आंशिक स्वप्नपूर्ति
आंशिक स्वप्नपूर्ति
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशात ब-याच घडा-मोडी झाल्या होत्या.जो समाज ज्या जाति व्यवस्थेत जखाडला गेला होता. त्याच जाती मध्ये जे नियत व्यवसाय होते तेच ते करत होते. तसे बहुजनाला शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहित करण्याचे कार्य महात्मा फुले आणी शिक्षणमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नामुळे देशात सुरु झाले होते. इंग्रजी राजवटी मध्ये बहुजनाला दोन चांगले महत्वाचे अधिकार प्राप्त झाले होते. ते म्हणजे संपत्ती ठेवण्याचा आणी शिक्षण घेण्याचा अधिकार होय. नंतर ब-याच समाज सुधारकांच्या चळवळी मुळे सर्वसाधारण बहुजनांचे मुल-मुली शिकायला लागली होती.इंग्रज सरकार पासुन तर भारत सरकार मध्ये शिकलेल्या मुला-मुलींना सरकारी नौकरी मिळने सुरु झाले होते. अशाच एका सोनार समाजातील मुलगा आपला पारंपारिक व्यवसाय न करता सरकारी नौकरी मध्ये काम करायला लागला होता. वयात आल्यावर मुलाचे एका शिकलेल्या सुंदर मुली सोबत लग्न झाले होते. दोघांचा संसार सुखात चालला होता. दोघांचे ही स्वप्न फार मोठे होते.त्यांना वेळेच्या आधीच सर्व काही प्राप्त करण्याची लालसा होती. या साठी दोघांचेही एकमत होते.घरची परिस्थिति सुरुवाति पासुन फार चांगली नव्हती. त्यामुळे घरुन काही आर्थीक आधार नव्हता. उलट त्यानाच मदत करावी लागत होती. मुलगा जीथे काम करित होता. ती ईकाई ऑपरेशनल होती. तीथे जोपर्यंत प्रत्येकाचा निवारक आल्या नंतरच कार्यमुक्ति होत होती. त्यामुळे तीथे समयोपरी भत्ता अतिरिक्त कामासाठी मिळत होता. कथेतिल नायक हा पैशाचा लोभी असल्यामुळे तो नेहमीच अतिरिक्त काम करण्यासाठी सज्य राहत होता.त्याला आपल्या अर्धांगिनीचा ही दुजारा होता. तो शारिरिक दृष्टया फार बलवान नव्हता .पण स्वप्न फार मोठी आणी पैशाची हाव असल्यामुळे तो आपल्या शरिराची सारखी हाल व हाणी करत होता. त्याला दमा पण होती. म्हातारी गेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो म्हणुम आपणं साधव राहिला पाहिजे.परंतु तो आपल्या प्रकृतिची किंचितही चिंता न करता तो पैसा कमवण्यात व्यस्त राहत होता.
ह्ळु-हळु धन वाढायला लागले, पण शरिराचे धन कमजोर पडायला लागले होते. मेहनत करुन त्या दांपत्याने एका विख्यात कॉलोनी मध्ये मौक्याच्या जागी एक फ्लॅट घेतला होता. त्यासाठी स्वतः वर कर्ज पण करुन ठेवले होते. त्याला दोन गोंडस हुशार अपत्य होती. ती पण चांगल्या नामांकित महागडया कॉन्व्हेंट मधे शिक्षण घेत होती.
संपूर्ण परिवार नविन फ्लॅट मध्ये राहयला जानार होता म्हणुन फार उत्साही व आनंदित होता. पति-पत्नी आपण पाहिलेले स्वप्न अपेक्षा पेक्षा लवकर पूर्ण झाल्यामुळे भारावुन गेले होते. त्यांनी गृह प्रवेशाचा मोठा सोहळा करण्याचे ठरवीले होते. त्या साठी संपूर्ण परिवार सारखा झटत होता. गृह प्रवेशाची तिथी पण निश्चित झाली होती. त्यासाठी निमंत्रण पत्रिका पण नातेवाईकांना व मित्र मंडळीला स्नेहपूर्वक त्यांच्या घरी जावुन-जावुन वितरित करण्यात आल्या होत्या.
नकटीच्या लग्नला सतराशे साठ विघ्न. गृह-प्रवेशच्या पूर्व संश्याकाळी घर प्रमुकांनी उद्याच्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली पाहुन नितांत आपल्या खुर्चीवर सर्व बाबींची विचार करत आराम करत बसले होते. कदाचित कामाचा थकवा असल्यामुळे आराम करण्याची आवश्यकता भासत असावी !, ते चेह-यावरुण प्रसन्नचित्त,सुखावलेले आणी अभिमानी वाटत होते. जीवणात जे स्वप्न बघतो आणी ते आपण प्रत्यक्षात साकार करतो. तेव्हा स्वतःला स्वतःचा अभिमान वाटने स्वाभाविकच असते. घरातील अन्य सर्व आप-आपले शिल्लक काम करण्यात गुंतले होते. तेव्हाच त्याच्या अर्धांगिनिने त्याला काही मासाठी अचानकच आवाज दिला होता.बरेच आवाज दिल्या नंतरही तो काहीच प्रतिसाद देत नाही हे पाहुन त्याची श्रीमति जवळ गेली होती. तीने त्याला सचेत करण्यासाठी हालवले होते.पण तो सचेत न होता एकाच बाजुला लुडकला गेला होता.ही स्थिति बघता ती जो-याने ओरडली होती. तिची तो आरडा-ओरडा ऐकुन मुले व आजु –बाजुचे शेजारी जमा झाले होते.लगेच डॉक्टरांना पाचरण करण्यात आले होते.डॉकटरंनी नीट तपासणी केल्या नंतर त्याच्या दुःख निधणाची पुष्टी केली होती. मरणोत्तर अहवाल मध्ये त्याला अत्यंत खुशीमुळे हृदयाघात झाल्याचा खुलासा झाला होता. दम्यामुळे त्याला श्र्वास घेने अवघड झाले होते. करु गेले काय आणी वरती झाले पाय, अशी त्या गृहिणीचा अवस्था झाली होती.गृहप्रवेश समारंभच्या जागी परिवाराला घर प्रमुखाच्या अंत्यसंकाराला तोंड द्यावे लागले होते. हीच त्या परिवाची विटंबना !.
घर प्रमुख सरकारी सेवेत असल्यामुळे त्याच्या पत्नीला भरपाई आधारावर सरकारी नौकरी आणी अन्य आर्थीक मदत व सुविधा मिळाल्या होत्या. ती सुशिक्षित व चतुर असल्यामुळे तीने जवाबदारी साभांळुन दोन्ही मुलाला समोर शिकवले होते. मोठा मुलगा इंजिनिअर झाला. तर छोटा मुलगा आय.आय.टीन झाला. तीने दोन्ही मुलांचे लग्न फार थाटात केले होते. लग्न समारंभात सर्वच परिचितांना आमंत्रित केले होते. बहुतेक सर्वचजन उपस्थित होते. फ्क्त ज्याची मुले होती तो जन्म देणारा पिता उपस्थित नव्हता. त्याची उणीव तीच्या सोबत सर्वांनाच होत होती. जर दोघांनी जास्त पैशाची हाव केली नसती. व आपल्या प्रकृतिचि सामान्य दक्षता घेतली असती. तर त्यांचे स्वप्ने थोडे उशिरा साकार झाले असते. कदाचित वेळ ही लागला असता.पण आज सर्वच भौतिक सुख –सोई असतांना तिला ऐकाकी किंवा एकटे जीवन जगण्याची वेळ आली नसती. जेव्हा मुलांचा संसार फुलेल असेल ,तेव्हा तीला जीवन साथीची गरज नक्कीच भासेल !. तेव्हा तीच्या सोबत हातात- हात घालुन सहयोग करणारा कोणी नसेल !. तेव्हा या सर्व भौतिक सुख साधनाचा काय उपयोग तीला होणार !.
