STORYMIRROR

Krishna Shuchi

Horror Tragedy Thriller

3  

Krishna Shuchi

Horror Tragedy Thriller

अ. ल. भयकथा: २. ताई

अ. ल. भयकथा: २. ताई

1 min
11

ऋत्विक उशिरा उठला अन् शाळा बुडाली म्हणून आईने चिडून त्याला त्याच्या खोलीत कोंडून ठेवलं होतं. ऋत्विक रडत रडत त्याच्याकडे बघून फिदिफिदी हसणाऱ्या त्याच्या मोठ्या बहिणीला, निशाला ओरडून म्हणत होता, "असं काय गं ताई, तुला माहितीय ना, मला लवकर जाग येत नाही.. मग तुला रोज सांगून पण तू का बरं मला लवकर उठवत नाहीस ?"

किचनमध्ये कामं करता करता आई रागारागात बडबडत होती, "काय करावं बाई या मुलाचं काही कळेना.. रोज बहिणीचं नाव सांगून उशिरा उठतो. आता याला कसं समजावावं की, चारच महिन्यांखाली त्याची ताई आपल्याला कायमची सोडून गेलीय म्हणून..!"


***

समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror