अज्ञात शक्ती
अज्ञात शक्ती
पूर्वीच्या काळी गावी घरात शौचालय नसायचे..शौचालय ही घराबाहेर ठेवण्याची गोष्ट आहे, अशी गावातल्या लोकांची मान्यता होती..गावातले लोक प्रातर्विधीसाठी लांब रानात जात असत..
असच एके दिवशी इंदुमती आणि तिची भावजय कमलावती दुपारच्या वेळी रानात शौचास गेले होते..तिथे त्यांना त्यांची नातेवाईक नर्मदा भेटली..ती देखील शौचास आली होती..इंदुमती आणि कमलावती नर्मदाशी गप्पा मारत होत्या...नंतर तिघीही एकत्र घराकडे निघाल्या..जाता जाता त्या तिघी गप्पा मारत चालल्या होत्या..तेव्हा इंदुमतीच्या लक्षात आले नर्मदा दिसेनाशी झाली..कमलावतीच्या पण हे लक्षात आलं..दोघींनी एकमेकींकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले..दोघींना कळेना नर्मदा अशी अचानक कुठे गेली..थोड्याच वेळात त्या दोघी घरी आल्या..
काही वेळाने नर्मदा इंदुमतीला भेटायला आली..तेव्हा इंदुमतीने तिला विचारले की बोलता बोलता मधेच कुठे निघून गेलीस..नर्मदाला आश्चर्य वाटले...तिने सांगितले की मी तर रानात आलेच नाही..सकाळपासून घरीच आहे.. स्वयंपाक आणि बाकीची काम करत होते..
हे ऐकून इंदुमती आणि कमलावती पुरत्या घाबरल्या..त्यांना कळून चुकलं की ती नर्मदा नव्हती..तिचं रूप घेऊन कोणतीतरी अज्ञात शक्ती त्यांच्याशी बोलत होती...त्या इतक्या घाबरल्या होत्या की दोन दिवस त्या तापाने फणफणल्या होत्या...

