STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational

4  

UMA PATIL

Inspirational

ये रे ये रे पावसा

ये रे ये रे पावसा

1 min
657

ये रे ये रे पावसा आता

रिमझिम वाहू दे धारा

वीज चमकावी लख्ख

छळावा नटखट वारा.......॥१॥


थेंब बरसू दा टपोरे

तेव्हा भागेल तहान

मोहोरेल सारी सृष्टी

आहे पाऊस महान......॥२॥


किती मनात आनंद

येतो तनाला शहारा

मोर नाचती सुखाने

सारा पाण्याचा पहारा....॥३॥


शालू पांघरे हिरवा

नववधू जशी नटे

धरा भिजे ओलिचिंब

प्रेम ओतप्रोत दाटे........॥४॥


शेतकरी झाला खूश

पिके येतील जोमाने

ओलेचिंब झाले रान

लागू कामाला जोशाने....॥५॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational