यातना गुलामीच्या
यातना गुलामीच्या
भोगले जे दु:ख ,वेदना
अन्याय ही सहन केले
पशुसम वागविले त्या दुष्टांनी मानवा
गुलामीच्या त्या पिडा अश्रु भरती नयना
असो स्त्री वा पुरूष ही
असो वृध्द वा बालकही
नसे दया तयां कडे कुणाही साठी ती
पिडा नी यातना देह आणि मनाला
गुलामीच जगणं हे नको वाटे जीवाला