STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

युगे युगे तुझी कहाणी (गझल)

युगे युगे तुझी कहाणी (गझल)

1 min
120

युगे युगे ती तुझी कहाणी 

सखी मनाच्या तळात आहे 

शहारलेली थरारलेली

अजूनही चिंब रात आहे 


कसे म्हणालीस विसर आता

तुझ्याविना मी जगू कशाला 

तुझीच साकी अबोल प्रतिमा

जिथे तिथे आसवात आहे 


न बोलताही कळेल भाषा 

बघून घे चेहरा फुलाचा

तुझाच ताजा गुलाब आता

बनून काटा वनात आहे 


कुठे कुठे शोधले तुला मी 

कशी मिटावी तहान माझी 

जगामधे वाळवंट सारे 

झरा तुझ्या काळजात आहे 


कशी म्हणालीस साजणी तू 

तुझ्या नि माझ्या विरुद्ध वाटा

मनात माझ्या तुफान आले 

पहाटच्या ती धुक्यात आहे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance