Sneha Kale

Drama Romance Inspirational

3  

Sneha Kale

Drama Romance Inspirational

साथ दे तू मला

साथ दे तू मला

14 mins
255


रात्रीची वेळ..आज मनस्वी जरा रागातच होती..स्वयंपाक झाल्यावर ती गौरांगला जेवणासाठी बोलवायला गेली.गौरांग आपली बॅग भरण्यात व्यस्त होता.."आलोच 2 मिनिटात", असे म्हणून तो जसजस आठवेल तस वस्तू बॅगमध्ये भरू लागला..

मनस्वीने त्याच आणि आपलं जेवण वाढून घेतलं..तेवढ्यात गौरांग आला.दोघ जेवायला बसली.. तो आपल्याशी काहीतरी बोलेल या आशेने ती त्याच्याकडे पाहत होती..पण गौरांग मात्र काहीच न बोलता पटापट जेवून मोकळा झाला..जेवण आटोपल्यावर रूममध्ये जाऊन त्याने पुन्हा आपली बॅग भरण्यास सुरुवात केली.. 


कामानिमित्त त्याला आठवड्याभरासाठी ऑफिसच्या गेस्ट हाऊसवर राहायला जावे लागणार होते..म्हणूनच मनस्वी रुसून बसली होती..गौरांगची पॅकिंग बऱ्यापैकी झाली.त्याने सर्व पसारा आवरून बेडवरची चादर नीट केली आणि बेडवर पडून मोबाईलमध्ये गेम खेळत बसला..जेवणानंतरची कामं आवरून मनस्वी रूममध्ये आली..रागातच गौरांगच्या शेजारी येऊन बदली..तो काहीच बोलत नाही हे पाहून नाईलाजाने मनस्वी त्याच्याजवळ जाऊन म्हणाली," एवढं रे कसलं काम असत तुला... आठवडाभर तू नसणार माझ्या जवळ..शिवाय बाहेरच वातावरण कस आहे, कोरोनाच्या काळात लोक घराच्या बाहेर पडत नाहीत आणि तू तिथे राहायला चाललास.कोण कुठून येत, आपल्याला काही कळतं का..भीती वाटते रे.."..मनस्वीचे डोळे पाणावले. 


"अगं खुप काम आहे मला आणि आठवड्याचा तर प्रश्न आहे..मी काळजी घेईन ग माझी..आमच्या कंपनीत खूप स्ट्रिक्टली सर्व गोष्टी फॉलो कराव्या लागतात..फेस शिल्ड, डबल मास्क, सॅनिटायझर, सोशल डीस्टन्स काटेकोरपणे पाळतो आम्ही..डोन्ट वरी..आणि पुढच्या सोमवारी परत येणारच आहे मी..", अस म्हणत खट्याळपणे हसत एक डोळा मारत गौरांग म्हणाला.. 


"तुझ्याशी काही बोलण्यात अर्थ नाही.जा मला एकटीला सोडून आणि बसू दे मला इथे काळजी करत..सगळे वर्क फ्रॉम होम करतात आणि हा लांब राहायला चालला..",

अस म्हणून ती त्याला पाठ करून मुसमुसत झोपू लागली.ती रडतेय हे पाहून गौरांगने मोबाईल बाजूला ठेवला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. 


"ए मनू, का ग अशी रागवते...मला नाही का आठवण येणार तुझी..काम आहे तर जावंच लागेल ना ग.अशी रागावलीस तर माझं मन लागेल का तिकडे ", अस म्हणून त्याने हळूच तिला हाताला धरून वळवलं..तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले..माथ्याचे चुंबन घेतले. तिला कवेत घेतले. इथेच ती पाघळली.त्याला जणू तिचा राग घालवण्याचा गुपित ठाऊक होतं.. 


"नको ना जाऊ मला सोडून", हे बोलताना तिचा तो गयावया करतानाचा चेहरा त्याला पाहवेना..

"तुझ्याशिवाय आठवडा कसा जाईल.. एकतर घरात दिवसभर एकटीच असते.. बोलायला कोणी नाही.. दिवस कसाही जातो..संध्याकाळी तू यायच्या वेळी किती वाट बघत बसलेली असते मी..तू येण्याआधी घर आवरते, स्वतः आवरते..आता तर आठवडाभर तू भेटणार पण नाही", मनस्वी चेहरा बारीक करून बोलत होती.. 


" तुला काय वाटलं मी राहू शकतो का तुझ्याशिवाय..कधी ऑफिसमधून निघतो आणि घरी येतो अस होत मला..घरी आल्यावर तुला पाहिलं ना की खूप बर वाटत..दिवसभराचा सगळा क्षीण निघून जातो..तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल बघून मी सगळं काही विसरून जातो..आता काम आहे म्हणताना जावं तर लागेलच ना..आणि पुढचे दोन दिवस मी सुट्टी घेणार आहे .दोन दिवस मी आणि माझा वेळ फक्त तुझा.चालेल ना.", गौरांग तिची समजूत काढत म्हणाला.

तिने होकारार्थी मान डोलावली आणि त्याच्या कुशीत शिरली..दोघ प्रणयसागरात बुडाली.. 


सकाळी तिला पहाटेच जाग आली..तो अजून गाढ झोपला होता..त्याच्या चेहऱ्याकडे ती पाहत बसली होती..वेळ अशीच थांबून राहावी आणि त्याच्याकडे असेच बघत राहावे, असे तिला वाटत होते. त्याच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवला.रात्रीच्या आठवणींनी ती लाजेने चुरचुर होत होती..त्याचा स्पर्श तिला अजूनही जाणवत होता..मंद स्मितहास्य उमटले तिच्या चेहऱ्यावर..त्याला उठायला अजून वेळ होता..मग ती तशीच पडून राहिली. 


थोड्या वेळाने गौरांगला जाग आली..शेजारी मनस्वी नव्हती..तो उठला आणि आवरायला सुरू केलं..गौरांग आवरून आला तेव्हा मनस्वीने त्याला नाश्ता दिला आणि स्वतः ही त्याच्या शेजारी बसली..दोघांनी गप्पा करत नाश्ता संपवला..गौरांग निघाला तेव्हा हे घेतलं का ते घेतलं का अस विचारून काही राहील नाही ना याची खात्री करत होती..त्याच्या निघायची वेळ जसजसं जवळ येत होती तस मनस्वी उदास दिसत होती.. गौरांग निघताना पण एवढस तोंड करून तिने त्याला bye केलं.. 


गौरांग गेल्यावर तिने घरातली काम आवरायला घेतली...आज तीच कशातच मन लागत नव्हतं.. जेवणाची पण इच्छा नव्हती..

पण काहीतरी खायचं म्हणून दुपारसाठी खिचडी केली.कसबस जेवली आणि थोडा वेळ झोपली.. 


संध्याकाळी 6 वाजता गौरांगचा कॉल आला..मनस्वी नुकतीच झोपून उठली होती..काय चालू आहे वगैरे विचारपूस करत ती दोघ गप्पा मारत होती..गेस्ट हाऊस चांगलं आहे, राहण्याची आणि जेवणाची सोय चांगली आहे हे कळल्यावर मनस्वीला हायस वाटलं..दोघांचं बोलणं झालं..तिला काही सामान आणायला जायचं होतं म्हणून ती खाली जाण्यासाठी आवरायला गेली..15- 20 मिनिटांनी पुन्हा गौरांगचा कॉल आला..

"अगं मनू, मी घरी येतोय", गौरांग म्हणाला

" काय झालं, आणि तुझा आवाज असा का वाटतोय", मनस्वीने काळजीच्या सुरात विचारले..

"मला थोडं अस्वस्थ वाटतंय..कणकण वाटतेय आणि तापही आलाय..तसं औषध घेतलंय मी...पण मी घरी येतो..उगाच रिस्क नको", गौरांग म्हणाला..

" बर ठीक आहे..ये सांभाळून", मनस्वी म्हणाली..

" मनू, मी आपल्या गेस्ट रूम साफ करून ठेवशील का..मी तिथेच राहतो..कोरोनाची लक्षण वाटत आहेत ग..माझं सामान तर माझ्याकडे आहे...त्यामुळे दुसरं काही लागणार नाही.." , गौरांग म्हणाला...

" मी करते सगळं....तू काळजी नको करुस..तू ये व्यवस्थित", मनस्वी म्हणाली.. 


मनस्वीने गौरांगला धीर तर दिला पण ती ही आतून थोडी विचलित झाली होती..तो येईपर्यंत ती अस्वस्थ होती.त्याच स्थितीत तिने गेस्ट रूम आवरली.. गरम पाणी, पांघरूण नेऊन ठेवले..काही वेळाने गौरांग घरी आला..सरळ गेस्ट रूममध्ये गेला..कपडे बदलून अंथरुणावर पडला..मनस्वीने चहा केला ..त्याला नेऊन दिला..तेव्हा गौरांगने तिला आत न येता दारातच चहाचा कप ठेवायला सांगितले.. 


काही वेळाने त्याने थर्मामीटर मागितले..त्याचा ताप वाढतच होता..ऑफिसमधून येताना त्याने औषध घेतलं होतं पण त्याने फारसा फरक पडला नव्हता..तो झोपूनच होता..तासाभराने त्याला घाम यायला लागला..थोडा ताप कमी झाल्यावर त्याने फॅमिली डॉक्टरांना कॉल करून सगळं सांगितलं..दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने त्यांनी सोमवारची अपॉइंटमेंट दिली..तात्पुरती औषध लिहून दिली..त्या रात्री त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला..त्याने कुठेतरी वाचलं होतं ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ लागली की पोटावर पालथं झोपायचं.त्याने लगेच तस केलं..तेव्हा जरा बर वाटू लागलं.. 


रविवार पूर्ण दिवस तो झोपून होता. त्याचा ताप कमी जास्त होत होता..खूप अशक्तपणा जाणवत होता.गौरांगला काय काय खायला द्यायचं ते मनस्वीने डॉक्टरांना विचारून घेतलं आणि त्याप्रमाणे हळदीचे गरम दूध, कमी तिखट आणि कमी तेल असलेलं जेवण बनवून दिल..गौरांगला काही खाण्याची इच्छा होत नसे पण औषध घ्यावी लागतात म्हणून तो कसंबसं जेवत असे..रात्री मनस्वीला झोप लागेना..आदल्या रात्री गौरांगला श्वास घेता येत नव्हता हे जेव्हा तिला कळलं तेव्हा मला उठवलं का नाही म्हणून ती चिडली होती त्याच्यावर... रात्री 1 वाजून गेला तरी तिच्या डोळ्याला डोळा लागेना..गौरांगच्या खोलीत सारखी डोकावत होती..शेवटी उद्या डॉक्टरकडे जायचं म्हणून झोपी गेली. 


 मनस्वीला सकाळी सहालाच जाग आली..तिने जाऊन बघितलं तर गौरांग अजून झोपला होता..डॉक्टरांनी लवकर बोलावलं होतं म्हणून गौरांगला उठवलं आणि ती अंघोळीला गेली..गौरांगला खूप अशक्तपणा जाणवत होता..त्याच स्थितीत तो उठला आणि फ्रेश होण्यासाठी गेला..

मनस्वीने पटापट आवरलं..नाश्ता बनवला..गौरांगला दिला..स्वतः नाश्ता केला...आणि दोघ डॉक्टरकडे जायला निघाले.. 


  डॉक्टरांकडे पोहोचल्यावर रिसेप्शनवरच त्याचे वजन, पल्स रेट आणि ऑक्सिजन चेक करून दोघांना आत पाठवले..

गौरांगने शनिवार पासून काय काय त्रास होतो हे सर्व सविस्तरपणे सांगितले..गौरांगची लक्षणं पाहून त्याला कोरोनाची टेस्ट करून घ्यायचा सल्ला दिला..आणि रिपोर्ट आल्यावर पुढची ट्रीटमेंट करू.गौरांगने त्याच दिवशी लगेच टेस्ट करून घेतली.. 


टेस्ट करून घेतल्यापासून गौरांग सतत विचारात असे.. तो मनाने खचला आहे, अस्वस्थ आहे, हे मनस्वीला जाणवत होते..रात्री जेवताना नेहमीप्रमाणे सोबत नाही बसू शकत म्हणून मनस्वी गेस्ट रूमच्या दारात बसून गौरांग सोबत जेवायला बसली..गौरांगला बर वाटावं म्हणून त्याच्याशी गप्पा मारत जेवत होती..इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून त्याला हसवण्याचा, त्याच मन वळवण्याचा प्रयत्न करत होती..त्याला मानसिक आधार देत होती..ज्याची गौरांगला आता नितांत गरज होती.. 


गौरांगने औषध घेतली आणि तो अंथरुणावर पडला..रात्रभर त्याला झोप लागत नव्हती..अधूनमधून त्रास होत होता..तरीही तो झोपण्याचा प्रयत्न करत होता..इथे मनस्वीची अवस्था काही वेगळी नव्हती..रिपोर्ट काय येईल याचीच चिंता तिला लागून राहिली होती.. 


दुसऱ्या दिवशी सकाळीच रिपोर्ट आले.. 


रिपोर्ट पोसिटीव्ह होते..गौरांगला कोरोना झाला होता.. 


त्याने मनस्वीला सांगितले..एका क्षणासाठी ती स्तब्ध झाली..आता पुढे काय..काहीच सुचत नव्हतं..मग तिने ठरवलं की काही झालं तरी आपली मनस्थिती ढळू द्यायची नाही..आपणच कमजोर पडलो तर गौरांगला कस सांभाळणार.. 


रिपोर्ट घेऊन डॉक्टरकडे गेले असता त्यांनी अन्य एका कोविड स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाण्यासाठी सांगितले..लगेच ते दोघे त्यांच्याकडे गेले..त्या डॉक्टरांनी त्याचा पोसिटीव्ह रिपोर्ट पाहिला..त्याच xrey काढलं...त्यात गौरांगला न्यूमोनिया झाल्याचे कळले..डॉक्टरांनी लगेचच ऍडमिट होण्यास सांगितले... 


संध्याकाळी त्याने आपली बॅग भरली..सर्व सामान घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये गेले..त्याला ऍडमिट केल्यावर लगेचच त्याची ट्रीटमेंट चालू करण्यात आली..मनस्वीने सर्व फॉर्मलिटी पूर्ण केल्या... डिपॉझिट भरलं..आणि घरी आली.. 


थोडा वेळ आराम करून रात्रीच्या जेवणाची तयारी करायला लागली..कमी तेल आणि कमी तिखटाचं जेवण बनवलं..हॉस्पिटल अगदी जवळ असल्याने रात्रीच जेवण ती देऊन आली.. घरी आली तेव्हा सर्व शांत वाटत होतं. .खरंतर इथून पुढे खरी लढाई सुरू होणार होती ती गौरांगची कोरोना आणि येणाऱ्या नकारात्मक विचारांविरुद्ध...मनस्वीची वाटचाल सुरू झाली त्याला या विचारांपासून सकारात्मकतेकडे नेण्याकडे.. 


मनस्वीला रात्री जेवण जाईना ...चार घास पोटात ढकलले आणि झोपायला गेली..अंथरुणात पडली पण झोप येत नव्हती..

'खूप एकटं वाटतंय मला गौरांग...तुझ्याशिवाय राहायची सवयच नाही ना रे मला...माहेरी गेले तरी जास्त दिवस कधी राहिलेच नाही..गेले चार दिवस एकाच घरात राहून वेगवेगळ्या खोलीत राहत होतो आपण.. फक्त एकमेकांना लांबून डोळे भरून पाहण्याव्यतिरिक्त काहीच करू शकलो नाही...जीवाची घालमेल होत होती माझ्या ..कधी एकदा तुला घट्ट मिठी मारते अस होत होतं.. पण हा आजारच असा आहे की इच्छा असूनही तुझ्या जवळ येता आलं नाही..आणि आता तर तुला बघता ही येणार नाही.. खूप आठवण येते रे तुझी...मागच्या वर्षीपासून कोरोनाच्या बातम्या ऐकून मन अस्वस्थ होत होत..यावर्षी काही जवळच्या व्यक्ती मृत्युमुखी पडल्या तेव्हा याची तीव्रता कळली लोकांची जगण्यासाठीची धडपड कळली..लोकांकडे पैसे आहेत पण injection मिळत नाही आणि त्यायोगे चालणारा काळाबाजार, लूट हे पाहिलं तेव्हा कळलं या जगात पैसा खुप मोठ्या जागी आहे बाकी माणुसकी , आपुलकी, कर्तव्य या सगळ्या गोष्टी नगण्य आहेत...', तिच्या डोळ्यात पाणी तरळलं.. 


मोबाईलमधल्या गौरांगच्या फोटोकडे बघत बसली...'तस घरी असला तरी फार काही बोलत नाही आपण .पण तू घरी येण्याची वाट मात्र मी पाहत असते...तुझ्या वाटेला डोळे लावून बसलेली असते..घडाळ्याचा काटा जसजसा पुढे सरकतो तस तुला बघण्याची ओढ वाढतच जाते..तू आलास, तुला पाहिलं की जीवात जीव येतो माझ्या..तुझ्या मिठीत विसावते ते माझ्यासाठी स्वर्गसुख आहे.', मनस्वी विचारांमध्ये रमली आणि तिला कधी झोप लागली हे तिला देखील कळलं नाही.. 


सकाळी लवकर उठून नाश्ता बनवायचा, तो 8.30 च्या आधी हॉस्पिटलमध्ये नेऊन द्यायचा, घरी येऊन घरातलं आवरायचं, जेवण बनवायचं, ते 1 च्या आधी नेऊन द्यायचं...घरी येऊन जेवायचं, थोडा आराम करायचा, पुन्हा संध्याकाळी 5 वाजता गरम दूध नेऊन द्यायचं घरी येऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करायची....हा दिनक्रम होता मनस्वीचा..आठवडाभर..

एकही दिवस तिने तो चुकवला नाही.. 


ती फक्त डबाच देऊन यायची अस नाही तर जेवणाच्या डब्यासोबत एक प्रेमाचा आणि सकारात्मक msg लिहून पाठवायची..आणि मग तो ते वाचून त्याचा reply द्यायचा...तो वाट बघायचा रोज तिच्या चिठ्ठीची...असा दोघांचा पत्रव्यवहार सुरू होता..तिने पाठवलेल्या चिठ्ठया त्याच्यात लढण्याची नवीन उमेद निर्माण करायच्या.. 


एकदा तिने एक कविता करून पाठवली होती... 


Open with smile😊😊 


हे ही दिवस निघून जातील

जास्त विचार करू नकोस

सकारात्मक राहा सतत

मी आहे तू घाबरू नकोस 


मन मजबूत कर तुझं

शरीर आपोआप मजबूत होईल

तू हाच विचार कर

सगळं काही व्यवस्थित होईल 


मी वाट पाहतेय तुझी

कधी तू मला कवेत घेशील

लवकर बरा होऊन

कधी घरी येशील 


I miss u a lot..Can't express in words...

I love u...

Don't think negative 


तो तर पॉझिटिव्ह होताच पण ती ही पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक होती..मनाने, विचाराने, ती खंबीरपणे उभी होती त्याच्यामागे..न जाणो कोणतं बळ यायचं तिला जेव्हा त्याच्यासाठी काही करायचं असायचं..इतर वेळी आधीच आजारी असलेली ती थोडं काम करून थकून जायची पण आता मात्र सदैव तत्पर असे. 


आपण जेव्हा कोणावर प्रेम करतो तेव्हा त्याच्यासाठी काहीही करायची तयारी असते आपली.आपल्या प्रेमासाठी जीवाची बाजी लावायला पण आपण तयार असतो..कितीही कमजोर असलो ना आपण तरी आपल प्रेम आपल्यात ताकद निर्माण करत, हेच सगळं मनस्वी अनुभवत होती.. 


दिवस कामात, धावपळीत निघून जायचा पण दिवसभर उत्साही असलेली मनस्वी रात्री मात्र मलूल होऊन जायची.. त्याची आठवण काढत रडत बसायची..गौरांगला आजारपण कधी माहीतच नाही.. कधी झोपून राहिलाय अस झालंच नाही..सतत धावाधाव करायची,सुट्टी असली की काही न काही करत राहायचं...त्याला अस आजारी पडलेला बघून तिचा जीव कासावीस होई..तसच रडत विचार करत कधी झोपून जायची हे तिला देखील कळायचं नाही.. दिवसभराच्या थकव्यामुळे तिला लगेच झोप लागायची... 


हॉस्पिटलमध्ये गौरांगला खूप कंटाळा येत असे..दिवसभर सलाईन लावलेलं असल्यामुळे झोपून राहावे लागे.. अशक्तपणा इतका होता की चार पावलं जरी चालली तरी दम लागे..ऑक्सिजन कमी जास्त होत असे..मनःस्थिती पण ठीक नसायची..कितीही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला तरी नकारात्मक विचार काही पाठलाग सोडत नव्हते...मग तो मनस्वीशी गप्पा मारत बसे..कधी विडिओ कॉल तर कधी नुसता कॉल... 


दोघे बराच वेळ फोनवर बोलत..अगदी लग्नाच्या आधी गप्पा मारायचे तसं..लग्नानंतर गौरांग इतका स्वतःहून कधीच बोलला नव्हता..मनस्वीचीच बडबड चालू असायची.. त्यामुळे मनस्वीला खूप बर वाटत होतं...आजारपणाच्या निमित्ताने का होईना त्यांच्यात पुन्हा पूर्वीसारखं प्रेम फुलू लागलं.अधिकाधिक वाढू लागल होता..त्यामुळे मनस्वीला त्याच्यासाठी काय करू काय नको असं होतं... 


एकदा मनस्वीने बराच वेळ कॉल उचलला नाही..तर गौरांग तिच्यावर ओरडला," तुला माहितीये ना मी इथे एकटा असतो..बोलायचं असत तुझ्याशी..लवकर कॉल उचलायला काय होत..", 

"अरे मी बाथरूममध्ये होते..आणि एकटेपणाच म्हणशील तर मी पण घरी एकटीच असते...रोजच..तू ऑफिसमध्ये असताना मी तुला कधी कॉल केला तेव्हा तू ही कधी कधी कॉल उचलत नाहीस..तेव्हा मला ही असच वाटत..", मनस्वीने थोडं चिढून फोन ठेवून दिला..

गौरांगला आपल्या चुकीची जाणीव झाली..आपण चार दिवस एकटं राहिलो तर आपल्याला एकटेपणा अंगावर येऊ लागला..मनस्वी तर घरी एकटीच असते..आणि मी तर तिला कधी कॉल पण करत नाही...कशी राहत असेल ती... 


मग त्याने sorry असा msg पाठवला...आणि दोघ चॅटींग मध्ये गुंतली.. 


गौरांगच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती..इंजेक्शनमुळे त्याला खूप फरक जाणवत होता..मनस्वीला हे जेव्हा कळलं तेव्हा खूप आनंद झाला होता तिला..तिचा खुललेला चेहरा पाहून गौरांगला अजूनच बर वाटे..दोन दिवसांनी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.. 


हॉस्पिटलमधून जरी सोडला असलं तरी घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली नाही..किमान एक आठवडा तरी वेगळं राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.. त्यामुळे गौरांगला दुसऱ्या ठिकाणी राहावे लागणार होते..त्यांच्या शेजारची रूम रिकामी होती..तिथे गौरांगची एका आठवड्याची सोय करण्यात आली..ती रूम बरेच दिवस बंद होती म्हणून मनस्वीने आधीच रूम स्वच्छ करून ठेवली..त्याच्यासाठी अंथरुण, पांघरूण, अंघोळीसाठी बादली , साबण, वगैरे वस्तू आणून ठेवल्या..गौरांग हॉस्पिटलमधून परस्पर त्या रूमवर गेला..त्याला ज्या गोष्टी लागत होत्या त्या रूमवर ठेवून बाकीच्या गोष्टी मनस्वी घरी घेऊन आली..आता तिला हायस वाटत होतं..निदान गौरांग आता तिच्या शेजारी तरी होता .. 


मनस्वीचे वेळापत्रक अजूनही तसेच सुरू होते..फक्त एवढंच की आता तिची धावपळ थोडी कमी झाली होती.. 


दुसऱ्या दिवशी सकाळपासून मनस्वीला थोडा थकवा जाणवत होता.त्याच स्थितीत तिने घरातलं आवरलं..गौरांगसाठी आणि स्वतःचा नाश्ता बनवला..तो उठला की नाही हे कॉल करून विचारले..गौरांग नुकताच उठून फ्रेश होत होता.. 


"काय झालं, आज नीट बोलली नाहीस..गुड मॉर्निंग विश पण केलं नाही", गौरांग ने विचारले..

" मला कंटाळा आला आहे आता..कुठेतरी निघून जावंसं वाटत..थकायला झालंय.. खूप रडावस वाटत..", मनस्वी रडवेली होऊन म्हणाली..काही न बोलता तिने फोन ठेवून दिला.. 


'आता मध्येच काय झालं माझ्या मनूला', असा विचार करत असताना त्याची नजर मोबाईलच्या स्क्रीन वर गेली..आजची तारीख पाहून त्याला खात्री पटली की नक्कीच तिच्या पाळीची तारीख जवळ आली असणार किंवा पाळी आली असेल....कारण मागच्या काही दिवसात मनस्वीची खूप धावपळ झाली होती..नाहीतर मला सकारात्मक विचार करायला सांगणारी असा नकारात्मक विचार करूच शकत नाही..मला माहित आहे खूप त्रास होतो माझ्या मनूला या दिवसात..चिडचिड, त्रागा, डोकेदुखी, अंगदुखी आणि अतिरिक्त रक्तस्राव.. माझ्यासाठी किती धडपडतेय ती..अश्या अवस्थेत सुद्धा...मला हतबल झाल्यासारखं वाटतय... 


त्याने तिला msg केला

" पाळी आली का तुला.." गौरांग

" हो"..मनस्वी

"जास्त दगदग करू नकोस... थोडा आराम कर...जेवण नंतर बनव...काही घाई नाही..स्वतःची काळजी घे..." गौरांग

"हो", मनस्वी मुसमुसत म्हणाली..

"मनू, नकारात्मक विचार का करतेस..आता कुठे मला बर वाटायला लागलंय आणि तू अस बोललीस तर मला एनर्जी कुठून मिळणार..तुला अस बघून मला उत्साह वाटेल का", गौरांग म्हणाला

"काय करू मी गौरांग..नाही जमत मला..खूप त्रास होतोय..शारीरिक आणि मानसिक सुद्धा..नकारात्मक विचारांचं म्हटलस तर जगाला प्रकाशित करणारा सूर्यही अस्ताला जातो, अंधारात वाट दाखवणाऱ्या चंद्राचीही ग्रहणापासून सुटका नाही, समुद्रातही भरती ओहोटी येते..निसर्गात एवढे चढ उतार होतात मग आपलं मन तर खूप क्षुल्लक आहे..त्यात सगळ्या प्रकारचे विचार येणारच..सतत सकारात्मक नाही राहता येत...आणि त्यात तू जवळ नाहीयेस त्यामुळे अजूनच त्रास होतोय मला..", मनस्वी म्हणाली..

"मी हतबल आहे मनू..आता याक्षणी अस वाटत की धावत यावं आणि तुला जवळ घ्यावं..पण..थोड्या दिवसांचा प्रश्न आहे..मी पूर्ण बरा झालो ना की तुला कधी सोडून जाणार नाही.." गौरांग म्हणाला.. 


'मी आजारी पडल्यापासून किती धावपळ करतेय माझी मनू..किती काळजी घेतेय..सतत सकारात्मक विचार करायला सांगते..आणि मी. मागे एकदा तिला बर वाटत नव्हतं तर 'काय होत सारख सारख काय माहीत', अस म्हणून किती चिडलो होतो तिच्यावर..तिची टाच दुखत होती तेव्हा किती वेळा तिने मला सांगितले पण मी नेहमीच दुर्लक्ष केलं..कधीतरी जेव्हा तिला थंडी भरायची तेव्हा स्वेटर घालायची ती..यावरून तीची मी मस्करी केली होती..आणि कहर म्हणजे एकदा तिने औषध मागितलं तेव्हा तिच्या अंगावर गोळी फेकली होती आणि स्वतःच्या या कृत्याच समर्थन पण केलं की तू कॅच नाही पकडलीस..किती वाईट वाटलं असेल तिला..पण ती हे सारं विसरून फक्त माझ्यासाठी धडपडतेय..सकाळी लवकर उठत असेल तेव्हा तिची झोप पूर्ण होत नसेल..3-4 वेळा खाली वर करून तिचे पाय आणि टाच दुखत असेल..अंग दुखत असेल...किती त्रास होत असेल माझ्या मनूला..आणि रात्रीची झोपत पण नसेल...एकटीला झोप कुठे येते तिला..घाबरट कुठली..',अस म्हणून तो स्वतःच हसू लागला. 


विचार करता करता तो आठवणींमध्ये हरवून गेला..एकदा संध्याकाळी गौरांग घरी आला तेव्हा मनस्वी तोंड पाडून रडत बसली होती..किती वेळा गौरांगने विचारलं पण काहीच उत्तर नाही..त्याने ओळखले होते...तिला काय त्रास होतोय ते...त्याने विचारले पण तिने काहीच उत्तर दिले नाही..काही बोलली नाही ..त्याच्यासाठी चहा दिला आणि रूममध्ये जाऊन पडली..मनस्वीला खूप त्रास होत होता म्हणून रात्रीचे जेवण बाहेरून मागवले होते..त्रासामुळे तिला जेवणही जात नव्हते..त्याने जबरदस्ती भरवले होते...रात्री झोपताना गौरांगने तिच्या पायांना तेल लावून तिचे पाय चेपले.. तेव्हा मनस्वीला जास्तच रडू फुटलं..तिने उठून लगेच गौरांगला मिठी मारली आणि अजूनच रडू लागली...

"ए वेडाबाई, बर वाटतंय का आता..."

तिने होकारार्थी मान हलवली आणि त्याच्या कुशीत झोपून गेली.. 


पाळीमुळे तिला काही काम करायला जमत नव्हते..पण गौरांग साठी तिने जेवण बनवले आणि त्याला नेऊन दिले..पूर्ण दिवस ती आरामच करत होती..संध्याकाळी थोडं बर वाटल तेव्हा तिने थोडं खाल्लं..थोड्या वेळाने उठली आणि रात्रीच्या जेवणाला लागली.. 


दुसऱ्या दिवशी सकाळी मनस्वी नाश्ता द्यायला गेली तेव्हा गौरांग पूर्वीसारखा फ्रेश वाटत होता.. त्याने मनस्वीला छानशी स्माईल दिली..मनस्वी तेव्हा काही बोलली नाही..तिने त्याला msg पाठवला..

'आज तुला हसताना बघून बर वाटल...इतक्या दिवसाची धावपळ सार्थकी लागल्यासारखे वाटले....I love u so much...' 


तीन चार दिवसांनी गौरांगला डॉक्टरांनी फॉलो अपला बोलावले आणि घरी जाण्यास हरकत नाही , असे सांगितले.. 


घरी गेल्यावर मनस्वीने गौरांगला ओवाळून घरात घेतले.गौरांग घरी आला तरी तो मनस्वीच्या जवळ जात नव्हता..तिची त्याला स्पर्श करण्याची , मिठी मारण्याची खूप इच्छा होत असे..इतके दिवस जवळ असूनही फक्त त्याला बघून मन भरत होती..ती जवळ येण्याचा प्रयत्न करताच तो तिच्यापासून लांब लांब जाई.. मनस्वीला खूप वाईट वाटे.. त्याने घरी येताच तिला सांगितलं ३-४ दिवस माझ्या जवळ यायचं नाही...तो हळूहळू बरा होत होता पण अशक्तपणा अजूनही होता..त्या परिस्थितीत इच्छा असूनही मनस्वीला प्रेम करू शकत नव्हता..

त्याची अवस्था पाहून तिने स्वतःला समजावले..स्वतःच्या इच्छेपेक्षा त्याची प्रकृती महत्वाची..त्याला जेव्हा पूर्णपणे बरं वाटेल तेव्हा तो आपणहून मला जवळ घेईल.. 


दोघांचा नित्यक्रम पुन्हा सुरू झाला..गौरांगने हळूहळू जेवणात वाढ केली..थोडाफार व्यायाम करायला सुरुवात केली..पथ्यही कमी केलं.औषध चालूच होती...मनस्वी गौरांगला जबरदस्ती टेरेस वर घेऊन जायची जेणेकरून त्याला मोकळं आणि फ्रेश वाटेल..इतके दिवस हॉस्पिटल आणि मग वेगळ्या रूममध्ये राहिल्यामुळे एक प्रकारची मरगळ आली होती..त्यामुळे बाहेर पडल्यावर गौरांगला बर वाटू लागलं.. 


गौरांगला घरी येऊन 5 दिवस झाले असतील..एकदा सकाळी मनस्वी झोपली असताना गौरांग तिच्या जवळ गेला आणि तिच्याकडे बघतच राहिला..खूप शांत झोपली होती ती... त्याने हलकेच तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले..'तुझ्याशिवाय कसा राहिलो मी इतके दिवस मनू..माझं मला माहित आहे..', असा विचार करत त्याचे डोळे पाणावले..त्याच्या स्पर्शाने मनस्वीला जाग आली..गौरांगला आपल्या शेजारी बघून ती आश्चर्यचकित झाली आणि दुसऱ्याच क्षणाला आनंदीही ...तिने उठून लगेच गौरांगला मिठी मारली..दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.. 


मनस्वी उठून अंघोळीला गेली..येऊन बघते तर गौरांगने दोघांसाठी चहा आणि नाश्ता बनवला होता..मनस्वीला तर काय बोलू तेच सुचत नव्हतं..सकाळपासूनच तिला आश्चर्याचे सुखद धक्के मिळत होते..गौरांगने तिला हाताला धरून बसवलं आणि तिच्या पुढ्यात नाश्ता ठेवला..स्वतःसाठी नाश्ता घेऊन तिच्या शेजारी बसला..तिचा हात हातात घेऊन म्हणाला," तू म्हणतेस ना नेहमी की तुझ्याशिवाय माझं कस व्हायचं...खरंच आहे ते काही नाही होऊ शकत माझं तुझ्याशिवाय...या आजारपणात मी एक गोष्ट शिकलो औषधाने फक्त शारीरिक दुखणं कमी होतं पण माथ्यावर प्रेमाने हात फिरवल्याने आणि सकारात्मक दृष्टिकोन दिल्याने माणूस मानसिकरित्या सबळ होतो.मनू, हे तू करू शकलीस.नवरा बायकोच नातं हे केवळ शारीरिक संबंध, प्रेम आणि प्रणय यासाठी नसतं तर ते असत आपण एकमेकांना किती सांभाळतो, कस साथ देतो, कठीण प्रसंगात कस पाठीशी उभे राहतो यासाठी.." 


अधुरा आहे मी तुझ्याशिवाय हे माहीत आहे ना तुला

चंद्र जसा असतो चांदण्यांच्या सोबतीला

उन्हात जशी असते सावली संगतीला

तशीच आयुष्यभर साथ दे तू मला


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama