सलाम (विडंबन )
सलाम (विडंबन )
सलाम
सबको सलाम
प्रपोजला हो म्हणणारीला सलाम ,
प्रपोज न करताही हो म्हणणारीला सलाम ,
भावाची भीती घालून पत्ता
कटवणारीला सलाम ,
आणि हो म्हणून आयत्या वेळी भावाने बघितल्यावर हाच माझ्या मागे लागला होता म्हणणारीला सलाम ,
तिच्या सख्ख्या भावाला सलाम ,
आणि मानलेली बहीण आहे ही माझी असं म्हणून वचपा काढणाऱ्यालाही सलाम .....
सलाम
सबको सलाम ....
न कळत्या वयात प्रेम करण्याला सलाम ,
शाळेतल्या पहिल्या प्रेमाला सलाम ,
कॉलेजमधल्या पहिल्या क्रशला सलाम ,
तिच्यावरून चिडावणाऱ्या सगळ्या दोस्तांना सलाम ,
तिच्यावर डोळा ठेऊन आपल्याबद्दल तिचे कान भरणाऱ्यालाही सलाम ,
आणि फिरवलंस ना तिला मग दे सोडून विषय असा उपदेश देणाऱ्या मास्तरांनाही सलाम .....
पैसा आहे म्हणून रोज नवी पोरगी फिरावणाऱ्याला सलाम ,
आणि तिकीटाचे पैसे गर्लफ्रेंडवर उडवून विनातिकीट प्रवास करणाऱ्याला सलाम ,
गाडीवर बिनदिक्कत बॉयफ्रेंडला चिकटून बसणारीला सलाम ,
आणि ओळखीचं कोणीतरी बघेल म्हणून त्याच्या गाडीवर कधीही न बसणारीलाही सलाम ,
मित्रांकडे उधारी करून गर्लफ्रेंड ला फिरावणाऱ्याला सलाम ,
मित्राची लाईन क्लीअर व्हावी म्हणून स्वतःचा पॉकेटमनी त्याला
देणाऱ्याला मित्रालाही सलाम ,
सलाम भावांनो ,
सबको सलाम .....
दिवसभर भांडून रात्री गुलुगुलु करणार्यांना सलाम ,
आणि एक दिवस भांडले म्हणून महिनाभर एकमेकांशी न बोलणाऱ्यांनाही सलाम ,
सारखा संशय घेणाऱ्या प्रियकर प्रेयसी ला सलाम ,
आणि ती कुठेही असली तरी माझ्याशिवाय ती कोणाचाच विचार करणार नाही या विश्वासालाही सलाम ,
गर्लफ्रेंडवर हात उचलणाऱ्याला सलाम ,
त्याचा मार निमूटपणे खाणारीला सलाम ,
सलाम भावांनो आणि मैत्रिणींनो
सबको सलाम .....
लग्नाआधी काही नाही हं असं म्हणणारीला सलाम ,
लग्नाचं नंतर बघू , आत्ता करू ना असं म्हणणा-याला सलाम ,
ती माझ्याशी तसं वागली म्हणून मी पण तसंच वागणार असं म्हणणा-याला सलाम ,
तिच्यासाठी नस कापून घेणा-यालाही सलाम ,
सलाम भावांनो आणि मैत्रिणींनो
सबको सलाम
तू नही तो और सही म्हणणाऱ्यांना सलाम ,
उसके सिवा और कोई नही असं
म्हणणाऱ्यांना सलाम ,
तिच्या प्रेमात खंबा रिचवणाऱ्यांना सलाम ,
तिच्यासाठी मित्रांच्या शिव्या खाऊनही दारू न पिणार्यांना सलाम ,
प्रेमापेक्षा करियरकडे आधी बघ असा सल्ला देणाऱ्या पालकांना सलाम ,
नोकरी आणि छोकरी एकत्र
मिळवणाऱ्यांना सलाम ....
प्रेम करणाऱयांना सलाम
प्रेम न करणाऱ्यांना सलाम
सलाम भावांनो आणि बहिणींनो
सबको सलाम ....
© आदित्य शेखर कुलकर्णी ....
