीर ला घेऊन सगळं कुटुंब हिमालयातल्या आपल्या बागेमध्ये विश्राम करत होतं.


      दुपारच्या वेळेस सगळी मंडळी आराम करत होती, एवढ्यात सिजर जोर-जोरात भुंकू लागला. आणि गुड्डू पण काहीतरी विचित्र आवाज करू लागला.

दोन भली दांडगी अस्वले फळांच्या बागेमध्ये शिरली होती. राजवीर चा झोका एका मोठ्या झाडाला टांगलेला होता तिकडेच की दोन्ही अस्वले चाल करून आली.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सगळेजण गांगरून गेले. विजय नि आपली बंदूक काढली, पण या साध्या बंदुकीने अस्वलं वरती काहीच परिणाम झाला नाही. अस्वल राजवीर ला घेण्यासाठी जणूकाही त्याच्या पाळण्याकडे येत होते.

 जंगली अस्वले अतिशय भयानक असतात. त्यांचे लांब सुळे, धारदार नखे, आणि जबरदस्त ताकद, याच्यापुढे माणसाचा काहीच पाडाव लागत नाही. विजयसिंह, कुटुंब असल्या दुर्घटनेला तयार नव्हते. फळबागेच्या बाहेरच्या गाडीमध्ये लक्ष्मण ची हत्यारे होती पण तिकडे जाण्यासाठी मार्गच नव्हता. राजवीर बाळाला वाचवायचं कसं? जानकीदेवी मालिनी देवी यांना बागेच्या घरांमध्ये ढकलून राम सिंह यांनी दरवाजा लावून घेतला. जाड दंडुका घेऊन अस्वलाचा सामना करण्याची तयारी केली. हातामध्ये जाड दंडुका घेऊन रामसिंह अस्वलांची भिडला. पण एका फटकाऱ्यात तो जखमी होऊन दूर फेकला गेला. अस्वलाच्या हल्ल्यात राम सिंह जखमी झाला. परिस्थिती फार बिकट झाली. म्हातारा विजयसिंह असा किती वेळ तग धरणार?

 अस्वल पाळण्याकडे जात असताना अचानक अनाया ने झेप घेतली. तोंडातून भयानक आवाज करत अनाया ने  अस्वलांच्या डोक्यावरती चौच मारली त्यामुळे अस्वलांचे लक्ष तिच्याकडे गेले, एवढ्या बलाढ्य अस्वलांची सामना करण्यात असमर्थ होती हे तिला माहीत होते, जसे अस्वल वळले तशी अनाया ने पाळण्याकडे झेप घेतली आणि कपड्यांमध्ये मध्ये घट्ट गुंडाळलेल्या बाळाला घेऊन अनाया उंच झाडाच्या टोकावर जाऊन बसली. अस्वलांच्या हल्ल्यामुळे गुड्डू अतिशय घाबरून गेला होता तरीपण तो त्याच्यामागे पणा याच्या अनाया च्या मागे झाडावर चढला.


उंच देवदार वृक्षावर दणकट फांदी बघून गुड्डू बसला, अनायाने त्याच्या हातात बाळाला दिले, पण राजवीर बाळ गुड्डू ला धरवेना. अनाया परत परत अस्वलांच्या डोक्यावर जाऊन त्यांना चौच मारत होती,

सिजर आणि अनाया दोघही राम सिंग आणि विजय सिंग ला मदत करत होते. राजवीर बाळ चांगलं बाळसेदार असल्यामुळे गुड्डू ला त्याचे वजन पेलवत नव्हते. अस्वलाने झाड हलवून हलवून बाळाला पाडण्याचा प्रयत्न केला गुड्डू ने रडका आवाज काढून अनायाला बोलवले.

अनाया ने आपल्या भक्कम पकड मध्ये बाळाला उचलले आणि जंगलाच्या दिशेने निघून गेली. गुड्डू तिच्या मागे गेला. त्या मुकुटधारी गरुडाची पकड घट्ट होती. पकड घट्ट करून अनया उडाली आणि नाहीशी झाली. जशी अनाया बाळाला घेऊन उडाली, गुड्डू पण तिच्यामागे धावला. दुप्पटयामध्ये घट्ट लपेटलेले राजवीर बाळ अनाया ने आपल्या धारदार नखांनी घट्ट धरले होते.

 या सगळ्या गोंधळामध्ये लक्ष्मण गाडीपर्यंत पोचला आणि त्यांनी बंदुकीचे बार काढायला सुरुवात केली. मोठ

 मोठ्या आवाजामुळे, आजूबाजूचे लोक जमा झाले, सगळ्यांनी मिळून अस्वलांना पळवून लावले.

   जानकीदेवी जेव्हा समजले की अनाया बाळाला घेऊन उडाली आहे तेव्हा तर ती बेशुद्ध पडली. रामसिंहला आणि विजय सिंह यांना लक्ष्मण वरती पूर्ण विश्वास होता त्याच्यामुळे त्यांनी घरातल्या स्त्रियांना धीर दिला आणि शांतपणे वाट बघण्यास सांगितले.


    सांकेतिक सिटी वाजवून लक्ष्मण अनIया ला बोलवत होता, बराच वेळ झाला पण ती येत नव्हती. लक्ष्मणच्या सांकेतिक बोलण्या चा आवाज ऐकून गुड्डू बागेकडे आला, आणि ज्या दिशेने अनाया बाळाला घेऊन गेली त्या दिशेकडे लक्ष्मण ला ओढायला लागला.  

 गुड्डू आणि सिजर ज्या दिशेने अनाया उडाली त्या दिशेने धावू लागले. त्यांच्याबरोबर लक्ष्मण देखील आपली बंदूक घेऊन धावू लागला.

एका उंच केदार वृक्षाच्या फांदीवरती फक्त अनIया चे तोंड दिसत होते. बाळाचा पत्ता नव्हता.

   तेवढ्यात तिथे विजय आणि राम देखील येऊन पोहोचले.

   लक्ष्मण चे बोलावणे ऐकून अनाया त्याच्या हातावर येऊन बसली. आणि तिने झाडावर असलेल्या मुकुटधारी गरुडाच्या घरट्याकडे तोंड केले.

 याचा अर्थ अनायाने बाळाला गरुडाच्या घरट्यात ठेवले होते. गुड्डू फटाफट वर चढला आणि त्यांनी घरट्यामध्ये डोकावून बघितले, इथून बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता.

अनाया परत उडाली. घरट्या मधून अलगदपणे बाळाला दुपट्या सकट उचलून सावकाश उडत खाली आली, आणि रामसिंहाच्या डोक्यावरती चक्कर मारून अलगद बाळाला त्याच्या ओंजळी मध्ये खाली सोडले.

      राजवीर बाळाला छातीशी धरून रामसिंहाने आनंदाने चित्कार केला राजवीरला सुखरूप पाहून रामसिंहाला अतिशय आनंद झाला. डोळ्यातील अश्रू मुक्तपणे वाहू देत, रामसिंहाने अनाया, गुड्डू आणि सिजर च्या पाठीवर थोपटले.. त्याने लक्ष्मण ला मिठी मारली. आज लक्ष्मण च्या अनाया ने राजवीर बाळाचे प्राण वाचवले होते.

अनाया लडिवाळपणे लक्ष्मणच्या हातावर येऊन बसली आणि तिने आपल्या तोंड लक्ष्मणच्या मानेवर घासायला सुरुवात केली.

अनाया च्या तोंडातून प्रेमळ असा आवाज बाहेर पडत होता. जणू काही तिने आज आपल्यावर असलेल्या उपकाराची परतफेड केली होती.

तिला छातीशी धरून लक्ष्मण ने तिथे भराभर मुके घेतले. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर गुड्डू पण चढून बसला, त्याचेही लाड करून लक्ष्मण ने सिजर च्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.

सिजर आयटीत पुढे चालत सगळ्यांना घेऊन बागेकडे परत आला. अनाया च्या प्रसंगावधानाने राजवीर बाळाच्या केसाला पण धक्का लागला नव्हता.

  मुकुटधारी गरुडाने बाळाला वाचवले ची कहाणी सगळ्या पंचक्रोशीत पसरली, आता फळबागेला नाव "अनाया गार्डन्स" असे आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action