Sneha Kale

Horror Fantasy Thriller

3  

Sneha Kale

Horror Fantasy Thriller

सुखद मृत्यू

सुखद मृत्यू

2 mins
239


अदिती आज पुन्हा दचकून उठली. राज तिला ओरडलाच...दिवसभर त्या suspence आणि horror stories वाचत असतेस.. म्हणून रात्रीची दचकून उठतेस.. राज ओरडला तशी अदिती पाणी पिऊन पुन्हा झोपली.

दुसऱ्या दिवशी अदिती राजला म्हणाली, "एखादा माणूस मेल्यानंतर कसं वाटत असेल ना त्याला.."

"तू ना खरच वेडी झाली आहेस..त्या गोष्टी वाचून वाचून तुझ्या डोक्यावर परिणाम होईल...आजपासून त्या stories वाचणं बंद कर." अदिती हिरमुसली..

राज म्हणाला ते बरोबर होत.कारण अदितीच्या वागण्यात पण बदल झाला होता.. ती सतत विचारात असायची.तीच कशात लक्ष नसायचं. मृत्यूनंतर काय होतं असेल, कशी स्थिती होत असेल, हे जाणून घेण्याची तिची इच्छा दिवसेंदिवस वाढत होती.

एक दिवस अदिती काही कामानिमित्त बाहेर गेली..काही वेळाने ती आली तेव्हा तिच्या डोक्याला मार लागला होता.. राज घाबरला.. तिचे accident झालं होतं..पण mobile घरीच विसरल्यामुळे ती राजला बोलवू शकली नाही.राजने तिला औषध दिले आणि आराम करायला सांगितलं.. थोड्या वेळाने अदिती उठली.. राजने तिच्यासाठी चहा बनवला आणि म्हणाला रात्रीच जेवण मी बनवणार आहे..तू आराम कर..अदिती सुखावली.

राजने जेवणाची तयारी केली..

जेवणाच्या वेळी त्याने अदितीला उठवलं..दोघ जेवले.. अदितीला औषध देऊन राजने तिला पुन्हा आराम करायला सांगितलं. राजने सगळं आवरून घेतलं आणि तो ही झोपायला आला..

सकाळी पहाटेच राजला जाग आली.. शेजारी अदिती दिसली नाही.बाथरूममध्ये असेल असे समजून तो पुन्हा झोपला.. बराच वेळ झाला तरी अदिती आली नाही.म्हणून तो तिला बघायला उठला..बाथरूममध्ये आल्यावर त्याने जे पाहिले त्यावर त्याचा विश्वास बसला नाही..

बाथरूमच्या आरश्यावर लिहिलं होतं..

"मृत्यूनंतर खूप सुखद वाटलं कारण तू सोबत होतास..

-अदिती"


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror