Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.
Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.

SAMPADA DESHPANDE

Thriller

3  

SAMPADA DESHPANDE

Thriller

अज्ञात बेटावर भाग १०

अज्ञात बेटावर भाग १०

2 mins
192


तुषारने ठरवलेले काम करायला त्याला दोन तास लागले. रात्रीचे दहा वाजत आले होते. इतक्यात त्याला समोरून प्रोफेसर येताना दिसले. त्याने राकेशविषयी चौकशी करताच. तो त्यांना भेटलाच नाही असे सांगून त्यांनी कानावर हात ठेवले. मग तुषार आणि त्यांनी मॅगी बनवून खाल्ले. आज प्रोफेसर विशेष आनंदात होते. तुषारने त्यांना खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही शेवटी चिडून त्याने रिव्हॉल्वर काढले तेव्हा प्रोफेसर हसत म्हणाले,"अरे ! हे काय? असं काय करतोस ? खरंच मला काहीच माहित नाहीये." धमकी देऊन काही उपयोग नाही हे तुषारने ओळखले. या बेटावर त्या प्रोफेसरचे काही अज्ञात साथीदार असण्याची शक्यता होती. मग त्याने दुसरा मार्ग अवलंबायचे ठरवले. तुषारने त्यांच्या पाण्याच्या बाटलीत झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. थोड्याच वेळात प्रोफेसर घोरू लागले. मग तुषार त्यांचे सामान तपासू लागला. नक्कीच काहीतरी महत्वाचे सापडेल याची त्याला खात्री पटली. त्यांचे सामान शोधताना त्याला एक डायरी सापडली ती जशी जशी वाचत गेला तसा तुषार हादरला. त्या अज्ञात बेटाचे रहस्य त्याच्यासमोर उलगडत होते.


दुसऱ्या दिवशी परत प्रोफेसर जंगलात गेले. झोपेच्या गोळ्यांमुळे ते उशिराच उठले होते. त्यांनी संशयाने तुषारकडे पाहिले. तो नॉर्मल आहे हे पाहून ते बिनधास्तपणे निघून गेले. मग तुषारने आपले गरजेचे सामान एका छोट्या सॅकमध्ये घेऊन बाकी सामान तिथेच टाकले. काळोख पडू लागल्यावर तुषार जंगलात गेला. त्या खडकाजवळ प्रोफेसर उभे होते आणि आकाशाकडे पाहत होते. इतक्यात तुषारने वेदनेने किंकाळी मारल्याचे नाटक केले. प्रोफेसरांनी आवाजाच्या दिशेने पाहिले आणि समाधानाने हसले. आता ते त्या दगडावर विशिष्ट ठिकाणी दाब देत होते. तुषारचे प्लानिंग यशस्वी झाले होते. इतरांप्रमाणे तोसुद्धा नाहीसा झाला असे वाटून प्रोफेसर बिनधास्त झाले होते.


तुषार लपून प्रोफेसर पाहत असलेल्या दिशेने पाहत होता. आकाशातून एक छोटा प्रकाशाचा गोल बेटाच्या दिशेने येत होता. तो हळूहळू मोठा होऊन त्या दगडासमोरच्या मोकळ्या जागेत उतरला. ते छोटे अवकाशयान होते. त्यातून साधारणपणे दोन फुटी एलियन्स उतरले. ते मानवसदृश असले तरी छोटे होते. मग प्रोफेसरांनी राकेशचा लपवलेला मृतदेह त्यांना दाखवला. परग्रहवासी तो देह घेऊन यानाजवळ गेले. इतक्या छोट्या यानात तो मृतदेह कसा मावणार? असा प्रश्न हे पाहणाऱ्या तुषारला पडला. तो त्याच्या मोबाईलमध्ये शूट करत होता. तुषारच्या प्रश्नाचे उत्तर त्याला लगेच मिळाले. त्या एलियन्सनी यानातून एक करवतीसारखे हत्यार काढले व त्यांनी राकेशचे सर्व अवयव कापले. मुंडके धडावेगळे केले. आता त्यांनी ते अवयव एकत्र करून यानात भरले. हे सर्व पाहणाऱ्या तुषारच्या डोळ्यात रक्त उतरले होते. आपल्या सगळ्या मित्रांचे काय झाले असेल हे त्याला समजले. काही झालं तरी या एलियन्सना आणि त्यांच्याशी मानवांचा सौदा करणाऱ्या या प्रोफेसरला सोडायचे नाही असा त्याने निश्चय केला. आता तुषारला प्रोफेसरांनी कशाच्या बदल्यात माणसांचा सौदा केला हे पाहायचे होते. राकेशच्या प्रेताचे अवयव यानात ठेवल्यावर त्या एलियनने प्रोफेसरांना मागून येण्याची खूण केली. ते फिरून निघाले.


क्रमशः


Rate this content
Log in

More marathi story from SAMPADA DESHPANDE

Similar marathi story from Thriller