STORYMIRROR

Shital Yadav

Tragedy

3  

Shital Yadav

Tragedy

युवापिढी

युवापिढी

1 min
27.5K


समाजाचा कणा

भविष्य उद्याचे

स्वप्न भारताचे

युवापिढी ।


डोळ्यातली स्वप्ने

कराया साकार

देऊनी आकार

विचारांना ।


स्पर्धेच्या युगात

चिकाटी असावी

लबाडी नसावी

वर्तनात।


जाऊन आहारी

व्यसनांच्या दारी

जीवनाला मारी

अल्पमती ।


सर्वत्र वाढला

घोर भ्रष्टाचार

हाती तलवार

शिक्षणाची ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy