Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

SAMPADA DESHPANDE

Thriller


4  

SAMPADA DESHPANDE

Thriller


अज्ञात बेटावर ७

अज्ञात बेटावर ७

2 mins 164 2 mins 164

प्रकरण ७

  ते झोपलेत याची नावाड्यांनी खात्री केली. मग हळू हळू ते बोटींकडे जायला निघाले. इतक्यात त्यांना थोड्या अंतरावर झाडीत काहीतरी चमकताना दिसले. त्यांच्यातला एक म्हणाला, "चल जाऊन बघू तर काय आहे !" दुसरा म्हणाला ," जाऊ दे ! नको त्या मोहात पडायला नको . ती पोरगी नाही का त्या सोनेरी हरणाच्या मागे जाऊन गायब झाली, तो पोरगा त्या पोरीच्या नादी लागून नाहीसा झाला. आपल्याला इकडचं काही नको." मग पहिला नावाडी म्हणाला," अरे ! मी ऐकलंय कि या बेटावर एक मोठा खजिना आहे. कोण जाणे रात्री तो दिसत असेल. आणि फार लांब कुठे आहे ! समोरच तर आहे चल पटकन जाऊन बघू जाता जाता काही फायदा झाला तर!" ते दोघे त्या चमकणाऱ्या वस्तूंच्या दिशेने गेले. जाऊन बघतात तर काय समोर एका पेटीत सोन्याच्या मोहोरा भरलेल्या होत्या. ते बघताच त्यांचे डोळे चमकले व ते त्या दिशेने धावत गेले. ................

इकडे सगळे गाढ झोपेत होते. नावाड्यांच्या जिवाच्या आकांताने मारलेल्या किंकाळ्या कोणीच ऐकल्या नाहीत. किनाऱ्यावर दोन बोटींमधली एक बोट हळू हळू समुद्रच्या दिशेने जात होती. खोल पाण्यात गेल्यावर ती हळूच बुडली. थोड्याच वेळात तिचा काहीही मागमूस राहिला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठले. थोड्याच वेळात त्यांना परिस्थितीची जाणीव झाली. नावाडी रात्रीत एक बोट घेऊन पळून गेले याची त्यांना खात्री पटली. तुषारला काहीतरी वेगळेच वाटत होते. ते दोघे लबाड आहेत हे दिसत होते. पण ते पळून गेले असतील कि त्यांच्याबरोबरही काही झाले असेल का असे विचार त्याच्या मनात येत होते पण एक बोटही दिसत नव्हती. म्हणजे नक्की ते पळूनच गेले असणार याची त्यांना खात्री पटली. आता फक्त तुषार, राजेंद्र, राकेश, समीर आणि प्रोफेसर इतकेच जण उरले होते. शोध घ्यायला जायचे तर राजेंद्र आणि समीर यांनी तंबूजवळ थांबायचे आहि बाकीच्यांनी प्रोफेसर बरोबर जायचे असे ठरले. तुषारला प्रोफेसरना नजरेआड करायचे नव्हते. ते सगळे निघाले तुषार, राकेश प्रोफेसर निघाले. ते मधून मधून थांबत होते. दगड आणि मातीचे नमुने घेत होते. प्रोफेसर ते कार्बन डेटिंगसाठी आहेत असे सांगत होते. हे बेट फार पुरातन असावे त्याचा कालखंड जाणून घेतला तर खूप कोडी सुटतील असे ते म्हणत होते. आधीच त्या नावाड्यांना शोधण्यात उशीर झाला होता. ते खाऊन निघाले तर दुपार झाली होती. तुषारला थोड्याच वेळात कंटाळा आला. काळोखही पडू लागला होता. त्याने प्रोफेसरना परत फिरायची विनंती केली. तेंव्हा हे आणि राकेश एका मोठ्या काळ्या खडकाजवळ उभे होते प्रोफेसर त्याचे बारीक निरीक्षण करत होते. तो इतर खडकांसारखा दिसत होता. त्यात इतके आश्चर्य वाटण्यासारखे काय होते हे तुषारला कळत नव्हते. इकडे नवल करण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या जसे या बेटावर एकही पक्षी, प्राणी इतकंच काय तर एकही किडासुद्धा दिसत नव्हता. पण हे प्रोफेसर हा दगड बघत बसले होते. तुषार विचार करत होता तरी सावध होता. त्याचा एक हात खिच्यातल्या रिव्हॉल्वर वर होता. इतक्यात किनाऱ्याच्या दिशेने त्याला गोळीबाराचा आवाज ऐकू आला.

क्रमशः


Rate this content
Log in

More marathi story from SAMPADA DESHPANDE

Similar marathi story from Thriller