STORYMIRROR

Sneha Kale

Horror Thriller Others

4  

Sneha Kale

Horror Thriller Others

अपुरी इच्छा

अपुरी इच्छा

2 mins
379

अवंतिकाचे दिवस भरत आले होते..कोणत्याही क्षणी तिला दवाखान्यात न्यावे लागेल, म्हणून तिच्या आईने तिची मानसिक तयारी करून ठेवली होती..बाळ येणार म्हणून घरातले सगळेच खूप खुश होते..

एके दिवशी संध्याकाळी तिला कळा सुरू झाल्या..तिच्या भावाने लगेच गाडी काढली आणि तिला दवाखान्यात नेले..लगेच तिला admit करून घेतले..डॉक्टरांनी तिला तपासले.काही वेळाने तिच्या कळा कमी झाल्या..प्रसुतिच्या कळांनी ती खूप थकली होती..तिने थोडं खाऊन घेतलं आणि ती झोपून राहिली होती.तिच्या वार्डमध्ये होती तिथे दोनच बेड होते..तिच्या शेजारच्या बेडवर तिची आई झोपली होती..

मध्यरात्री साधारण 2 च्या दरम्यान अवंतिकाला जाग आली..पोटात थोडी कळ येत होती..ती तशीच पडून राहिली होती..मनात हुरहूर वाटत होती..अस्वस्थ ही वाटत होतं..थंडीचे दिवस होते..वार्डच्या खिडकीतून गार वाऱ्याची झुळूक ये जा करत होती..तिने अंगावर पांघरून ओढून घेतलं...काही केल्या तिला झोप लागेना..ती तशीच डोळे मिटून पडून राहिली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली..काही वेळाने तिच्या अंगावरचे पांघरूण खाली गेले..तिला थंडी वाजू लागली म्हणून तिने पांघरूण वर ओढले..काही वेळाने पुन्हा तेच..तिचे पांघरूण खाली जात होते जणूकाही कोणीतरी जाणूनबुजून खेचत आहे..तिने डोळे उघडून पाहिले तर समोरचे दृश्य पाहून तिच्या अंगावर काटा उभा राहिला..

एका बाईचे मुंडके हवेत तरंगत होते..तिच्या डोळ्यांची बुब्बुळे पांढरी होती..तिचा पांढराफटक चेहरा,केस विस्कटलेले या अवतारात दात खात रागाने गुरगुरत अवंतिकाकडे बघत होती..त्या बाईचे अक्राळविक्राळ रूप पाहून अवंतिका पुरती घाबरली..तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते..तिने कसंबसं हात जोडून मला काही करू नको मला बाळ होणार आहे ,अशी विनवणी त्या बाईला केली..तेवढ्यात ते मुंडके गायब झाले.काही वेळाने अवंतिका उठली आणि शेजारी झोपलेल्या आपल्या आईला उठवले..तिने जे काही पाहिले ते सगळे तिने आईला सांगितले..तिची आई पण खूप घाबरली..

दुसऱ्या दिवशी रात्री घडलेला प्रकार अवंतिकाने डॉक्टरांना सांगितला तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की ८ दिवसांपूर्वी एक बाळंतीण त्या दवाखान्यात admit होती..दुर्दैवाने प्रसूती होण्याआधीच तिचा मृत्यू झाला..तिचे मूलही दगावले..बाळाला बघण्याची तिची इच्छा अपुरी राहिली म्हणूनच तिचा आत्मा तळमळतोय

तिचा मृत्यू त्याच बेडवर झाला ज्या बेडवर अवंतिका झोपली होती..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Horror