STORYMIRROR

Rucha Rucha

Inspirational

4  

Rucha Rucha

Inspirational

यशाच्या मार्गावरील भय-अपयश

यशाच्या मार्गावरील भय-अपयश

1 min
245

यशाचा शोध घेताना

अपयशाचे काटे टोचतील

माणसे भोवतालची सारी खापर

तुझ्याच माथी फोडतील।।1।।


नको होऊस हताश तू

खचून जाऊ नकोस बाळा

पेटव इच्छाशक्तीची ती मशाल 

होईल दूर हा अंधार सारा।।2।।


नको देउ लक्ष लोकांकडे

म्हणू दे त्यांना तुला वेडा

येईल दिवस असाही तुझ्यावर

वर्षावतील फुलांचा सडा।।3।।

 


नको बाळगूस भीती लोकांची

रोखून बघूदे लोकांना संशयाने

ध्यानात ठेव मुला, अरे

हे सारं जग चालतयं आत्मविश्वासानं।।5।।


यशाच्या मार्गावर चालताना

थांबवं आता वैतागण

नको धरुस कास असत्याची

थांबावं स्वतःचा द्वेष करणं।।6।।


बाळगू नकोस भीती कशाची

प्रयत्न कर तू सामर्थ्याने

जगही जिंकता येतं ,तुला

पाऊल उचल तू धैर्याने

पाऊल उचल तू धैर्याने....।।7।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational