STORYMIRROR

Pandit Warade

Romance

2  

Pandit Warade

Romance

ये मिठीत

ये मिठीत

1 min
3.0K


ये मिठीत ये अशी

घे विसावा तू जरा

ऋतू प्रीतीचा खरा

आज करू साजरा


पाहू दे मला तुझा

मुख चंद्र लाजरा

ओठ शुष्क जाहले

मधु चाखू दे जरा


रात्र रात्र जागतो

वाट तुझी पाहतो

तू न भेटली जरी

विरहाग्नी साहतो


फुलला वसंत हा

मन मयूर नाचतो

चातका समान मी

प्रतीक्षेत राहतो


चन्द्र चंद्रिका नभी

प्रीत रंगी रंगले

स्वप्न हे मिलनाचे

का असे गं भंगले?


चल पुरे करू तया

ये जरा कुशीत या

धुंद आज होऊनि

प्रेम गीत गाऊया


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance