STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

युद्ध वेदना

युद्ध वेदना

1 min
198

युद्धात माणसांचा संहार पहिला मी

स्फोटात पेटलेला संसार पहिला मी


लावू इथे कशाला मी दीप जीवनाचा

सूर्यापुढेच मोठा अंधार पाहिला मी


आधार माणसांना मागू कसा कळेना

दैत्यात मानवाचा अवतार पहिला मी


जीवन स्मशान झाले युद्धात आज माझे

रक्तात माखलेला आवार पहिला मी


शिष्यास काय सांगू आदर्श शांततेचे

शाळेतही रणाचा अंगार पहिला मी


हाका कुणास मारू फैरीत बंदुकींच्या

आकांत जीवनाचा लाचार पहिला मी


माझा कुणा म्हणू मी युद्धात भावनांच्या

पैशात वेदनांचा व्यापार पाहिला मी


घेऊन जन्म झाला माझा गुन्हा विधात्या

साक्षात यातनांचा बाजार पाहिला मी


देहात प्राण असता हृदयात वार झाले

सरणात पेटतांना सत्कार पहिला मी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy