STORYMIRROR

Nilesh Jadhav

Tragedy

3  

Nilesh Jadhav

Tragedy

येशील का परत तू..?

येशील का परत तू..?

1 min
639

येशील का परत तू...?

"प्रेम करते रे तुझ्यावर" हे सांगायला...

बोलायचं नसेल तुला...

काही हरकत नाही पण तरीही येशील का तू..?

माझंच काही तरी ऐकायला...


मनात खूप काही लपलंय...

मला मोकळं व्हायचंय,

आजकाल डोळ्यांनीच बोलतोय मी, तू येशील का..?

माझ्या डोळ्यांची भाषा समजून घ्यायला...


चल राहू दे सगळंच...

सांगणं, ऐकणं, समजून घेणं अगदी सगळंच...

पण येशील का तू पुन्हा..?

"मी तुझीच आहे" अशी खोटी शपथ घ्यायला...


मी असेल नसेल माहीत नाही

शेवटचंच तुला पाहायचंय...

म्हणूनच एकदा येशील का तू..? खळखळून हसायला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy