अज्ञात बेटावर ११
अज्ञात बेटावर ११
प्रकरण ११
ते पुढे गेल्यावर तुषार बाहेर आला. तो दगड म्हणजे त्या एलियन्सचे पृथ्वीवर येण्याचे माध्यम होता हे त्याला समजले. त्याने सॅकमधून एक वस्तू काढून त्या दगडाजवळ ठेऊन दिली. तो सुरक्षित अंतर ठेऊन त्यांच्या मागे गेला. रस्त्यात पाण्याचे डबके होते. ते अचानक मध्ये आल्याने त्या एलियनच्या पायाचं एक बोट पाण्यात गेलं तसा तो अंगावर उकळत तेल टाकल्यासारखा किंचाळला. त्याला पाणी सहन होत नाही हि गोष्ट तुषारच्या लक्षात आली. मग ते दोन एलियन आणि प्रोफेसर पुढे निघाले. पुढे जात ते एका दरीजवळ आले. हि जागा इतके फिरूनही आपण कशी पहिली नाही याचे तुषारला आश्यर्य वाटले. त्याने लांबून डोकावून पाहताच त्याला.
ती संपूर्ण दरी लाल फुलांनी आच्छादलेली दिसली. ती अतिशय मोठ्या आकाराची फुले होती. तिथे इतरही अनेक वनस्पती होत्या. तुषारला रितुने यायच्या आधी सांगितलेली माहिती आठवली. पूर्वी या जागी अत्यंत औषधी वनस्पती मिळत असत. आता त्याला समजले माणसांच्या बदल्यात या दुष्ट माणसाने त्या दिव्य औषधी मिळवल्या होत्या. ज्या या परग्रहवासीयांच्या ताब्यात होत्या. इकडे प्रोफेसरना तिकडेच सोडून ते दोघे एलियन्स यानाकडे परत निघाले होते. तुषारकडे ५ बॉटल पाणी होते. ते त्याने जवळच्या एका पिशवीत भरून घेतले होते. ते एलियन्स यानात बसणार इतक्यात तुषार समोर गेला. ते ते काही हालचाल करायच्या आतच त्याने जवळच्या पिशवीला भोक पडून पाण्याचा फवारा त्या दोघांवर सोडला. त्यांची त्वचा पोळू लागली. ते विव्हळू लागले. त्यांच्या तड्फडण्याने तुषारला एक वेगळाच आनंद मिळत होता. त्याचे सगळे सहकारी किती तड्फडले असतील हे मनात येऊन तो अजूनच त्यांच्यावर पाणी फवारत होता.शेवटी त्या एलियन्सच्या जागी फक्त डाग उरले. आता त्यांना शोधायला दुसरे कोणी यायला नको होते. म्हणून त्यांच्या पृथ्वीरच्या संपर्काचे साधन म्हणजे तो दगडच नाही तर ते संपूर्ण बेट तो नष्ट करणार होता. त्याने संपूर्ण बेटाभोवती टाइम बॉम्ब लावले होते. ते बेट प्रोफेसरना कदाचित त्यालाही घेऊन नष्ट होणार होते. त्याला स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती. मग तो यानाजवळ गेला. डबक्यातले पाणी बाटल्यांमधून भरून आणून ते यानावर ओतू लागला ते यानसुद्धा पाण्याचा स्पर्श होऊन जळू लागले. ते पूर्ण जाळून गेल्यावर तो किनाऱ्यावर गेला. तो बोटीत बसल्यावर टाइम बॉम्बचा स्फोट करणार होता. मग तिथून निघणार होता परंतु ती बोट वाळूत खूप घट्ट रुतून बसली होती. ती काढणे त्याला एकट्याला शक्य नव्हते. तुषारने दहा सेकंदाचा वेळ सेट केला आणि समुद्रात उडी मारली. तो पोहत निघाला. जमेल तितके त्या बेटापासून दूर जाऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचं त्याने ठरवले.
क्रमशः
