STORYMIRROR

vaishali vartak

Inspirational

2  

vaishali vartak

Inspirational

येईल रम्य पहाट

येईल रम्य पहाट

1 min
61

झालंय खरंच जीवन आता

मानवाचे अंधाराने भयभीत

आशा संपत चालली मनात

अंतची आला का पुढे कदाचित?


जरा नीट बसता घडी

नवनवी जगी येते महामारी

बंद करुनी बसती घरोघरी 

कसे कमवावे हा प्रश्न भारी


कसे चालणार जग सारे

नाही उद्योग वा व्यवसाय

प्रगती थांबली देशाची

नाही पगार तर खाणार काय


दावी निसर्ग रुप विक्राळ

 येती अवचित वादळ खास

झाले नुकसान घरदारांचे

 जणु दुष्काळात अधिक मास


पण नाही हरणार हिंमत

दाखवू एकात्मतेचे बळ

करण्या पाडाव आपत्ती चा

देऊ एकमेकास पाठबळ


नव चैतन्याची फूलवू पालवी

दूर करु निराशेची काजळी

ठेवू दृढ विश्वास देवावरी

खचित देईल कृपेच्या ओंजळी


येईल पहा उद्याची सकाळ

सकारात्मकाचे वहातील वारे

तिमीर संपता येईल उषःकाल

आनंदीमय होईल जग सारे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational