भेट -6
भेट -6
धीर करून मी रिप्लाय केला आणि .......
दुसऱ्या मिनीटाला फोन खणखणायला सुरुवात झाली .कारणही तसंच होतं . एकदाच भेटलेल्या मुलीला अख्ख्या मेसेजभर Mango ( Mango - i love you ) असा शब्द लिहून तसे 5 मेसेज पाठवल्यावर ती शांत बसेल अशी अपेक्षाच किती हास्यास्पद होती .
मी स्पर्धा सभागृहातून तसाच बाहेर पडलो . कॉलेजबाहेर एका झाडाखाली शांतपणे बसून कॉल रिसीव्ह केला .
' आदित्य , काय आहे हे ?'
' तू वाचलंस ना ? तेच .'
' अरे पण असं मधेच काय ? आपण नीट बोललो ही नाहीये अजून , एकमेकांना फारसं ओळखतही नाही '
' गेल्या एक महिन्यात तुझी मला झालेली ओळख माझ्यासाठी पुरेशी आहे , अजून काय ओळख व्हायची ?'
पुढची काही शे सेकंद शांततेत गेली .
' एक विचारू ? '
' दोन विचार ,पण बोलत रहा .'
' गप रे , खरं खरं उत्तर देशील ? '
' या बाबतीत मला तुझ्याशी खोटं बोलता ही येणार नाही त्यामुळे बिनधास्त विचार .'
' तुला मीच का आवडले ? '
' तुला classical गाणी का आवडतात ? , तुला शांतता का आवडते ? , तुला फिरायला का आवडतं ? आहेत का तुझ्याकडे उत्तरं याची '?
'काय' ?
' जे विचारलं तेच '
' हो आहेत . एका वाक्यात सांगायचं झालं तर त्यातून मला आनंद मिळतो म्हणून ' .
' अगदी तसंच आहे माझंही ' . जेव्हा जेव्हा तुझा विचार करतो , तुला समोर आणतो, तुझ्याशी बोलत असतो तेव्हा तेव्हा मी आनंदी असतो .'
' हे जरा फिल्मी होतंय असं नाही का वाटते तुला ' ?
' फिल्म आपल्या आयुष्यापेक्षा फार काही वेगळा नसतो गं , उलट जे ख-या आयुष्यात होऊ शकतं अशाच गोष्टी फिल्ममधे दाखवल्या जातात . '
' तु आज असं का बोलतोयस '?
' तुला पटत नाहीये का ? ठेवतो मग फोन .'
' तसं नाही रे .... but i was not prepared .. त्यामुळे मला शॉक बसलाय ,
' ohhhh .....'
' बाय द वे मी माझं सौंदर्य तुझ्यासाठी किती मॅटर करतं ? '
' कणभरही नाही .'
' काय ' ?
' हो ..... कणभरही नाही . तू खूप सुंदर आहेस तरीही.... , कारण तुझ्या दिसण्यापेक्षा तुझं असणं आणि तुझ्या असण्यापेक्षा तुझं वागणं मला जास्त आवडलं म्हणून मी तुझ्या प्रेमात पडलो .'
' ................... '
' बोल ना ..'
' मला थोडा वेळ हवाय ....'
' पाहिजे तेवढा घे , फक्त माझा हातून वेळ निघून जाईल एवढा नको ....'
' हम्मम ' ......
' ठेऊ फोन ?'
' थांब ना थोडं , तुला एक सांगायचं आहे .'
'काय ?'
' मी आत्ताच उत्तर देत नाहीये पण तू समोर असतास तर तुला घट्ट मिठी मारायची होती '......
' ........................... '
' चल , बोलू मेसेजवर .... ठेवते फोन '
' ऐक ....'
'बोल ...'
' I Love You ' ......
' काळजी घे ... बाय .....'
मी शांत मनाने परत स्पर्धा सभागृहात जाऊन बसलो .
क्रमशः

