जन्म माझा तुझ्यासाठी
जन्म माझा तुझ्यासाठी
मेघा बस स्टॉप वर उभी होती...बराच वेळ झाला तरी बस आली नव्हती..तिचे लक्ष सारखे घड्याळाकडे होते..आज तर फारच उशीर झाला होता तिला..meeting मुळे थांबावं लागेल हे तिने सकाळीच आईला सांगितल होत..तरीही आईचा सारखा फोन येत होता..मेघा जिथे उभी होती तिथून अविनाशची bike pass झाली.. थोडं पुढे गेल्यावर तो थांबला.त्याने bike मागे घेतली..
"काय मॅडम, उशीर झालाय खूप...घरी drop करू का??",अविनाशने विचारले..
मेघा अविनाशला चांगलं ओळखून होती..त्याच मुलींसोबत वागणं,त्याच्याशी थट्टा मस्करी करणं हे तिला अजिबात आवडायचं नाही..
"हं, नको, मी जाईन बसने", मेघा म्हणाली....
"अहो मॅडम, मी सोडतो तुम्हाला..बसची वाट बघत बसलात तर अजून उशीर होईल..", अविनाश तिला म्हणाला.
मेघाला जाणं भाग होतं...खूप उशीर झाला होता...बसची वाट बघण्यात अर्थ नाही..ती bike वर बसली आणि अविनाशने घरापासून थोडस दूर तिला सोडलं..
आज ऑफिसमध्ये meeting होती म्हणून मेघा थांबली होती...ती सहसा उशिरापर्यंत थांबत नसे...ऑफिस सुटलं की लगेच घरी यायची...मेघा कोणाशी जास्त बोलत नसे...तिचा स्वभावच तसा होता..तिचे मित्र मैत्रिणीही नव्हते...याउलट अविनाशचा स्वभाव.. ऑफिसचा famous personality..तो आणि मेघा एकाच team मध्ये काम करत होते..अविनाश team leader होता..टॉल, डार्क, हँडसम असा अविनाश सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचा...कामातही हुशार..ऑफिसमधल्या प्रत्येकाशी चांगलं जमायचं..
साधारण महिन्याभराने अविनाश चा वाढदिवस होता..त्याने आपल्या team members ना पार्टी ला बोलावले.मेघाला जायचे नव्हते..तिच्या colleugueने कृतिकाने मेघाला खूप आग्रह केला
" मेघा चल ना यार पार्टीला", कृतिका म्हणाली..
" तुला माहितेय ना मला असल्या पार्टी वगैरे मध्ये जराही interest नाहीये..", मेघा म्हणाली..
"Oh common, मेघा..interest वगैरे नाही काय. आपण खायचं प्यायचं आणि एन्जॉय करायचं..अविनाश आपला TL आहे त्याच्या पार्टीला जावंच लागेल....u have to come..", कृतिका म्हणाली..हो नाही करत मेघा तयार झाली..
बघता बघता तो दिवस आला...पार्टी संध्याकाळी होती..खरं तर तिला पार्टी वगैरे मध्ये जास्त रस नव्हता..पण एक formality म्हणून ती आली होती...तिने आणि कृतिकाने अविनाशसाठी एक gift सुध्दा घेतलं होत..
दोघी त्याच्या घरी पोहोचल्या..अविनाशने दोघांच welcome केलं..त्याला अपेक्षा नव्हती की मेघा येईल..अविनाशने मेघाला पाहिलं आणि तो बघतच राहिला...मेघा आज नेहमीपेक्षा वेगळी दिसत होती..तसं तर कामानिमित्त तो तिच्याशी बोलायचा पण आज काही विशेष होतं...अविनाशची नजर मेघावरून आज हटत नव्हती.तिचे बोलके डोळे त्याला आकर्षित करत होते.. तिच्या हास्याने तो मोहित झाला होता.त्याचे हृदय जोरजोरात धडधडू लागलं...आजपर्यंत अनेक मुलींना त्याने पाहिले,त्यांच्याशी थट्टा मस्करी केली.पण अस त्याला आजपर्यंत जाणवल नव्हत...मित्राने आवाज दिला तेव्हा तो भानावर आला..अविनाश मेघाला फक्त बघत होता...तिच्याशी बोलण्याचा त्याने प्रयत्नही केला नाही...तिचे सुंदर रूप आपल्या डोळ्यात साठवत होता..एक वेगळीच ओढ जाणवत होती त्याला जी या आधी कधीच जाणवली नाही.त्याला काय होतंय हेच त्याला कळत नव्हते.त्याचे पार्टीत लक्षच नव्हतं.. मेघा पार्टीतून कधी निघून गेली हे अविनाशला कळलंच नाही...ती दिसेनाशी झाली...
दुसऱ्या दिवशीपासून अविनाश फक्त मेघाचा विचार करायचा.आजपर्यंत कोणत्याही मुलीबद्दल असा विचार त्याच्या मनात आला नव्हता. ऑफिसमध्ये काम करताना काहीतरी कारण काढून तो मेघाशी बोलायचा प्रयत्न करायचा..पण त्याने कधी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला नाही.निव्वळ प्रेम होते त्याच्या मनात..6 महिने असेच निघून गेले.अविनाश मेघामध्ये आकंठ बुडाला होता. पण मेघाला हे सांगायचं कसं..
एक दिवस अविनाश त्याच्या birthday पार्टीचे कॅमेरातले फोटोज लॅपटॉपवर कॉपी करत होता..फोटोज बघता बघता एका फोटोकडे त्याचं लक्ष गेलं..त्यादिवशी पार्टीमध्ये काढलेला मेघाचा फोटो दिसला..
'कसला भारी फोटो आलाय मेघाचा..किती साधी पण तरीही आकर्षित..नाहीतर हल्लीच्या मुली..नुसत्या मेकअप थापतात.. सौंदर्य अस असावं..नैसर्गिक..बघताक्षणी मोहून टाकणारं..काय यार, मेघा, काय जादू केलीस माझ्यावर.. तुझ्याशिवाय काय सुचतच नाहीये...फक्त तुझ्याकडेच बघत राहावंसं वाटतंय..' मेघाचा विचार करता करता अविनाश कधी झोपला त्यालाच कळलं नाही..
इथे मेघाची अवस्था काही वेगळी नव्हती..वरवर जरी ती दाखवायची की तिला अविनाश अजिबात आवडत नाही, तरी तिला त्याचा मनमिळावू स्वभाव आवडायचा. त्याच इतरांना मदत करणं, सगळ्यांच्या अडचणी सोडवणं हे तिला मनापासून आवडायचं.. तिच्या मनात अविनाशने कधी जागा मिळवली, हे तिला देखील कळलं नाही. पण ती स्वतःला सावरायची. हे तिने कधीच कोणाला कळू दिल नाही..अविनाशला पाहिल्यापासून तिला दोघांमध्ये एक वेगळं connection जाणवायचं..
हळूहळू दिवस जात होते.दोघ एकमेकांच्या प्रेमात होते..आणि ते ही एकमेकांच्या नकळत..
अविनाशने ठरवलं आता काही पण होऊ दे..मेघाला propose करायचं. त्याला भीती पण वाटत होती..तिने नकार दिला तर..या विचाराने तो पुढे जाण्यास धजावत नसे..
आज उद्या करत करत वर्ष असच निघून गेल.
एक दिवस मेघा पुन्हा त्याच बसस्टॉप वर उभी होती आणि अविनाशने तिला पाहिले..ती एकटीच होती..अविनाशला ही संधी सोडायची नव्हती..तो bike घेऊन बस स्टॉप जवळ गेला..तिथेच bike उभी केली आणि तो मेघाशी बोलायला गेला.
अविनाश - हाय
मेघा - हॅलो
अविनाश - आज एकटी कशी?
( काय stupid सारखा प्रश्न विचारतोय मी.. रोज ती एकटीच जाते आणि हे मला माहितीये )
मेघा - मी रोज एकटीच जाते.
अविनाश - अच्छा, हं..मेघा एक विचारायचं होत.
मेघा - विचारा ना सर
अविनाश - u can call me avinash.. dont be so formal.
मेघा - ok, अविनाश, काय विचारायचं होतं?
अविनाश - समोर एक coffee shop आहे तिथे जाऊन बसून बोलूया का?
अविनाश पुरता गोंधळून गेला होता..
मेघा - ok
गोंधळलेल्या अविनाश ला पाहून मेघाला हसू येत होतं..
ती दोघ टेबलवर बसली..मेघा गालातल्या गालात हसत होती..
अविनाश - I am sorry..मी थोडा nervous झालोय..मला कळत नाहीये मी कस बोलू, कस सांगू.
थोडं थांबून तो पुढे म्हणाला,
मेघा, आजपर्यंत मी बऱ्याच मुलींना भेटलो, त्यांच्याशी मैत्री केली..आणि फक्त मैत्री हा..affair किंवा flirt अस काही नाही..कधी कोणी पहिल्या नजरेत मनात भरलीच नाही..जिला पाहून अस वाटावं की हीच ती जिच्यासोबत मी माझं आयुष्य जगू शकतो..त्यादिवशी माझ्या birthday party मध्ये तुला पाहिलं..आणि माझी विकेटच पडली..आपण इतके दिवस एकत्र काम करतोय..याआधी मला तुझ्या बाबतीत कधीच काही जाणवल नव्हतं.. त्यादिवशी तू आल्यापासून मी फक्त आणि फक्त तुझ्याकडे पाहत होतो..आणि तू गेल्यावर माझं कशातच लक्ष लागत नव्हत..मी तुझ्या प्रेमात पडलोय मेघा..i am in love with u and i want to marry u..", अविनाशने आपल्या प्रेमाची कबुली दिली..
मेघा- काय बोलू मी अविनाश..मला हे अनपेक्षित होत पण इच्छा ही होती की तू मला विचारावं..मला ही तू खूप आवडतोस..कदाचित मी तुला आवडायच्या आधी...
अविनाशचा आनंद गगनात मावत नव्हता..मेघाकडून होकार मिळाला होता..दोघेही खूप खुश होते..
काही दिवसांनंतर दोघांनी आपआपल्या घरी सांगितले.. मेघाचे वडील थोडे नाराज होते..अविनाश स्वतः जाऊन त्यांच्याशी भेटला..मेघाच्या वडिलांना अविनाशचा मनमिळावू स्वभाव खूप आवडला..त्यांनी त्याच्या आई वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली..
दोन दिवसांनी अविनाश आणि त्याचे आई बाबा मेघाच्या घरी आले..मेघाने फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती...नाजूकसे दागिने, हातात दोन दोन मोत्यांच्या बांगड्या, कपाळावर चांदण्यांसारखी चमकणारी टिकली...या साध्या रूपातही मेघा खूप सुंदर दिसत होती..चहा आणि पोहे घेऊन जेव्हा मेघा बाहेर आली तेव्हा अविनाश तर तिच्याकडे पाहतच राहिला..त्यांची नजरानजर होताच मेघाने लाजून मान खाली झुकवली..अविनाशची तर नजर तिच्यावरून हटत नव्हती..त्याच्या आईने हळूच त्याला चिमटा काढला तेव्हा तो भानावर आला..सगळीकडे एकच हशा पिकला..
मेघाच्या वडिलांनी त्यांचं गाव वगैरे सर्व माहिती विचारली..
अविनाशचे आजोबा पूर्वी चांदगावला राहत असत..नंतर त्यांनी ते गाव सोडलं आणि त्याच्या शेजारीच असलेल्या पाचेगावला घर बांधलं..
अविनाशच्या बाबांच्या तोंडून चांदगाव हे नाव ऐकल्यावर मेघाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले..का कोण जाणे ते गावाचे नाव तिला ओळखीचे वाटत होते..अगदी जवळचे. हे नाव कुठेतरी ऐकलंय, पाहिलंय...पण कुठे...ते तिला आठवत नव्हते..स्थळ पसंत असल्याचे आणि पुढच्या बोलणीसाठी भेटण्याचे ठरवून अविनाश आणि त्याचे आई बाबा निघाले..
इथे मेघा मात्र त्याच विचारात होती..
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मेघा ऑफिसला गेली..ऑफिसमध्ये दोघांच लग्न ठरल्याची बातमी आधीच पसरली होती.ती ऑफिसमध्ये येताच अभिनंदनाचा वर्षाव झाला..मेघा खूप खुश होती..आणि अविनाशही...
लंच time मध्ये दोघ एकत्रच जेवायला बसले..अविनाशच्या लक्षात आले की मेघा कसल्यातरी विचारात आहे..
अविनाश - "मेघा डार्लिंग, काय झालंय ??कालपासून नोटीस करतोय..any problem???तुझ्या मनात काही चाललंय का?? तू खुश तर आहेस ना?? "
मेघा- "हो अविनाश, मी ठीक आहे...and off course, i am happy.. अविनाश, आता आपलं लग्न होणार आहे..तेव्हा मला असं वाटत की आपण एकमेकांपासून काहीही लपवायला नको..मला माहित आहे की u r open book.. त्यादिवशी propose करतानाच तू म्हणालास की तुझ्या आयुष्यात आलेली मी एकमेव मुलगी आहे... Now its my turn..."
अविनाश - "मेघा , मी तुला चांगलं ओळखतो..आणि हे बघ मला तुझ्या भूतकाळाशी काही घेणेदेणे नाही.."
मेघा - "नाही अविनाश...मला तुला काही सांगायचंय...
मला लहानपणापासून काही स्वप्न पडत आहेत. ते आजतागायत..भयानक.. अविश्वसनीय..
त्या स्वप्नात मला एक गाव दिसत..एक शेत दिसत...त्या शेतात बरीच माणसं काम करताना दिसतात..एक मुलगी दिसते..20-22 वर्षांची...आणि एक वाडा दिसतो..वाडा तर खूप मोठा आहे..एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचा असतो ना अगदी तसा...वाड्यात खूप मोठे मोठे फोटो लावलेले दिसतात..वाड्यात खूप खोल्या आहेत...वाड्याच्या समोरच एक बाग आहे..खूप सुंदर फुल उमललेली दिसतात...मला वाटत की तो मला बोलावतोय....सार काही रहस्यमय.रात्री पडलेल्या स्वप्नांचा परिणाम मला दिवसभर जाणवतो..खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा ..पण मी हे कधीच कोणाला जाणवू दिल नाही..अलिप्त राहायची.कोणात मिसळायची नाही..त्या दिवशी तुझ्या बाबांच्या तोंडून मी चांदगाव नाव ऐकलं तेव्हापासून मी विचारात पडलीये..
अविनाश- कसल्या विचारात??
मेघा - मी आठवण्याचा प्रयत्न केला की हे नाव मी कुठे ऐकलय... मग मला आठवलं की हे तेच गाव आहे जे मला आजपर्यंत स्वप्नात दिसत आलंय..
अविनाश - पण हे कसं शक्य आहे??how can u be so sure??? तू तर आमच गाव अजून पाहिलंही नाही..कशावरून तुला चांदगावच दिसतंय??
मेघा - हाच तर विचार मी करतेय..हे कसं शक्य आहे.पण तेच गाव आहे..गावाच्या वेशीवर एक निळ्या रंगाचा बोर्ड आहे त्यावर गावाचं नाव लिहिलंय, हे दिसत मला स्वप्नात..
अविनाश आश्चर्यचकित होऊन मेघाकडे पाहत होता...कारण ती जे सांगत होती ते खर होत..
मेघा- माझं नक्कीच काहीतरी नात आहे त्या गावाशी..आपलं एकमेकांना भेटणं , एकमेकांच्या प्रेमात पडणं, हा योगायोग नाही आहे..त्यामागे काहीतरी कारण आहे...रहस्य आहे
..
मेघाचे बोलणे ऐकून अविनाशही विचारात पडला..
त्याच महिन्यात मेघा आणि अविनाशचं लग्न होणार होतं...
"मला गावी जायचय अविनाश", मेघा काहीश्या विचारात होती..
"लग्नानंतर तर जायचंच आहे ना", अविनाश म्हणाला
"मला चांदगावला जायचय..मनावर दडपण ठेवून मला लग्न नाही करता येणार..pls मला घेऊन चल..",मेघा विनवणीच्या स्वरात अविनाशला म्हणत होती..
अविनाशही तयार झाला..ज्या गोष्टीची मेघा आतुरतेने वाट पाहत होती ते आता घडणार होतं..तिथेच तर मेघाला तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार होती..
अविनाश आणि मेघा गावी जायला निघाले..गावामध्ये आल्यावर त्यांना एक शेत दिसले..मेघाने गाडी थांबवायला सांगितली..आणि ती गाडीतून उतरून त्या शेतावर गेली..हेच ते शेत होते जे तिला स्वप्नात दिसायचे.
"या शेतात ती मुलगी दिसायची मला..हेच शेत आहे ते..",तिने अविनाशला सांगितले
जणू काही सर्व प्रसंग डोळयासमोर घडत असल्यासारखं तिला वाटत होतं..एक मुलगा आणि एक मुलगी..त्या शेतात पाठमोरे पळताना दिसत होते..त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते..आणि अचानक त्या मुलाने तिला पाठीमागून पकडलं..त्यांचे चेहरे मेघाला स्पष्ट दिसले..ती मुलगी म्हणजे ती स्वतः होती आणि तो मुलगा होता अविनाश..
"अविनाश",तिने घट्ट डोळे बंद करून घेतले..आणि अविनाशकडे गेली..
"मी तुला म्हटलं होतं ना काहीतरी नात आहे आपलं दोघांच..या गावाच..आता मी जे काही पाहिलं त्यावर माझा विश्वास बसत नाहीये.. मी आपल्या दोघांना पाहिलं.. हो..आपण दोघेच होते..", मेघा शांतपणे अविनाशला सांगत होती..
"म्हणजे आपण दोघ", अविनाश आश्चर्यकारक होऊन बघत होता..
"हो आपल्या दोघांचा पुनर्जन्म झाला आहे", मेघा म्हणाली
अविनाशचा अजूनही विश्वास बसत नव्हता..कारण आजपर्यंत त्याला मेघासारखं कधीही काहीच जाणवलं नव्हतं..
"या शेतात तू आणि मी भेटायचो..चोरून..आपण खूप प्रेम करायचो एकमेकांवर..तुला नाही आठवत का रे.. एकत्र शाळेत जायचो..खेळता खेळता कधी एकमेकांचे झालो हे कळलंच नाही", मेघा त्याला आठवण करून देत होती..
अविनाशही आठवायचा प्रयत्न करत होता..त्याच डोकं सुन्न झालं होतं..तो डोळे बंद करून तिथेच बसला..शेताच्या मातीत हात फिरवत..
"तुला आवडायचं अस मातीत हात फिरवायला", मेघा म्हणाली..
थोड्या वेळाने ते दोघे गाडीत बसले..आणि वाडा शोधू लागले..अविनाश कधीच त्या गावी आला नव्हता तरीही त्याला गाव आपलंसं वाटत होतं..जणू प्रत्येक रस्ता त्याच्या पायाखालून गेला आहे..आता त्यालाही जाणवू लागलं की आपण या गावी राहत होतो..
काही वेळातच ते वाड्याजवळ पोहोचले..ती दोघे गाडीतून उतरली..
मेघाने तो वाडा पाहिला.. तोच वाडा जो तिला इतकी वर्षे स्वप्नात दिसायचा. ती गेट मधून आत गेली.भयाण शांतता होती. सगळीकडे वाळलेल्या पानांचा ढीग पडला होता.पक्षांच्या किलबिलाटाने आसमंत भरून गेला होता.
ती पुढे जाणार इतक्यात अविनाशने तिला हाक मारली.
अविनाश - मेघा, थांब,नको जाऊस पुढे.
मेघा- अविनाश, हाच तो वाडा आहे .जो मला स्वप्नात दिसतोय लहानपणापासून. याच त्या भयानक गोष्टी आहेत ज्यांनी मला आजपर्यंत नीट झोपू दिल नाही.
अविनाश- मेघा, हा वाडा पडीक आहे..कोणीही येत नसावं इथे..आत एखादं जनावर असू शकत..प्लिज, जाऊ नकोस आत..
मेघा- नाही अविनाश, मला काही होणार नाही..
अविनाश- हा वेडेपणा आहे, मेघा.
मेघा - मी जाणार आहे तू ये अगर नको येऊस.
दोघांच वाद होतात.पण मेघा आत जाते.नाईलाजाने आणि काळजीने अविनाश ही तिच्या मागे जातो.दरवाजा अर्धवट उघडाच असतो.एक वेगळाच दर्प येतो दोघांना. भयाण अश्या त्या वाड्यात मेघा नजर फिरवते..वाडयात बरेच मोठे मोठे फोटो लावलेले असतात..वाड्याच्या मालकांचे फोटो असतात..त्यात एका फोटोमध्ये मेघाचा फोटो असतो..त्यात खाली नाव लिहिलेलं असत "कावेरी"...
म्हणजे मागच्या जन्मीच माझं नाव कावेरी होत..तिने अविनाशला तो फोटो दाखवला..तो ही आश्चर्य चकित होऊन पाहत होता..हुबेहूब मेघा..
दोघांनाही त्यांच्या पुनर्जन्माच कोड उलगडत नव्हतं..या वाड्यात काही सापडणार नाही..म्हणून त्या दोघांनी गावातल्या लोकांकडे विचारपूस केली..बऱ्याच जणांनी काशीबाबा कडून तुम्हाला वाड्याची माहिती मिळू शकेल असे सांगितले..ते कुठे राहतात वगैरे चौकशी करून काशीबाबाकडे जातात.गावाच्या वेशीवर त्यांच घर होत..घर कसलं पडीक झोपडीच ती.
मकरंद आणि काशी एकाच वयाचे..वाड्यावर एकत्र काम करत असत..काशीबाबाच्या घरी गेल्यावर आणि अविनाशला पाहिल्यावर त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या..60 वर्षांनंतर ते पुन्हा भेटले..दोघांनी एकमेकांना मिठी मारली...त्याने मेघाला पाहिले.."छोट्या मालकीणबाईसाहेब",काशीने हात जोडले..त्याला विश्वास नव्हता की कावेरी आणि मकरंद त्याच्या समोर उभे आहेत..
काशीबाबांनी त्यांना वाड्याची कहाणी सांगायला सुरुवात केली.
वाड्यावर काशी आणि त्याचे बाबा काम करत असत.. वाड्याचे मालक जयसिंगराव एकदम भारदस्त व्यक्तिमत्व.धिप्पाड शरीर,अंगभर सोनं, हातात सोन्याचा कडा, पिळदार मिश्या..गावात खूप दरारा होता त्यांचा.लोकांच्या जमिनी बळकवणे, धमकावून पैसे घेणे यासारखी कामे त्यांची माणसे करायची.
एक दिवस जयसिंगरावांचा मुलगा उत्तमराव गावातून जात होता.त्याची नजर कावेरीवर पडली..गोरी कांती, उंच बांधा, घारे डोळे असलेली कावेरी त्याच्या नजरेत भरली..रामा शेतकऱ्यांची मुलगी कावेरी..वडिलांसोबत शेतात काम करत होती..उत्तमरावने तिला पाहिल्यावर तिला मिळवण्याची इच्छा झाली.त्याच्या बदल्यात पैशाचं लालूच दाखवलं..पण असलं काही आम्ही करणार नाही..म्हणून रामा शेतकऱ्याने मान्य केलं नाही..
उत्तमरावाला राग आला..कावेरीला मिळवण्याच्या वेडाने तो झपाटला..काही पण करून तिला मिळवायचेच या अट्टहासाने तो पेटून उठला.
उत्तमरावाच्या वाड्यावर मकरंद गडी म्हणून कामाला होता..कावेरी आणि मकरंद हे एकाच वयाचे..सोबत शाळेत शिकलेले..मैत्री कधी प्रेमामध्ये बदलली त्यांचं त्यांना देखील कळलं नाही..ते रोज लांब शेतात कोणी बघणार नाही अश्या ठिकाणी भेटायचे..मकरंद आणि कावेरी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले..एके दिवशी उत्तमरावने त्यांना पाहिलं..त्याच वेळी कावेरीला पकडून वाड्यावर आणलं आणि तिला खोलीत बंद केलं.. मकरंदला खूप मारहाण करण्यात आली...
दुसऱ्याच दिवशी उत्तमरावने कावेरीशी जबरदस्तीने लग्न केलं..आणि तिच्या मनाच्या विरुद्ध तिचा संसार सुरू झाला..काही दिवसात तिला कळलं की आपल्याला एक सवतही आहे..उत्तमरावची पहिली बायको लक्ष्मी.."मालकीणबाई"..नवऱ्याच्या राक्षसीपणाला कंटाळलेल्या मालकीणबाईला कावेरीची दया आली..इच्छा असूनही त्या काहीच करू शकत नव्हत्या
काही दिवसातच मालकीण बाई आणि कावेरी म्हणजे छोट्या मालकीणबाईची चांगली गट्टी जमली. दोघींचा दिवस खूप छान जाई.पण अंगावर काटा आणणारी रात्र कावेरीला नकोशी वाटे.
उत्तमराव कावेरीवर रोज रात्री तुटून पडायचा..तिचा छळ करायचा...लग्नाआधी उत्तमरावाने तिला धमकी दिली होती की तुझ्या आई वडिलांना मारून टाकीन म्हणून कावेरी सर्वकाही सहन करायची.
कावेरी खूप मलूल होऊन गेली होती.तिच्या चेहऱ्यावरचे तेज नाहीसे झाले होते.तिचे भकास डोळे शून्यात बघत असायचे.मालकीणबाईला तिची अवस्था बघवत नव्हती. एक दिवस जे नाही घडायला हवं तेच घडलं..उत्तमराव दुसऱ्या गावी गेले होते आणि मालकीणबाईदेखील माहेरी गेल्या होत्या.हीच संधी साधून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला..मी खूप समजावलं..पण त्यांनी नाही ऐकलं..आणि त्याच रात्री ते पळून गेले..
इकडे शोधाशोध सुरू झाली..उत्तमराव गावी परतल्यावर त्याने कावेरीचा खूप शोध घेतला..ते काही सापडले नाही.दोघ पळून गेले म्हणून त्याने कावेरीच्या आणि मकरंदच्या संपूर्ण कुटूंबाला जीवे मारलं..
काशीबाबाच्या डोळ्यात पाणी तराळलं...
"आणि उत्तमराव त्यांचं काय झालं..",अविनाशने विचारलं..
10 वर्षांपूर्वी एका अपघातात जयसिंगराव आणि मालकीणबाई वारल्या..आणि उत्तमरावाचे पाय गेले.. ते आणि त्यांचा मुलगा दोघांनी वाडा सोडला आणि एका साध्या घरात राहत आहेत..
"पण तुम्ही दोघ इथे पुन्हा...", काशीबाबाला काहीच कळत नव्हतं..
"काशी, आम्ही दोघ पळून गेलो नव्हतो..आम्हाला मारून टाकले आणि वाड्याच्या मागे असलेल्या शेतात पुरून टाकलं होतं...",मेघा म्हणाली
काशीबाबा आश्चर्यचकीत होऊन मेघाकडे बघत होता..
"उत्तमरावला त्याच्या कर्माची शिक्षा द्यायला आमचा पुनर्जन्म झाला आहे..", मेघा म्हणाली.." मला भेटायचंय उत्तमरावला"...
मेघाने त्या दिवशी जे काही घडलं आणि जे आजपर्यंत कोणाला माहीत नाही ते सांगण्यास सुरुवात केली
त्या दिवशी उत्तमराव काही कामानिमित्त दुसऱ्या गावी जाणार होता..लक्ष्मीने मग तिने एक निर्णय घेतला..मकरंदविषयी कावेरीने लक्ष्मीला सांगितले होते. या सर्व त्रासांतून सुटका हवी असेल तर गावातून दोघांनी पळून गेल्याशिवाय पर्याय नाही..कावेरीला लक्ष्मीने आपली योजना सांगितली.असे करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच होते.पण तरीही कावेरी आणि मकरंद तयार झाले..लक्ष्मीनेही दोन दिवस माहेरी जाण्याची परवानगी मागितली...जेणेकरून तिच्यावर कोणाचा संशय येणार नाही..ज्या दिवशी उत्तमराव निघणार त्याच रात्री कावेरीने पण घरातून पळ काढण्याचे ठरवले.
त्या रात्री वाड्यावरची सर्व गडी माणसं झोपली होती..वाड्याच्या मागच्या बाजूने दोघांनी पळून जायचं अस ठरलं होतं..उत्तमराव निघाल्यावर थोड्या वेळाने मकरंद आला..कावेरी तयारीत होती.लक्ष्मीने थोडे पैसे दिले.. कावेरी आणि लक्ष्मी बाहेर फेरफटका मारायच्या निमित्ताने वाड्याच्या मागच्या बाजूला गेल्या.. मकरंद तिथे येऊन उभाच होता...कावेरी आणि मकरंद भेटताच लक्ष्मी तिथून निघून गेली आणि गपचूप खोलीत येऊन पडली..
दोघ तिथून जाणार इतक्यात उत्तमराव आणि त्याची माणसं तिथे आली.. त्याला कुठूनतरी सुगावा लागला होता की ही दोघ पळून जाण्याच्या तयारीत आहेत..उत्तमरावने कावेरीला पकडून ठेवलं आणि त्याच्या माणसांनी मकरंदला खूप मारहाण केली..ती गयावया करत होती..पण उत्तमराव क्रूरपणे हसत होता..त्याला इतकं मारल की त्यातच त्याचा जीव गेला..त्याचा मृतदेह पाहून कावेरी मटकन खालीच बसली..आपल्या आयुष्याची राखरांगोळी होताना बघत होती..तीच प्रेम निष्प्राण देह बनून खाली पडलं होतं..आता तिच्याही जगण्याला काहीच अर्थ उरला नव्हता..तिने मकरंदच्या देहावर डोकं ठेवलं..उत्तमरावने तिला हाताला धरून ओढले..तेव्हा तिचे डोळे बंद होते..तिने प्राण सोडले होते..
उत्तमरावने दोघांना वाड्याच्या मागच्या जमिनीत पुरून टाकलं...आणि गावात पसरवल की दोघ पळून गेली..
हे सत्य लोकांना सांगण्यासाठी आमच्या दोघांचा पुनर्जन्म झाला आहे..
तिघंही उत्तमरावच्या घरी गेले..उत्तमराव व्हीलचेअरवर बसून होता..कावेरी आणि मकरंदला पाहताच त्याला धक्का बसला..त्याला त्याच्या गुन्ह्याची जाणीव झाली..
"मी तुमचा गुन्हेगार आहे..इतक्या वर्षांपासून शिक्षा भोगतोय..मला क्षमा करा..", उत्तमराव काकुळतीला येऊन हात जोडून बोलत होता..
"सगळ्या गावासमोर तुला सांगावं लागेल ..तुझा गुन्हा तुला कबूल करावा लागेल..आमच्या दोघांबद्दल तू जे काही पसरवल ते खोटं होतं, हे सगळ्या गावाला सांगावं लागेल..", मेघा म्हणाली..
आणि दुसऱ्या दिवशी गावातल्या पंचायतीसमोर उत्तमरावने आपला गुन्हा कबुल केला,आपले हात जोडले..आणि तिथेच त्याने प्राण सोडले..कदाचित याच गोष्टीसाठी तो आजपर्यंत जिवंत होता..
मेघा आणि अविनाशला न्याय मिळाला..ते आपल्या घरी परतले.. आणि महिन्याभरात त्यांच लग्न झालं..
अशाप्रकारे कावेरी आणि मकरंद पुन्हा एक झाले...