STORYMIRROR

Aditya Kulkarni

Classics Drama

0  

Aditya Kulkarni

Classics Drama

यंग शेरलॉक होम्स

यंग शेरलॉक होम्स

2 mins
452


एक उत्कृष्ट गुप्तहेर होण्यासाठी समजूतदारपणा , हुशारी आणि कल्पना या तिन्ही गुणांचा एकत्रितपणे योग्य वापर करता यायला हवा .'

माध्यमाचा विद्यार्थी झाल्यापासून मला कोणताच चित्रपट निव्वळ मनोरंजन म्हणून बघता येईनासा झालाय . प्राथमिक स्तरावर कथानक , पात्र , मांडणी , तंत्रज्ञान आणि या सगळ्याचा एकूण प्रभाव या पाच मुद्द्यांवर चित्रपट परिक्षण करता येऊ शकतं असं मला वाटतं .

तोच प्रयत्न करतो आहे .

स्टीव्हन स्पीलबर्ग प्रस्तुत ' यंग शेरलॉक होम्स' हा चित्रपट शेरलॉकच्या तरुणपणातल्या त्याच्या पहिल्या कामगिरीवर आहे .चित्रपटाची सुरुवात एका गृहस्थाच्या रहस्यमयी आत्महत्येने होते . जॉन वॉटसन एका नवीन शाळेत प्रवेश घेतो जिथे त्याची भेट डॉर्मेट्रीमधे पाठमोरा बसून व्हायलीन वाजवत बसलेल्या शेरलॉकशी होते . पहिल्याच भेटीत शेरलॉक जॉनला आपल्या कौशल्याची चुणूक दाखवतो . 

ज्या शाळेत हे दोघे शिकत असतात त्याच शाळेत एक निवृत्त प्राध्यापक निवृत्तीनंतर शाळेने त्यांना प्रयोगशाळा म्हणून वापरायला दिलेल्या जागेत वेगवेगळे प्रयोग करत एलिझाबेथ ह्या आपल्या पुतणीसोबत रहात असतात .त्याच्या शाळेतला एक मुलगा एलिझाबेथ समोर केलेल्या अपमानाचा बदला म्हणून शेरलॉकला परिक्षेत कॉपी करण्याचा खोट्या प्रकरणात अडकवतो ज्यामुळे त्याला शाळा सोडण्याची वेळ येते . ज्या दिवशी तो निघणार असतो त्याच दिवशी शेरलॉकच्या निवृत्त प्राध्यापकांचाही खून होतो . मरताना त्याचे प्राध्यापक ' एतार .... एतार ' हे शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत असतात .

हा खून कोणी केला ते शोधून काढण्यासाठी तो आपली प्रेयसी एलिझाबेथच्याच घरी लपून रहातो . ह्या प्रकरणाचा तपास करावा म्हणून तो लेस्ट्राड या पोलिस अधिका-याला मदत करण्याची विनंती करतो जी तो अधिकारी पुर्णपणे धुडकावून लावतो .

जॉनच्या मदतीने पुरावे शोधताना त्याला , तोपर्यंत खून झालेल्या सर्वांचा इजिप्तमधल्या एका गुप्त प्रकरणाशी संबंध असल्याचे समजते . तपास करत असताना त्याला , त्याच शहरात तयार करण्यात आलेल्या पिरॅमीडच्या प्रतिकृतीचा शोध लागतो . इजिप्तमधली एक गुप्त धार्मिक संघटना , त्यांच्या प्रथा , परंपरा , खून करण्यासाठी वापरण्यात येणारं रहस्यमयी हत्यार ह्या सगळ्याचा तो शोध लावतो आणि सरते शेवटी खुन्यापर्यंत येऊन पोहचतो .

पण या सगळ्या प्रवासात त्याला आपल्या प्रेयसीला मुकावं लागतं त्यामुळे आयुष्यभर एकटाच राहिन अशी प्रतिज्ञा तो करतो . जाणा-या बग्गीकडे बघत बघत वॉटसन होम्सने त्याच्यात केलेल्या आमुलाग्र बदलासाठी स्वतःशीच त्याचे आभार मानतो आणि बर्फाच्छादीत रस्त्यावरून जाणा-या शेरलॉकच्या बग्गीच्या फ्रेमवर कॅमेरा थांबून चित्रपट संपतो .

आता चित्रपटाविषयी -

1985 साली तंत्रज्ञानाच्या असणा-या मर्यादा लक्षात घेता चित्रपटात वापरलेले तंत्रज्ञान आत्ताच्या तुलनेत फारच बाळबोध वाटते पण तरीही उत्कृष्ट प्रयत्न .

निकोलस रॉव अॅज शेरलॉक , अॅलन कॉक्स अॅज वॉटसन ,सोफी वॉर्ड अॅज एलिझाबेथ आणि अॅन्थोनी हिगीन्स अॅज प्रोफेसर रेत अशी कास्टींग आहे . अभिनयात शेरलॉकपेक्षा वॉटसन अधिक सरस वाटतो . कॅमेरा अॅन्गल्स , कथानक , मांडणी छान आहे . फक्त खूनी कोण ही उत्सुकता ताणून ठेवण्यात थोडं अपयश आलं आहे .

माझ्याकडून या चित्रपटाला 5 पैकी 2.5 ☆ 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics